MR/Prabhupada 0228 - अमर कसे बनायचे समजा



Lecture on BG 2.15 -- London, August 21, 1973

म्हणून त्यांची परिषद, त्यांची संयुक्त राष्ट्रे, त्यांची वैज्ञानिक प्रगती, त्याची शैक्षणिक प्रगती, तत्वज्ञान, आणि इत्यादी, सर्वकाही कसे या भौतिक जगात सुखी बनायचे यासाठी आहे. गृह-व्रतानां. कसे इथे सुखी बनायचे हे ध्येय आहे. आणि ते शक्य नाही. हे मूर्ख ते समजू शकत नाहीत. जर तुम्हाला आनंदी बनायचे असेल, तर तुम्ही श्रीकृष्णांकडे आले पाहिजे.

मामुपेत्य तु कौंतेय दुःखालयम अशाश्वतम् नान्पुवन्ति (भ.गी. ८.१५) | श्रीकृष्ण सांगतात, "जर कोणी माझ्याकडे आले, तर त्याला दुःखाने भरलेल्या या जागेत पुन्हा यावे लागत नाही." दुःखालयम. श्रीकृष्णाद्वारे या भौतिक जगाला दुःखालयम म्हणून विशद केले आहे. आलयम म्हणजे जागा, आणि दुःख म्हणजे त्रास. इथे सर्वकाही त्रासदायक आहे, पण मूर्ख लोक मोह मायेने, मायेने झाकले गेल्याने, तो त्रास आनंद म्हणून स्वीकारतात. ती माया आहे. तो आनंद नाही. एक पुरुष दिवस आणि रात्र काम करीत आहे, आणि कारण त्याला काही कागद मिळत आहेत ज्यावर लिहिले आहे, "आम्ही देवावर विश्वास ठेवतो. हा कागद घे शंभर डॉलर्स. मी तुला फसवत आहे." ते असे नाही? "आम्ही देवावर विश्वास ठेवतो. मी तुला पैसे देण्याचे वचन देतो. आता हा कागद घे. एका पैशाचीही किंमत नाही. त्याच्यावर लिहिले आहे शंभर डॉलर्स." तर मी विचार करीत आहे मी आनंदी आहे: " आता मला हा कागद मिळाला आहे." असे सर्व आहे फसवणारे आणि फसणारे. हे चालू आहे.

तर आपण या भौतिक जगाच्या आनंद आणि त्रासामुळे विचलित होऊ नये. तो आपला उद्देश असला पाहिजे. आपला उद्देश कसे कृष्णभावनामृताचे पालन करायचे हा असला पाहिजे. कसे पालन करायचे. आणि चैतन्य महाप्रभु यांनी खूप सोपे सूत्र दिले आहे:

हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम
कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिर अन्यथा
(चैतन्य चरितामृत अादि १७.२१) ।

या कली युगात, तुम्ही घोर तपस्या करू शकत नाही किंवा प्रायश्चित्त घेऊ शकत नाही. केवळ हरे कृष्ण जप करा. ते देखील आपण करू शकत नाही. जरा पहा. आपण किती दुर्दैवी आहोत. तर कली युगात हि स्थिती आहे. मंदा: सुमंद-मतयो मंद-भाग्या उपद्रुताः (श्रीमद भागवतम १.१.१०) ते खूप दुष्ट आहॆत, मंद. मंद म्हणजे खूप वाईट, मंद. आणि सुमंद. आणि जर त्यांना काही सुधारणा करायची इच्छा असेल, ते काही बदमाश गुरुजी महाराजांचा स्वीकार करतील. मंदा: सुमंद-मतयः आणि काही पक्ष जे प्रामाणिक नाहीत त्यांचा ते स्वीकार करतील की: "ओह हे खूप चांगले आहे." तर सर्वप्रथम ते सर्व दुष्ट आहेत. आणि जर ते काही स्वीकार करतील, ते देखील खूप दुष्ट असेल. का? दुर्दैवाने. मंदा: सुमंद-मतयोः-भाग्या:(श्रीमद भागवतम १.१.१०) मंद-भाग्य: म्हणजे दुर्दैवी. आणि त्या वर, उपद्रुता. नेहमी त्रासलेले कराने, पाऊस नाही, पुरेसे अन्न नाही. अनेक गोष्टी. कली-युगाची हि स्थिती आहे. म्हणून चैतन्य महाप्रभु सांगतात… चैतन्य महाप्रभु नाही.

हे वैदिक साहित्यामध्ये आहे, की तुम्ही योगाचा सराव करू शकत नाही. ध्यान किंवा मोठे यज्ञ किंवा मूर्ती पूजेसाठी मोठ मोठ्या देवळांची निर्मिती. आताच्या दिवसात हे खूप, खूप काठीण आहे. केवळ जप करा हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे/ हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, आणि हळूहळू तुम्हाला समजेल कसे अमर बनायचे.

खूप आभारी आहे.