MR/Prabhupada 0234 - भक्त बनणे सर्वात मोठी योग्यता आहे



Lecture on BG 2.4-5 -- London, August 5, 1973

तर प्रल्हाद महाराज… नृसिंहदेवानी प्रल्हाद महाराजाना देऊ केले, "आता तू तुला आवडेल तो कोणत्याही प्रकारचा वर मागू शकतोस." तर प्रल्हाद महाराज उत्तर दिले, "हे प्रभू, आम्ही भौतिकवादी आहोत. मी अगदी भौतिकवादी असलेल्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणून मी देखील, कारण भौतिकवादी असलेल्या वडिलांचा मुलगा, म्हणून जन्माला आलो आहे. मी देखील भौतिकवादी आहे. आणि तुम्ही, पूर्णपुरुषोत्तम भगवान, तुम्ही मला काही वर देऊ करीत आहात. मला माहित आहे की, मी कोणत्याही प्रकारचा वर तुमच्याकडून घेऊ शकतो. पण त्याच काय उपयोग आहे? मी का तुमच्याकडून काही वर मागू? मी माझ्या वडिलांना पहिले आहे. भौतिकवादी, ते एवढे ताकदवान होते की अगदी इंद्र, चंद्र,वरुण, देवांना ते त्यांच्या लाल डोळ्यांनी धमकावयाचे. आणि ते जिकंले, विश्वावर नियंत्रण मिळवले. ते खूप शक्तिशाली होते. श्रीमंती, संपत्ती, शक्ती, प्रतिष्ठा, सर्वकाही पूर्ण, पण तुम्ही ते एका सेकंदात नष्ट केले.

तर तुम्ही मला असा वर का देऊ करीत आहात? मी त्याचे काय करू? जर मी तो वर तुमच्याकडून घेतला आणि मी गर्विष्ठ बनलो, आणि तुमच्या विरुद्ध संपूर्ण चुकीचे वागलो, मग तुम्ही ते एका सेकंदात नष्ट कराल. तर कृपया मला असा वर देऊ नका, असे भौतिक वैभव. त्यापेक्षा तुमच्या दासाच्या सेवेत गुंतून राहण्याचा वर मला द्या. मला हा वर हवा आहे. असा आशीर्वाद द्या की मी तुमच्या सेवकाच्या सेवेत गुंतून राहीन, प्रत्यक्ष तुमचा सेवक नाही. मग नंतर अनेक प्रार्थना केल्यावर, भगवंतांना शांत केल्यावर… ते खूप क्रोधीत होते.

मग जेव्हा ते थोडे शांत झाले, त्याने विचारले, माझ्या प्रिय भगवंता, "मी तुम्हाला अजून एक आशीर्वाद मागू शकतो का . माझे वडील तुमचे कट्टर शत्रू होते. तेच त्यांच्या मृत्यूचे कारण होते. आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्यांना क्षमा करा आणि त्याना मुक्ती द्या." हा वैष्णव मुलगा आहे. त्याने स्वतःसाठी काही मागितले नाही. आणि जरी त्याला माहित होते की त्याचे वडील मोठे शत्रू होते, तरीही, त्याने आशीर्वाद मागितला, "या गरिबाला मुक्ती मिळू दे." तर भगवान नृसिंहदेवांनी आश्वासन दिले, सांगितले, माझ्या प्रेमळ प्रल्हादा, फक्त तुझ्या वडिलांना नाही. पण तुझ्या वडिलांचे वडील, त्यांचे वडील, चौदा पिढ्यांपर्यंत सर्व मुक्त आहेत. कारण तुझा या कुटुंबात जन्म झाला आहे."

तर जो कोणी वैष्णव बनला, भगवंतांचा भक्त बनला, तो कुटुंबाची उत्तम सेवा करीत आहे. कारण त्याच्याशी नातं असलेले, त्याचे वडील, त्याची आई, कोणीही ते मुक्त होतील. ज्याप्रमाणे आपल्याला अनुभव आहे, जर एखादी व्यक्ती काळाच्या आधी लढाईत मृत्यू पावली, त्याच्या कुटुंबाची सरकारद्वारे काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे, भक्त बनणे सर्वात मोठी पात्रता आहे. त्याला सर्वकाही मिळाले आहे. यत्र योगेश्वर: हरी: यत्र धनुर्धर: पार्थो (भ.गी. १८.७८) । जिथे कृष्ण आहे आणि जिथे भक्त आहे, तिथे विजय आहे, गौरव आहे. हे निश्चित आहे.