MR/Prabhupada 0242 - मूळ सभ्यतेच्या प्रक्रीयेकेडे जाणे फार कठीण आहे



Lecture on BG 2.3 -- London, August 4, 1973


प्रभुपाद : काल जेव्हा आपण मनू वाचत होतो,वैवस्वत मनू, कर्दम मुनींकडे येतो,त्याला प्राप्त होते. "सर, मला माहित आहे. की तुमचा प्रवास म्हणजे तुम्ही फक्त..." काय म्हटले जाते,काय म्हणतात,तपासणी?

भक्त: निरीक्षण.

प्रभुपाद: निरीक्षण, हो निरीक्षण. "तुमचा प्रवास म्हणजे निरीक्षण वर्णाश्रम की नाही... ब्राम्हण प्रत्यक्षात ब्राम्हणांसारखे वागत आहेत की नाही, क्षत्रिय प्रत्यक्षात क्षत्रियांसारखे वागत आहेत की नाही." तो राजाचा दौरा आहे. राजाचा दौरा म्हणजे राज्याच्या खर्चात कुठेही जा आणि या नाही. तो आहे... कधीकधी राजा वेश बदलायचा आणि वर्णाश्रम धर्माचे पालन होते का बघायचा, योग्यरीत्या पालन होत का, कोणी हिप्पीसारखे फक्त वेळ वाया घालवत नाहीत ना. नाही ते शक्य नाही. ते होऊ शकत नाही.

आता तुमच्या शासनामध्ये कोणीला कामधंदा आहे का याची तपासणी होते पण... बेरोजगार. पण अनेक गोष्टींची प्रत्यक्षात तपासणी होत नाही. पण हे शासनाचे कर्तव्य आहे की सगळीकडे लक्ष ठेवायचं. वर्णाश्रमाचारवता, सर्वकाही ब्राम्हण म्हणून सराव करत आहेत. फक्त खोटेपणी ब्राम्हण बनून, खोटेपणी क्षत्रिय बनून नाही. तुम्ही पाहिजे. तर हे राजाचे कर्तव्य आहे,शासनाचे कर्तव्य. आता सगळं उलट आहे. कशालाही व्यावहारिक मूल्य नाही. म्हणून चैतन्य महाप्रभु सांगतात,

कलौ...
हरेर नाम हरेर नाम
हरेर नामैव केवलम
कलौ नास्ति एव नास्ति एव
नास्ति एव गतिर अन्यथा
(चैतन्य चरितामृत अादि १७.२१)

आपण परत मूळ संस्कृती स्वीकारणं हे खूप अवघड आहे. म्हणून वैष्णवांसाठी जे मी सांगितल होत. त्रिदशपूर आकाश पुष्पायते दूरदांतेंद्रिय कालसर्प पतली. तर इंद्रियांवर नियंत्रण, ते म्हणजे . दुर्दांत दुर्दांत म्हणजे प्रचंड कठीण. इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं हे फार फार कठीण आहे. म्हणून योग प्रक्रिया,गूढ योग प्रक्रिया - इंद्रियांवर कसे नियंत्रण ठेवायचे याचा सराव आहे. पण भक्तांसाठी... ते... जिभेसारखं, जर ती फक्त हरे कृष्ण मंत्राचा जप करण्यात आणि कृष्ण प्रसाद खाण्यात गुंतवली. संपूर्ण गोष्ट साधली गेली. परिपूर्ण योगी. परिपूर्ण योगी. तर भक्तांना, इंद्रियांपासून काही त्रास नाही. कारण भक्तांना महित आहे की प्रत्येक इंद्रिय कसे भगवंतांच्या सेवेत गुंतवायचे.

ह्रिषीकेन ह्रिषीकेश- सेवनं(चैतन्य चरितामृत मध्य १९.१७०)


ती भक्ती आहे. ह्रिषीक म्हणजे इंद्रिय. जेव्हा इंद्रिय फक्त श्रीकृष्णांच्या, ह्रिषीकेशाच्या सेवेमध्ये गुंतवली जातात,मग तिथे योग सरावाची गरज नाही. आपोआप ती श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये बद्ध होतात. त्यानां इतर कुठलीही गुंतवणूक नसते. ती सर्वोच्च आहे. म्हणून श्रीकृष्ण सांगतात,

योगीनाम अपि सर्वेशाम
मद-गतेनान्तरात्मना
श्रद्धावान भजते यो माम
स मे युक्ततमो मत:
(भ.गी. ६.४७)

"जो सतत माझा विचार करतो तो पहिल्या दर्जाचा योगी." म्हणून हा हरे कृष्णाचा जप, जर आपण फक्त जप केला आणि ऐकला, पहिल्या दर्जाचा योगी. तर ही पद्धत आहे. ते श्रीकृष्ण अर्जुनाकडून इच्छितात. तू मनाच्या दुर्बलतेचे असे समर्थन का करत आहेस? तू माझ्या संरक्षणाखाली आहेस. मी तुला लढायची आज्ञा देतो. तू का नाकारत आहेस.?" हे तात्पर्य आहे.

आभारी आहे.