MR/Prabhupada 0262 - नेहमी असा विचार केला पाहिजे की आपली सेवा पूर्ण नाही



Lecture -- Seattle, September 27, 1968

तमाल कृष्ण: प्रभुपाद, जर आपल्याला माहित असेल आपण सेवा केली पाहिजे आणि आपली सेवा करायची इच्छा असेल,पण सेवा खूप वाईट आहे तर काय. प्रभुपाद: होय, सेवा योग्य नाही असा विचार कधीही करु नका. ते तुम्हाला योग्य पातळीवर ठेवेल.हो. आपण कायम असा विचार केला पाहिजे की आपली सेवा पूर्ण नाही.हो.ते फार चांगलं आहे. ज्याप्रमाणे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिकवले की… त्यांनी सांगितले, की "माझ्या प्रिय मित्रानो,कृपया लक्षात घ्या माझा श्रीकृष्णांवर थोडाही विश्वास नाही. जर तुम्ही म्हणत असाल मी का रडत आहे. त्याला उत्तर आहे की केवळ मी महान भक्त आहे हे दाखवण्यासाठी. वास्तविक, मला जराही श्रीकृष्णांबद्दल प्रेम नाही. हे रडणे केवळ प्रदर्शन आहे," "तुम्ही असे का म्हणत आहात?" "आता, अशी गोष्ट आहे की मी अजूनही श्रीकृष्णांना बघितल्याशिवाय जगत आहे. याचा अर्थ मला श्रीकृष्णांबद्दल प्रेम नाही. अजूनही मी जिवंत आहे. श्रीकृष्णांना पाहिल्याशिवाय मी बऱ्याच वर्षांपूर्वी मरण पावलो असतो. म्हणून आपण असा विचार केला पाहिजे.ते उदाहरण आहे. श्रीकृष्णांची सेवा करण्यात तुम्ही कितीही परिपूर्ण असलात,तुम्हाला माहित असले पाहिजे की… श्रीकृष्ण अमर्यादित आहेत, तर तुमची सेवा पूर्णतः त्यांच्यापर्यंत पोहोचु शकत नाही. ती अपूर्ण राहील कारण आपण मर्यादित आहोत. पण श्रीकृष्ण खूप दयाळू आहेत.जर तुम्ही प्रामाणिकपणे थोडी सेवा केलीत, ते स्वीकार करतात. ते श्रीकृष्णांचे सौंदर्य आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. आणि जर श्रीकृष्ण तुमच्याकडून थोडीशी सेवा स्वीकारत असतील तर तुमचे आयुष्य तेजस्वी होईल. तर श्रीकृष्णांवर उत्तम प्रकारे प्रेम करणे, श्रीकृष्णांना सेवा अर्पण करणे शक्य नाही, कारण ते अमर्यादित आहेत. भारतात गंगेची पूजा करायची पद्धत आहे. गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते. म्हणून ते गंगा नदीची पूजा करतात. गंगेचं पाणी घेऊन तिला अर्पण करायचं. समजा अशा प्रकारचे भांडे, भांडे किंवा ओंजळभर, तुम्ही गंगेचं थोडं पाणी घेऊन ते भक्तिने आणि मंत्र उच्चारून तिला अर्पण करा. तर तुम्ही एक भांड गंगेचं पाणी घ्या आणि ते गंगेला अर्पण करा. तिथे काय आहे,लाभ आणि नफा किंवा तोटा किंवा गंगेला मिळणार लाभ? जर तुम्ही गंगेतून एक भांडे पाणी घेतलंत आणि परत अर्पण केलंत,तर गंगेला काय लाभ आणि नफा आहे? पण तुमची पद्धत,तुमचा विश्वास,गंगामातेबद्दल तुमचे प्रेम, "गंगा माता, मी तुला हे थोडे पाणी अर्पण करतो," ते मान्य आहे, त्याचप्रमाणे, आपल्याला काय श्रीकृष्णांना अर्पण करायला मिळालंय? प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांच्या मालकीची आहे. आता आपण हि फळं अर्पण केली. फळे आपल्या मालकीची आहेत का? हि फळे कोणी तयार केली? मी निर्माण केली का? कुठल्याही माणसाला फळांचे,धान्याचे,दूधचे उत्पादन करायला माहित आहे का? ते खूप महान शास्त्रज्ञ आहेत, आता त्यांना उत्पादन करु द्या. गाय गवत खाते आणि तुम्हाला दूध देते. तर आता,वैज्ञानिक प्रक्रियेने, तुम्ही का गवताचे रूपांतर दुधात करत नाही? तरीही ईश्वरआहे हे दुष्ट मान्य करत नाहीत. तुम्ही पहा? ते इतके मूर्ख झाले आहेत:"विज्ञान." आणि तुमचे विज्ञान काय आहे,मूर्खपणा? तुम्ही बघा गाय गवत खाते आणि तुम्हाला दूध देते. तुम्ही तुमच्या बायकोला का देत नाही आणि दूध घेता? तुम्ही का खरेदी करता? पण जर तुम्ही मानवाला गवत दिलंत,ती मरेल. तर प्रत्येक ठिकाणी, कृष्णांचे नियम, किंवा देवाचे नियम,कार्यरत आहेत. आणि तरीही असं म्हणतात की "देव मृत आहे. देव अस्तित्वात नाही. मी देव आहे." ते हे असंच करतात. ते दुष्ट आणि मूर्ख लोक बनले आहेत. ते या बैठकीला का येत नाहीत? "अरे, स्वामीजी देवाबद्दल बोलतात,जुन्या गोष्टी. (हशा) चला काहीतरी नवीन शोध लावूया."तुम्ही पहा? आणि जर कोणी मुर्खासारखे बोलत असेल,तर "ओह,तो आहे…" तो चार तास शून्यावर बोलला. जरा पहा. मॉन्ट्रीयलमध्ये एक सज्जन, "स्वामीजी, तो इतका हुशार आहे, तो शून्यावर चार तास बोलत होता." ते इतके मूर्ख आहेत की चार तास त्यांना शुन्याबद्दल ऐकायची इच्छा आहे. तुम्ही पहा? (हशा) शून्याची काय किंमत आहे? आणि तुम्ही तुमचा चार तास वेळ वाया घालवलात? शेवटी ,ते शून्य आहे. तर लोकांना हे हवंय. लोकांना हेच हवंय. जर आपण साधी गोष्ट सांगितली - "ईश्वर महान आहे. तुम्ही सेवक आहेत,शाश्वत सेवक. आपल्याकडे काहीही शक्ती नाही. आपण नेहमी देवावर अवलंबून असतो. फक्त तुमची सेवावृत्ती ईश्वराकडे वळवा, तुम्ही आनंदी व्हाल" - "हे फार चागलं आहे." तर त्यांना फसायचं आहे. म्हणून कित्येक लोक येतात, फसवतात आणि जातात, एवढेच. लोकांना फसण्याची इच्छा आहे. त्यांना साध्या गोष्टी नको असतात.