MR/Prabhupada 0265 - भक्ती म्हणजे ऋषिकेशांची सेवा करणे, इंद्रियांचे स्वामी



Lecture on BG 2.10 -- London, August 16, 1973

प्रद्युम्न: भाषांतर,"हे भरतवंशजा. त्यावेळी श्रीकृष्णनी,स्मित हास्य करत, दोन्ही सैन्यांच्या मध्ये, शोक ग्रस्त अर्जुनाला खालील शब्द म्हणाले." प्रभुपाद: तर ऋषिकेश, प्रहसन्न इव. श्रीकृष्ण हसायला लागले,स्मित हास्य, "हा काय मूर्खपणा आहे अर्जुन." सर्व प्रथम ते म्हणाले,"मला घेऊन जा."सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेsअच्युत (भ गी १।२१) "कृष्ण, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये ने." (बाजूला:) मला पाणी आणा. आणि आता… तो सुरवातीला इतका उत्साहित होता,की "माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये न्या." आता हा दुष्ट म्हणतो आहे योत्स नाही, "मी लढणार नाही." जरा धुर्तपणा बघा. जरी अर्जुन हा श्रीकृष्णांचा प्रत्यक्ष मित्र होता, माया हि एवढी मजबूत आहे, की तो सुद्धा दुष्ट बनला, इतरांबद्दल काय बोलणार. सर्व प्रथम खूप उत्साहित: "होय, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये ने." आणि आता... न योत्स इति गोविंन्द(भ गी २। ९) "मी लढणार नाही." हा दुष्टपणा आहे. म्हणून ते हसत आहेत,की "हा माझा मित्र आहे,प्रत्याक्ष मित्र, आणि एवढा मोठा. आणि तो आता सांगतोय की 'मी लढणार नाही' " म्हणून श्रीकृष्ण हसत आहेत, हे हास्य अर्थपूर्ण आहे, प्रहसन्न. तम् उवाच हृषीकेशः प्रहसन्न इव भारत, सेनयोरुभयोर विषीदन्तम,विलाप. सर्व प्रथम तो खूप उत्साहाने लढायला आला; आता तो विलाप करत आहे. आणि श्रीकृष्णांना इथे ऋषिकेश संबोधलं आहे. ते ताकदवान आहेत. ते अच्युत आहेत. ते ताकदवान आहेत. ते बदलत नाहीत. ऋषिकेश या शब्दाचा अजून एक अर्थ… कारण नारद-पंचरात्र मध्ये भक्ती म्हणजे ऋषिकेश-सेवनं म्हणून ऋषिकेश या नावाचा इथे उल्लेख केला आहे. ऋषिकेश-सेवनं भक्तिर उच्चते. भक्ती म्हणजे ऋषिकेशची सेवा करणे, इंद्रियांचा स्वामी. आणि इंद्रियांचा स्वामी, काही दुष्ट श्रीकृष्णांचे वर्णन अनैतिक म्हणून करतात. ते इंद्रियांचे स्वामी आहेत आणि ते अनैतिक आहेत. जरा बघा त्यानी कसा भगवद गीतेचा अभ्यास केला. जर श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्मचारी… श्रीकृष्ण आदर्श ब्रम्हचारी आहेत,... हे भीष्मादेवानी घोषित केले आहे. ब्रम्हांडात भीष्मादेव प्रथम दर्जाचे ब्राम्हचारी आहेत. त्यांनी सत्यवतीच्या वडिलांना वचन दिले… तुम्हाला ती गोष्ट माहित आहे. सत्यवतीच्या वडिलांची… त्याचे,भीष्मदेवांचे वडील कोळणीच्या, कोळ्याच्या मुलीशी आकर्षित झाले. तर त्याना लग्न करायचे होते.आणि मुलीच्या वडिलांनी विरोध केला,"नाही, मा माझी मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही. "का? मी एक राजा आहे, मी तुमची मुलीचा हात मागत आहे." "नाही, तुम्हाला एक मुलगा आहे." भीष्मदेव त्यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र होते, गंगा माता गंगा माता शंतनू महाराजांची पत्नी होती, आणि भीष्मदेव केवळ उर्वरित मुलगा होते. शंतनू महाराज आणि गंगा,गंगामाता, यांच्यात असा करार होता, की "जन्माला येणारी सर्व मुले गंगेत फेकण्याची,जर तुम्ही मला परवानगी दिलीत तर मी लग्न करिन आणि जर तुम्ही अनुमती दिली नाहीत,तर लगेच मी तुम्हाला सोडून जाईन." तर शंतनू महाराज म्हणाले, "ठीक आहे,तरीही, मी तुझ्याशी लग्न करीन." तर ती सर्व मुले गंगेत फेकत होती,तर हे भीष्मदेव… तर शेवटी, वडील,ते अतिशय दुःखी झाले,की "हे काय आहे? कशा प्रकारची पत्नी मला मिळाली? ती फक्त सर्व मुले पाण्यात फेकत आहे." तर भीष्मदेवांच्या वेळी, शंतनू महाराज म्हणाले, "नाही मी तुला परवानगी देऊ शकत नाही,मी तुला याला अनुमती देत नाही." मग गंगा माता म्हणाली, तर मग मी जाईन." "हो, तू जाऊ शकतेस, मला तू नको आहेस. मला हा मुलगा हवा आहे." तर ते भार्याहीन होते. परत ते सत्यवतीशी लग्न करू इच्छित होते. तर वडील म्हणाले,नाही,मी माझी मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही कारण तुम्हाला एक मुलगा आहे, प्रौढ मुलगा. तो राजा होईल. तर मी माझी मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही. तुमची दासी बनण्यासाठी. ती... जर मला वाटलं की तिचा मुलगा राजा होईल,तर मी तुम्हाला माझी मुलगी देऊ शकेन." तर त्यांनी सांगितलं, "नाही, ते शक्य नाही." पण भीष्मदेवानी जाणले की "माझे वडील या मुलीकडे आकर्षित झाले आहेत. म्हणून ते त्यांच्याकडे गेले,... त्यांनी मच्छीमाराला सांगितले की "तुम्ही तुमची मुलगी माझ्या वडिलांना देऊ शकता, पण तुम्ही विचार करता की मी राजा होईन. तर तुमच्या मुलीचा मुलगा राजा होईल. या अटीवर तुम्ही तुमची मुलगी देऊ शकता. तर त्यांनी उत्तर दिले; "नाही मी देऊ शकत नाही." "का?" "तू राजा होणार नाहीस पण तुझा मुलगा राजा होईल. जरा बघा, हे भौतिक हिशोब. तेव्हा त्यावेळी त्यांनी सांगितले, "नाही मी लग्न करणार नाही. एवढेच. मी वचन देतो. मी लग्न करणार नाही." तर ते ब्रम्हचारी राहिले. म्हणून त्यांचं नाव भीष्म. भीष्म म्हणजे दृढ, निश्चयी, तर ते ब्रम्हचारी राहिले. वडिलांच्या इंद्रिय संतुष्टीसाठी ते ब्रम्हचारी राहिले.