MR/Prabhupada 0284 - माझी प्रकृती अधिनस्थ होण्याची आहे



Lecture -- Seattle, September 30, 1968

तर हि कृष्णभावनामृत चळवळ खूप सोपी आहे. खूप सोपी. विशेषकरून हि चैतन्य महाप्रभूंनी सुरु केली, जरी ती फार प्राचीन आहे, वैदिक शास्त्रामध्ये, पण तरीही,ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहता, हि कृष्णभावनामृत चळवळ तेव्हापासून आहे जेव्हा पाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्ण या धर्तीवर अवतरित झाले. आणि नंतर, पाचशे वर्षपूर्वी चैतन्य महाप्रभु, त्यांनी या कृष्णभावनामृत चळवळीचा विस्तार केला त्याचे कार्य, भगवान चैतन्याचे कार्य, आराधयो भगवान व्रजेश-तनयः. जर आपण प्रेम करू इच्छित असाल, किंवा आपण अधिनस्थ होऊ इच्छित असाल… प्रत्येकजण अधीन आहे. हे खोटे आहे. प्रत्येकजण स्वतंत्र होऊ इच्छित आहे, पण कोणीही स्वतंत्र नाही. प्रत्येकजणअधिनस्थ आहे. कोणी म्हणू शकत नाही की "मी स्वतंत्र आहे." तुम्ही म्हणू शकता,तुमच्यापैकी कोणी, की तुम्ही स्वतंत्र आहात? कोणी आहे का? नाही. प्रत्येकजण स्वेच्छेने अधीन आहे. सक्तीने नाही. प्रत्येकजण अधिनस्थ होतो. एक मुलगी एका मुलाला सांगते, "मी तुझ्या अधीन होऊ इच्छिते," स्वेच्छेने. त्याचप्रमाणे एक मुलगा एका मुलीला सांगतो, "मला तुझ्या अधीन राहायचे आहे." का? तो माझा स्वभाव आहे. मला अधीन राहण्याची इच्छा आहे कारण माझा स्वभाव अधीन राहण्याचा आहे. पण मला माहित नाही. मी प्राधान्य देतो… मी अधीन होणे नाकारतो, मी आणखी एकाप्रकारे अधीन होणे स्वीकारतो. पण अधीनता आहे. ज्याप्रमाणे कामगार. तो इथे काम करतो. त्याला दुसऱ्या ठिकाणी अधिक चांगले वेतन मिळते, तो तिथे जातो. पण त्याचा अर्थ असा नाही तो स्वतंत्र झाला. तो अधीन आहे. तर चैतन्य महाप्रभु शिकवतात की जर तुम्हाला अधीन व्हायचे असेल किंवा कोणाचीतरी पूजा करायची असेल तर… कोण कोणाची पूजा करते? जोपर्यंत तुम्ही मानत नाही की कोणी तुमच्यापेक्षा मोठा आहे.तुम्ही का त्याची पूजा कराल? मी माझ्या मालकाची आराधना करतो कारण मला वाटते की तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो मला मजुरी,पगार महिन्याला सहाशे डॉलर्स देतो. म्हणून मी त्याची आराधना करेन, मला त्याला खुश केले पाहिजे. तर चैतन्य महाप्रभु सांगतात की तुम्ही श्रीकृष्णांचे अधिनस्थ बना. आराधयो भगवान व्रजेश-तनयः. जर तुम्हाला पूजा करायची असेल,तर श्रीकृष्णांची पूजा करा. आणि पुढे, तद-धामं वृंदावनं. जर तुम्हाला कोणाचीतरी पूजा करायची असेल, तर श्रीकृष्णांवर प्रेम करा किंवा श्रीकृष्णांची किंवा त्याचे धाम वृंदावन त्याची पूजा करा. कारण प्रत्येकजण कुठेतरी प्रेम करू इच्छित आहे. ते आता राष्ट्रीयत्व - काही देश आहेत. कोणी म्हणते, "मी या अमेरिकन भूमीवर प्रेम करतो." कोणी म्हणते, "मी या चायनीज भूमीवर प्रेम करतो." कोणी म्हणते, "मी रशियन भूमीवर प्रेम करतो." तर प्रत्येकजण कुठल्यातरी भूमीवर प्रेम करू इच्छित आहे. भौम इज्य-धीह. भौम इज्य-धीह. लोक नैसर्गिकरित्या काही भौतिक जमिनीवर प्रेम करतात. साधारणपणे,जिथे तो जन्म घेतो त्या भूमीवर तो प्रेम करण्याचा प्रयत्न करतो. चैतन्य महाप्रभु सांगतात की "कारण तुमची कोणावरतरी प्रेम करायची प्रवृत्ती आहे,तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम करा. कारण तुम्ही कोणत्यातरी भूमीवर प्रेम करता, तुम्ही वृन्दावन भूमीवर प्रेम करा." आराधयो भगवान व्रजेश-तनयः.तद-धामं वृंदावनं. पण जर कोणी म्हणाले, "श्रीकृष्णांवर प्रेम कसे करायचे? मी श्रीकृष्णांना पाहू शकत नाही. श्रीकृष्णांवर प्रेम कसे करायचे?" मग चैतन्य महाप्रभु सांगतात,रम्या काचिद उपासना व्रजवाढू-वर्गेन या कल्पिता. जर तुमची शिकायची इच्छा असेल,जर तुमची श्रीकृष्णांची पूजा करायची किंवा प्रेम करायची पद्धत जाणून घ्यायची इच्छा असेल, फक्त गोपींच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा. गोपी. गोपींचे प्रेम - प्रेमाची सर्वोच्च परिपूर्णता. रम्या काचिद उपासना. या जगात पूजा किंवा उपासना करायचे वेगवेगळे प्रकार आहेत. सुरवात आहे, "देवा, आम्हाला आमची रोजची भाकरी द्या." हि सुरवात आहे. आपण आहोत, मला म्हणायचं आहे, जेव्हा देवावर प्रेम करायला शिकवले जाते, आपल्याला असे शिकवले जाते. "तुम्ही देवळात जा,चर्चमध्ये जा, आणि देवाकडे प्रार्थना करा तुमच्या जीवनावश्यक गरजांसाठी, गाऱ्हाणे घाला." ती सुरवात आहे. पण ते शुद्ध प्रेम नाही. शुद्ध प्रेम, शुद्ध प्रेमाची परिपूर्णता, गोपींमध्ये आढळू शकते. ते उदाहरण आहे. कसे? त्या श्रीकृष्णांवर प्रेम कश्या करतात? त्या श्रीकृष्णांवर प्रेम करतात. श्रीकृष्ण गेले… श्रीकृष्ण गुराख्याचे मुलगा होते,आणि त्याचे मित्र, इतर गुराखी मुले, ते पूर्ण दिवस गुरे चारण्यासाठी रानात घेऊन जात. ती पद्धत होती. कारण त्यावेळी लोक जमिन आणि गुरे यावर समाधानी असत. एवढेच. तो उपाय आहे सर्व आर्थिक समस्यांवर. ते कारखानदार नव्हते, ते कोणाचेही नोकर नव्हते. जमिनीपासून उत्पन्न मिळवा आणि गाईपासून दूध घ्या, संपूर्ण अन्नाचा प्रश्न सुटेल.