MR/Prabhupada 0293 - बारा प्रकारचे रस,भाव आहेत



Lecture -- Seattle, October 4, 1968

कृष्ण म्हणजे "सर्व आकर्षक." तो प्रेमी लोकांसाठी आकर्षक आहे, तो ज्ञानी लोकांसाठी आकर्षक आहे, राजकारण्यानसाठी आकर्षक आहे, तो शास्त्रज्ञांसाठी आकर्षक आहे, दुष्टांसाठी आकर्षक आहे, दुष्ट सुद्धा. जेव्हा श्रीकृष्ण कंसाच्या राज्यात आले, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पाहिले. ज्यांना वृदावन मधून आमंत्रण दिले होते, त्या तरुण मुली होत्या. त्यांनी श्रीकृष्णांना पाहिले, "सर्वात सुंदर व्यक्ती." कुस्ती करणाऱ्या लोकांनी, त्यांना वज्रासारखे पाहिले. त्यांनी सुद्धा श्रीकृष्णांना पाहिले, पण ते म्हणाले, "ते पहा वज्र." ज्याप्रमाणे तुम्ही कितीही बलवान असलात तरी, जर वीज पडली तर सर्वकाही नष्ट होईल. तर कुस्ती करणाऱ्यांनी श्रीकृष्णांना वज्रासारखे पाहिले, हो. आणि वयोवृद्ध लोक, महिला, त्यांनी श्रीकृष्णांना प्रेमळ मुलाप्रमाणे पाहिले. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे श्रीकृष्णांबरोबर संबंध प्रस्थापित करू शकता. बारा प्रकारचे रस आहेत. ज्याप्रमाणे कधीकधी आपल्याला नाटकात करुणास्पद दृश्य पाहायचे असते, भयानक दृश्य. कोणीतरी कोणाचातरी खून करत आहेआणि आपण ते पाहून त्यात आनंद घेतो. काही प्रकारच्या व्यक्ती आहेत… वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. मॉन्ट्रियलमधील आमच्या एका शिष्याने सांगितले की त्याचे वडील स्पेनमध्ये बैलांच्या लढाईत आनंद घेत. जेव्हा बैल लढाईत मारला जायचा, ते त्यात आनंद घेत - वेगवेगळ्या प्रकारची माणसे. एक व्यक्ती पाहते, "हे भयंकर आहे," दुसरी व्यक्ती आनंद घेते, "हे खूप छान आहे." तुम्ही पहा? तर श्रीकृष्ण सामावून घेऊ शकतात. जर तुम्हाला भयानक गोष्टींवर प्रेम करायचे असेल, श्रीकृष्ण तुम्हाला नृसिहादेवाच्या रूपात सादर करू शकतात, (हशा) होय. आणि जर तुम्हाला श्रीकृष्ण प्रेमळ मित्राच्या रूपात पाहायचे असतील, ते वमसीधारी, वृन्दावन-विहारी आहेत. जर तुम्हाला श्रीकृष्ण प्रेमळ मुलाच्या रूपात हवे असतील, तर ते आहेत गोपाळ. जर तुम्हाला प्रेमळ मित्रासारखे हवे असतील, ते आहेत अर्जुन. अर्जुन आणि श्रीकृष्णांसारखे. तर बारा प्रकारचे रस आहेत. श्रीकृष्ण सर्व प्रकारचे रस सामावून घेतात; म्हणून त्यांचे नाव अखिल-रसामृत-सिंधू आहे. अखिल-रसामृत-सिंधू. अखिल म्हणजे सार्वभौमिक; रस म्हणजे मधुर, भाव;आणि महासागर. जर तुम्ही पाणी शोधण्याचा प्रयत्न केलात, आणि पॅसिफिक महासागराच्या इथे गेलात, ओह, अमर्यादित पाणी. तिथे किती पाणी आहे याची तुलना नाही. ज्याप्रमाणे, जर तुम्हाला काही हवे असेल आणि जर तुम्ही श्रीकृष्णांकडे गेलात, तुम्हाला अमर्याद पुरवठा, असीमित पुरवठा, महासागराप्रमाणे मिळेल. म्हणून भगवद् गीतेत म्हटले आहे. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः . जर कोणी त्या परम पुरषोत्तम पर्यंत पोहोचला किंवा प्राप्त करू शकला. मग तो समाधानी होईल आणि तो म्हणेल, "ओह, आता मला काही आकांशा नाही. मला सर्वकाही मिळाले आहे, पूर्ण समाधान." यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन्स्थितो. आणि जर एखादा त्या दिव्य स्थितीत असेल, तर काय होते? गुरुणापि न दुःखेन विचाल्यते (भ.गी. ६.२०-२३) जर दुःखाची तीव्रता खूप असेल, तो नाही, मला म्हणायचे आहे, लटपटणार नाही. श्रीमद्-भागवतामध्ये अनेक उदाहरणे आहेत. ज्याप्रमाणे भगवद्-गीतेत पडवांना अनेक दुःख भोगावी लागली, पण ते गांगरले नाहीत. त्यांनी कधीही श्रीकृष्णांना विचारले नाही," माझ्या प्रिय कृष्णा, तुम्ही माझे मित्र आहात. तुम्ही आमचे मित्र आहात, पाडव. आम्हाला अडचणींच्या इतक्या गंभीर चाचणीतून का जावे लागत आहे?" नाही. त्यांनी कधीही विचारले नाही. कारण त्यांना विश्वास होता. "या सर्व अडचणी असूनही," आपण विजयी होऊ कारण आपल्या बरोबर श्रीकृष्ण आहेत. कारण श्रीकृष्ण आहेत." विश्वास. याला शरणागती म्हणतात, आत्मसमर्पण.