MR/Prabhupada 0296 - जरी प्रभू येशू ख्रितांना वधस्तंभावर चढवले, तरी त्यांनी आपले मत कधीही बदलले नाही



Lecture -- Seattle, October 4, 1968

वेदांमध्ये देव असल्याबाबतचा पुरावा आहे. प्रत्येक ग्रंथात, प्रत्येक महान व्यक्तिमत्व, भक्त, देवाचे प्रतिनिधी… येशू ख्रिस्ताप्रमाणे, त्यांनी देवाची माहिती दिली. जरी त्यांना वधस्तंभावर चढवले, तरी त्यांनी कधीही आपले मत बदलले नाही. तर वेद,महान व्यक्ती, ग्रंथामधून आपल्याकडे पुरावे आहेत, तरीसुद्धा, जर मी म्हणालो. "देव मृत आहे. तेथे देव नाही," तर मी काय प्रकारचा माणूस आहे? याला असुर म्हणतात. ते यावर विश्वास ठेवणार नाही. ते कधीही विश्वास ठेवणार नाहीत… अगदी उलट असुर बुधा आहे. बुधा म्हणजे अतिशय बुद्धिमान, ज्ञानी मनुष्य. चैतन्य चरितामृतात असे सांगितले आहे, म्हणून, कृष्ण ये भजे से बडा चतुर. जो कोणी श्रीकृष्णांकडे आकर्षिला जातो आणि त्यांच्यावर प्रेम करतो… आराधना म्हणजे प्रेम. सुरवातीला ती आराधना असते, पण शेवटी ते प्रम असते. आराधना. तर इति मत्वा भजन्ते मां बुधा. जो कोणी ज्ञानी आहे, जो कोणी हुशार आहे, ज्याला माहित आहे की श्रीकृष्ण सर्व कारणांचे कारण आहेत…

  ईश्वरः परमः कृष्ण: 
  सच्चिदानन्दविग्रहः 
  अनादिरादिर्गोविन्दः 
  सर्वकारणकारणम् (ब्रम्हसंहिता ५.१) सर्वकारण: 

प्रत्येक गोष्टीला कारण आणि परिणाम आहे. जर तुम्ही शोधात गेलात याचे काय कारण आहे, याचे काय कारण आहे, याचे काय कारण आहे, तर तुम्हाला श्रीकृष्ण सापडतील. सर्वकारणकारणम् आणि वेद सांगतात, जन्माद्यस्य यतोsन्वयात (श्रीमद भागवतम १.१.१) | तुम्ही म्हणू शकत नाही की काहीगोष्टी आपोआप उगवतात. तो मूर्खपणा आहे. प्रत्येक पिढीला उगमस्थान आहे. प्रत्येक. ती बुद्धिमत्ता आहे. असं म्हणू नका… ज्याप्रमाणे, आधुनिक विज्ञान सांगते, की "एक मोठा भाग होता आणि निर्मिती होती - कदाचित." ते सुद्धा आहे "कदाचित," आपण पाहू शकता. तर या प्रकारचे ज्ञान निरुपयोगी आहे. आपण शोधणे आवश्यक आहे. जर मी वैज्ञानिकांना विचारले, " या भागाचे कारण काय आहे?" ते उत्तर देऊ शकत नाहीत. तर कारण शोधून काढा, आणि तुम्हाला ते सापडेल… जर मी शोधू शकलो नाही,तर आपण अनुसरण केले पाहिजे… महाजनो येन गतः स पंथाः (चैतन्य चरितामृत मध्य १७.१८६) | आपण अधिकृत आचार्यांचे अनुसरण केले पाहिजे. जर तुम्ही ख्रिश्चन असाल, तर येशू ख्रिस्ताचे अनुसरण करा. ते म्हणतात, "देव आहे." मग तुम्ही देव आहे स्वीकार करा. ते म्हणतात की "देवाने हे निर्माण केले आहे." ते म्हणाले की 'निर्मिती होऊ द्या,' आणि निर्मिती झाली. तर आपण हे स्वीकारले, "होय देवाने निर्माण केले." इथे भगवद् गीतेत सुद्धा भगवंत सांगतात, कृष्ण सांगतात, अहं सर्वस्य प्रभवो (भ.गी. १०.८), "मी मूळ आहे." तर भगवंत निर्मितीचे मूळ आहेत. सर्वकारणकारणम् (ब्रम्हसंहिता ५.१) ते सर्व कारणांचे कारण आहेत. तर आपण महान व्यक्तींचे उदाहरण घेतले पाहिजे. आपण अधिकृत पुस्तके आणि वेद अभ्यासले पाहिजेत, आणि आपण त्यांचे अनुसरण केले पाहिजे. मग कृष्णभावनामृत किंवा देव जाणणे किंवा देव चेतना कठीण नाही. ते अतिशय सोपे आहे. नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, देव जाणण्याच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही. सर्वकाही तिथे आहे. भगवद् गीता आहे, श्रीमद भागवत आहे. अगदी तुम्ही स्वीकार केलेत. बायबल आहे, कुराण आहे, सर्वकाही. देवाशिवाय, कोणतेही पुस्तक किंवा ग्रंथ असू शकत नाही. अर्थात,आजकाल, ते अनेक गोष्टी निर्माण करत आहेत. पण कोणत्याही मानवी समाजात देवाची संकल्पना आहे - वेळेनुसार,लोकांनुसार,पण कल्पना आहे. आता तुम्ही समजले पाहिजे, जिज्ञासा. म्हणून वेदांत-सूत्र सांगते की तुम्ही प्रश्न विचारून देव समजण्याचा प्रयत्न करा. चौकशी करून. हि चौकशी खूप महत्वाची आहे.