MR/Prabhupada 0297 - जो परम सत्य जाणण्यासाठी जिज्ञासू आहे त्याला अध्यात्मिक गुरुची गरज आहे



Lecture -- Seattle, October 4, 1968

आपल्या प्रक्रियेत, आदौ गुर्वाश्रयं सद्-धर्म प्रच्चात. एखाद्याने प्रमाणित अध्यात्मिक गुरु स्वीकारला पाहिजे आणि त्याने त्यांच्याकडून चौकशी केली पाहिजे, सद्-धर्म प्रच्चात. त्याचप्रमाणे, श्रीमद भागवतं सुद्धा सांगते की जिज्ञासू: श्रेय उत्तमम. "एखादा परम सत्य जाणण्यासाठी जिज्ञासू असला पाहिजे, त्याला अध्यात्मिक गुरुची गरज आहे." तस्माग्दुरूं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम् (श्रीमद भागवतम ११.३.२१) | जिज्ञासु म्हणजे चौकस, जो चौकशी करतो. जिज्ञासा नैसर्गिक आहे. एका मुलाप्रमाणे: आपल्या आयुष्याच्या प्रगतीसह तो पालकांकडे विचारतो. "बाबा, हे काय आहे? आई, हे काय आहे? ते काय आहे? ते काय आहे?" हे छान आहे. मुलगा, मुल, जो विचारतो आहे, त्याचा अर्थ तो खूप बुद्धिमान मुलगा आहे. म्हणून आपण बुद्धिमान असले पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे, जिज्ञासू. ब्रम्ह- जिज्ञासा. हे आयुष्य ब्रम्ह-जिज्ञासा करण्यासाठी आहे, देवाला समजण्यासाठी,चौकशी करण्यासाठी आहे. मग आयुष्य यशस्वी होते. अथातो ब्रम्ह जिज्ञासा. आणि चौकशी, चौकशी, चौकशी, समजणे, समजणे, समजल्यावर मग अंतिम टप्पा काय आहे? भगवद् गीतेमध्ये असे सांगितले आहे. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते (भ.गी. ७.१९) | अनेक अनेक जन्मांच्या चौकशी नंतर, जेव्हा एक वास्तविक हुशार व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती बनते, मग काय होते? कृष्ण असे सांगतात. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते: "ती मला शरण येते," का? वासुदेव: सर्वमिति. तो जाणतो की वासुदेव, कृष्ण, सर्व कारणांचे परमकारण आहेत. स महात्मा सुदुर्लभः. पण अशा प्रकारचा महान व्यक्ती खूप दुर्लभ आहे. हे समजण्यासाठी. म्हणून चैतन्य चरितामृतात सांगितले आहे, सेई बडो चतुर: तो खूप बुद्धिमान आहे. तर या बुद्धिमान मनुष्यांच्या व्याख्या आहेत. जर आपण बुद्धिमान बनू इच्छित असलो, तर कसे बुद्धिमान बनायचे या पद्धतीचा स्वीकार करू शकतो. पण दुसऱ्या बाजूला, जर आपण वास्तविक बुद्धिमान असू, तर का नाही लगेच कृष्णभावनामृत स्वीकारायचे आणि बुद्धिमान बनायचे? पद्धतीनुसार जाण्याऐवजी, तुम्ही स्वीकारा… ती उदार अवतार श्री चैतन्य महाप्रभूंनी तुम्हाला दिली आहे. त्यांनी तुम्हाला दिले आहे, कृष्ण-प्रेम-प्रदायते (चैतन्य चरितामृत मध्य १९.५३) । ते तुम्हाला कृष्ण प्रेम देत आहेत. रूप गोस्वामींनी चैतन्य महाप्रभूंना नमस्कार केला. नमो महा वदान्याय कृष्ण-प्रेम-प्रदायते: "माझ्या प्रिय चैतन्य महाप्रभु, तुम्ही सर्वात दयाळू, सर्व अवतारामध्ये उदार आहात. का? कारण तुम्ही कृष्ण प्रेम सर्वाना देत आहात. कृष्ण प्रेम जे जन्मजन्मांतर मिळू शकत नाही. तुम्ही ते स्वस्तरित्या देत आहात, 'ताबडतोब घ्या.' नमो महा वदान्याय कृष्ण-प्रेम-प्रदायते कृष्णाय कृष्ण-चैतन्य. ते समजू शकतात की "तुम्ही कृष्ण आहात"; नाहीतर कोणालाही कृष्ण प्रेम देणे शक्य नाही कृष्ण-प्रेम, एवढ्या स्वस्तात. "तुम्ही कृष्ण आहात, तुम्हाला ती शक्ती मिळाली आहे." आणि आणि वास्तविक ते आहेत. कृष्ण स्वतः कृष्ण-प्रेम द्यायला अपयशी ठरले, कृष्ण-प्रेम, जेव्हा ते व्यक्तिशः आले होते आणि त्यांनी भगवद्-गीता शिकवली. त्यांनी केवळ संगितले, सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ.गी. १८.६६) । पण लोकांनी गैरसमज करून घेतला. म्हणून श्रीकृष्ण भक्ताच्या रूपात आले आणि सर्वसामान्य लोकांना कृष्ण-प्रेम देऊ केले. तर आमची सर्वाना विनंती आहे की ह्या कृष्णभावनामृत चळवळीचा स्वीकार करा. आणि तुम्हाला वाटेल की "मला आणखी काही नको आहे, अजून काही नको. मी समाधानी आहे, पूर्ण समाधानी." खुप खूप आभार.