MR/Prabhupada 0328 - हे कृष्ण भावनामृत आंदोलन सर्वाना सामावून घेणारे आहे



University Lecture -- Calcutta, January 29, 1973


हे कृष्णभावनामृत आंदोलन सर्वांना कवेत घेणारे आहे. ते सर्व प्रकारच्या समस्या सोडवू शकते - राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सर्वच. ते सर्वांना कवेत घेणारे आहे. त्यामुळे माझी ही विनंती आहे की मी आता माझ्या अमेरिकन व युरोपीय शिष्यांसोबत हे कार्य करीत आहे. मग भारतीयांसोबत का नाही? मला वाटते की या सभेत अनेक तरुण व शिक्षित, विद्वान लोक उपस्थित आहेत. या आंदोलनात सहभागी व्हा, आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या आदेशाप्रमाणे,

भारतभूमिते मनुष्य जन्म हैल यार ।
जन्म सार्थक करि कर परोपकार ।। (चैतन्य चरितामृत अादि ९.४१)


संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याची हीच वेळ आहे. सर्वत्र ते गोंधळात पडलेले आहेत. तुम्हाला पाश्चात्य देशांतील हिप्पी चळवळ माहीत आहे. हे हिप्पी कोण आहेत? ते फारच सुशिक्षित आहेत, फार श्रीमंत घरांतील आहेत, परंतु त्यांच्या वाडवडिलांना ज्या वातावरणाची आवड होती ते वातावरण त्यांना आवडत नाही. त्यांनी ते वातावरण नाकारले आहे. त्यामुळे श्रीकृष्णांच्या या संप्रदायाचा प्रचार जगभर करण्याची हीच सुवर्णसंधी आहे. तुमच्या देशाचा काही भाग पाकिस्तानच्या रूपाने तुमच्याकडून हिसकावून घेण्यात आला आहे यासाठी तुम्ही शोक करत आहात, पण जर तुम्ही या कृष्णभावनामृत आंदोलनाचा प्रचार करणार, तर हे संपूर्ण जगच हिंदुस्थान होईल. त्यात इतकी शक्ती आहे; मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. लोक त्याच्यासाठी आतुर आहेत. भारतात राहून मी माझा वेळ वाया घालवत आहे.

भारताबाहेर मात्र या आंदोलनाला इतक्या गंभीरतेने स्वीकारले जात आहे की माझा प्रत्येक क्षण योग्यपणे वापरला जात आहे. तर मी या संस्थेत या आशेने आलो आहे कि तुमच्यापैकी काही जण खरच ब्राह्मण बनतील . संस्कृत शाखा ब्राह्मणांसाठीच आहे . पठाण पाठन यजन याजन दान प्रतिग्रह . ब्राह्मणाला पंडित म्हंटले जाते . का ? कारण ब्राह्मणाने शिकले पाहिजे . ब्राहामाणाला मूर्ख नाही म्हणत . तर हि शाखा , संस्कृत शाखा , ब्राह्मणांसाठी बनली आहे . तर माझी इछा आहे , तुमच्यापैकी काहींनी या चळवळीत सहाभागी व्हावे , परदेशी जावे , चैतन्य महाप्रभूंच्या या पूजनीय पद्धतीचा प्रसार करावा . प्रीथवे आचे यत नगरादी ग्राम . तिथे खुप गरज आहे . आपण नक्कीच बरेच मंदिर बांधले आहेत ,तरीही आपल्याला मंदिर बांधावे लागेल , राधा कृष्ण मंदिर , चैतन्य महाप्रभू मंदिर , प्रत्येक गावामध्ये , जगातल्या प्रत्येक शहरामध्ये . आता आपल्या प्रत्येक केंद्रातून आपण भक्तांना बस मधून पाठवत आहोत . ते युरोप आणि अमेरिकेतल्या दुर्गम भागात जात आहेत आणि त्यांचे स्वागत होत आहे . विशेषतः इंग्लंड , ते गावो गावी जात आहेत .

त्यांचे चांगले स्वागत होत आहे , हि प्रथा इतकी चांगली आहे . क्रिश्चन पादरी सुद्धा आश्चर्यचकित आहेत . एका पदारीने , त्याने सूचना पत्र काढले कि हि मुले आमची आहेत , क्रिश्चन आणि ज्यू . या चळवळी पूर्वी त्यांना चर्च मध्ये यायची सुद्धा काळजी नव्हती .आता ते देवामागे वेडे झाले आहेत . " ते स्वीकार करत आहेत " क्रिश्चन पादरी वर्ग , ते आमच्या विरोधात नाहीत . जे बुद्धिमान आहेत ते स्वीकारत आहेत , "स्वामीजी आम्हाला काहीतरी चांगले देत आहेत " त्यांचे वडील आणि आजोबा माझ्याकडे येतात . प्रणाम करतात . ते म्हणतात , " स्वामीजी हे आमच्या साठी भाग्याचे आहे कि तुम्ही आमच्या देशात आलात . "

तर मी एकटा काम करत आहे , आणि चळवळीला प्रोत्साहन मिळात आहे . आणि जर विद्वान व्यक्ती या संस्थेतून पुढे येतील आणि हि चळवळ शिकवतील ...ते यासाठीच आहे . ब्राह्मणाचा व्यवसाय आहे शिकवणे . ब्रह्म जानाती . त्याने ब्रह्मण जाणून घ्यावे आणि ब्रह्मज्ञानाचा प्रसार करावा . तोच ब्राह्मणाचे कार्य आहे .