MR/Prabhupada 0338 - या लोकशाहीला काय अर्थ आहे, सर्व मूर्ख आणि दुष्ट



Lecture on BG 1.31 -- London, July 24, 1973

चतुर्विधा भजन्ते मां सुकृतिन. सुकृतिन म्हणजे पुण्यवान. कृति म्हणजे सांसारिक कार्यात कुशल असणे. म्हणून कोणी पवित्र कार्यात गुंतला आहे, त्यांना सुकृति म्हणतात. दोन प्रकारची कार्ये आहेत. अशुद्ध, पापी कार्य; आणि पवित्र कार्य. तर जो कोणी चर्चमध्ये किंवा देवळात जाऊन प्रार्थना करतो, "हे देवा, आम्हाला आमाची रोजची भाकरी," किंवा मला काही पैसे द्या," किंवा "देवा, मला या संकटातून मुक्त करा," ते देखील पुण्यवान आहेत. ते पापी नाहीत. पापी लोक, ते कधीही देवाला,कृष्णांना शरण जाणार नाहीत. न मां दुकृतींनो मुढाः,प्रपद्यन्तेनराधमाः (भ.गी. ७.१५) । पुरुषांचा हा वर्ग, पापी पुरुष दुष्ट, मानवजातीच्या सर्वात खालच्या दर्जाचे. ज्यांचे ज्ञान माया आणि राक्षसीवृत्तीने व्यर्थ गेले आहे. या वर्गात मोडणारी माणसे देवाला कधीही शरण जात नाहीत. म्हणून ते दुष्कृतीन, दुष्ट आहेत.

तर कृष्ण शुद्ध आहे, पण तरीही त्याला कुटुंबाचा लाभ हवा होता. हा त्याचा दोष आहे. अर, अर्जुन, कौटुंबिक समृद्धी. त्याला समाज, मित्र, आणि प्रेमाच्या माणसांबरोबर रहायचा आहे. म्हणून त्यानी सांगितले न कांक्षे विजयं. त्याला म्हणतात वैराग्य. स्मशान-वैराग्य. त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. स्मशान म्हणजे भारतामध्ये, हिंदू, ते शरीराचे दहन करतात. नातलग मृत शरीर स्मशान घाटावर दहन करायला नेतात, आणि जेव्हा शरीराचे दहन होते, तिथे उपस्थित असलेले सर्वजण, काही वेळेपुरते, ते विरक्त बनतात. "अरे, हे शरीर आहे. या शरीरासाठी आपण काम करत होते. आता ते संपले. त्याची राख झाली आहे. मग काय फायदा आहे?" या प्रकारचे वैराग्य, विरक्ती, तिथे असते. पण जेव्हा तो स्मशानातून बाहेर येतो, तो परत त्याच्या कार्याला सुरवात करतो. स्मशानात तो विरक्त बनतो. जसा तो घरी येतो,जोरदार, नेटाने कमवायला लागतात, पैसे कसे मिळवायचे, पैसे कसे मिळवायचे, पैसे कसे मिळवायचे.

तर अशा प्रकारच्या वैराग्याला स्मशान वैराग्य म्हणतात, क्षणिक. तो वैरागी बनू शकत नाही. आणि तो म्हणतो, न कांक्षे विजयम: (भ.गी. १.३१) "मला विजय नको आहे. मला हे नको आहे." हि क्षणिक भावना आहे. क्षणिक भावना. हे लोक, ते कौटुंबिक जीवनाशी बांधले गेलेले असतात. ते असे म्हणू शकतात की, "मला हे सुख नको आहे, हि छान परिस्थिती, विजय नको. मला हे नको आहे." पण त्याला सर्वकाही हवे आहे. त्याला सर्व हवे आहे. कारण त्याला माहित नाही की श्रेयस काय आहे. श्रेयस कृष्ण आहे. प्रत्यक्षात, जेव्हा एखाद्याला कृष्ण किंवा कृष्ण भावना प्राप्त होते, मग तो म्हणतो की "मला हे नको आहे." ते असे म्हणणार नाहीत की. "मला हे नको आहे?" ते असे का म्हणतील. इथे आपल्याला काय मिळाले आहे? समजा मला राज्य मिळाले आहे. तर ते माझे राज्य आहे? नाही ते कृष्णाचे राज्य आहे. कारण कृष्ण म्हणतात भोक्तारं यज्ञ-तपसां सर्व-लोक-महेश्वरं (भ.गी. ५.२९) । तो मालक आहे. मी त्याचा प्रतिनिधी असू शकतो. कृष्णांची इच्छा प्रत्येकजण कृष्णभावनामृत व्हावा अशी आहे. कृष्णाचा प्रतिनिधी म्हणून राजाचे कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकाला कृष्णभावनामृत बनवणे. मग तो चांगले कर्तव्य करत आहे. सम्राटांनी तसे केले नाही, म्हणून आता सर्वत्र राजेशाही संपुष्टात आली आहे. म्हणूनच पुन्हा राजेशाही, जेथे राजेशाही आहे, थोड्या प्रमाणात, कमीतकमी राजेशाहीचा देखावा आहे, ज्याप्रमाणे इथे इंग्लंडमध्ये, खरं तर जर सम्राट कृष्णभावनामृत बनला, कृष्णाचा प्रतिनिधी बनला, मग संपूर्ण राज्याचा चेहरा बदलेल. ते आवश्यक आहे. आमचे कृष्णभावनामृत अंदोलन हे त्या हेतूसाठी आहे. आम्हाला तथाकथित लोकशाही फारशी आवडत नाही. या लोकशाहीला काय अर्थ आहे? सगळे मूर्ख आणि नालायक. ते इतर मूर्ख आणि नालायकांना मत देतात, आणि तो पंतप्रधान, किंवा हे किंवा ते बनला. ज्याप्रमाणे... बऱ्याच प्रकरणात. ते लोकांसाठी चांगले नाही. आम्ही या तथाकथित लोकशाहीच्या बाजूचे नाही कारण ते प्रशिक्षित नाहीत. जर राजा प्रशिक्षित असेल… ती राजेशाहीची पद्धत होती. ज्याप्रमाणे युधिष्ठिर महाराज किंवा अर्जुन किंवा कोणीही. सर्व राजे. राजर्षी. त्यांना राजर्षी म्हणतात.

इमं विवस्वते योगं
प्रोत्त्कवानहमव्ययम्
विवस्वान्मनवे प्राह
मनुरिक्ष्वाकवे अब्रवित्
(भ.गी. ४.१) ।

एवम परम्परा-प्राप्तम इमम राजर्षयो विदु: (भ.गी. ४.२) । राजर्ष. राजा म्हणजे, तो केवळ राजा नाही. तो महान ऋषी आहे संत व्यक्ती. ज्याप्रमाणे महाराज युधिष्ठिर किंवा अर्जुन.त्या संत व्यक्ती आहेत. ते सामान्य नाहीत, हा मद्यपी राजा, की, "मला इतके पैसे मिळाले आहेत. मला पिऊ द्या आणि वेश्येचे नृत्य असू दे." असे नाही की. ते राजा असले तरी ऋषी होते. अशा प्रकारचा राजा हवा आहे, राजर्षी. मग लोक सुखी होतील. बंगालीमध्ये म्हण आहे, राजर पापी राज नष्ट गृहिणी दोषे गृहस्थ भ्रष्ट. गृहस्थ आयुष्यात, कुटुंबिक जीवनात, जर पत्नी चांगली नसेल तर, मग त्या घरात कोणीही सुखी नसेल, गृहस्थ आयुष्य, कुटुंबिक जीवन, त्याचप्रमाणे, राज्यात, जर राजा पापी असेल, तर सर्वकाही, प्रत्येकाला त्रास होईल. हि अडचण आहे.