MR/Prabhupada 0341 - जो बुद्धिशाली असेल तो ही प्रक्रिया स्वीकार करेल



Lecture on BG 9.1 -- Melbourne, June 29, 1974

प्रभुपाद: हं?

मधुद्विश : तो विचारतोय श्रीकृष्णांनी कुठले ज्ञान अर्जुना कडे प्रगट केले?

प्रभुपाद: होय. श्रीकृष्ण सांगतात "तुम्ही हरामखोर, मला शरण या." तुम्ही सगळे हरामखोर आहात; तुम्ही श्रीकृष्णांना शरण जा. तर तुमचे जीवन सफल होईल. श्रीकृष्णांच्या शिक्षणाचे हे सारांश आणि तात्पर्य आहे.

सर्वधर्मान्परित्यज्य
मामेकं शरणं व्रज
(भ.गी.१८.६६)

श्रीकृष्ण फक्त अर्जुनाला सांगत नाहीत, ते आम्हा सगळ्यांना सांगत आहेत, सगळे हरामखोर, की, "तुम्ही आनंदी होण्यासाठी बर्‍याच गोष्टींचे उत्पादन करता. तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाही, खात्री बाळगा. पण मला शरण जा, मी तुम्हाला आनंदी ठेवीन." ही कृष्णभावना आहे, सर्व काही, एका ओळीत. तर जो बुद्धिमान आहे, तो ही प्रक्रिया आत्मसात करेल, की "मी आनंदी होण्यासाठी माझे भरपुर प्रयत्न केले, पण सगळे अपयशी ठरले. आता मला श्रीकृष्णांना शरण जाऊ दे.". त्यात सर्व काही.