MR/Prabhupada 0356 - आम्ही स्वैरपणे कार्य करत नाही. आम्ही शास्त्राकडून अधिकृत शिकवण स्वीकारत आहोत



Lecture at World Health Organization -- Geneva, June 6, 1974

प्रभुपाद : गोष्ट ही आहे की कोणीही बेरोजगार राहू नये याची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. तेच चांगले प्रशासन आहे. कोणीही बेरोजगार नाही. हीच वैदिक व्यवस्था आहे. समाज हा चार विभागांमध्ये विभागला गेला होता : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि राजाचे कर्तव्य होते हे पाहणे की, ब्राह्मण ब्राह्मणाचे कर्तव्य करीत आहे का, आणि क्षत्रियाचे कर्तव्य, क्षत्रिय, त्याचे कार्य हे क्षत्रियाचेच कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे, वैश्य... त्यामुळे प्रशासनाचे कर्तव्य आहे हे पाहणे की लोक का बेरोजगार आहेत. मग प्रश्न सुटतील. अतिथी : पण ते लोकही प्रशासनात आहेत. प्रभुपाद : हं?

अतिथी : तेसुद्धा... उच्चपदस्थ लोक, श्रीमंत लोक, जमिनींचे मालक, त्या सर्वांचाही प्रशासनात प्रबळ प्रभाव आहे.

प्रभुपाद : नाही. ते, ते म्हणजे एक खराब प्रशासन होय.

अतिथी : होय. ते, ते खरे आहे.

प्रभुपाद : ते एक वाईट प्रशासन आहे. अन्यथा, प्रत्येकाला रोजगार उपलब्ध आहे की नाही ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

अतिथी : मी त्याचीच वाट पाहत आहे, तो दिवस जेव्हा हे कृष्णभावनामृत आंदोलन एका क्रांतिकारी आंदोलनात परिणत होईल जे या समाजाचा चेहरामोहराच बदलवून टाकेल.

प्रभुपाद : होय. मला वाटते की ते क्रांति घडवून आणेल, कारण हे अमेरिकन व युरोपीय तरुण लोक, त्यांनी हे आपल्या हातात घेतले आहे. मी त्यांना ओळख करून दिली आहे. त्यामुळे माझी ही आशा आहे की ही युरोपीय व अमेरिकन मुले, ती खूपच बुद्धिमान आहेत, ते प्रत्येक गोष्ट गंभीरतेने स्वीकारतात. जेणेकरून... आता आम्ही काही वर्षांपासून कार्य करीत आहोत, पाच, सहा वर्षे. तरीही, आम्ही हे आंदोलन संपूर्ण जगभर पसरविले आहे. त्यामुळे मी विनंती करत आहे… मा एक वृद्ध मनुष्य आहे. मी मरण पावेन. जर ते याला गंभीरपणे स्वीकारतील, तर हे सुरू राहील, आणि क्रांती घडून येईल. कारण आम्ही स्वैरपणे, स्वतःच्या मर्जीनुसार कार्य करीत नाही. आम्ही शास्त्राकडून अधिकृत शिकवण स्वीकारत आहोत. आणि आम्ही... यासारखी किमान शंभर पुस्तके प्रकाशित करणे हा आमचा उद्देश आहे. आमच्याकडे खूप सगळे ज्ञान उपलब्ध आहे. लोक ही सगळी पुस्तके वाचून ते ज्ञान मिळवू शकतात. आणि आतातर आम्हाला स्वीकारलेही जात आहे. विशेषतः अमेरिकेत, विकसित वर्तुळांमध्ये, महाविद्यालयांत आणि विद्यापीठांमध्ये, लोक ही पुस्तके वाचत आहेत, आणि त्यांना ती आवडतही आहेत. त्यामुळे आम्ही सर्वाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहोत, या वैदिक साहित्याची ओळख करून देत आहोत, प्रत्यक्षपणे कृती करत आहोत, शिकवत आहोत, जितके शक्य असेल तितके करत आहोत. पण मला वाटते हि मुले, तरुण मुले, त्यानी ते गंभीरपणे घेतले, तर ते क्रांती घडवू शकेल.