MR/Prabhupada 0360 - आम्ही थेट कृष्णाजवळ जात नाही. आम्ही आमची सेवा कृष्णाच्या सेवकापासून सुरु करतो



Lecture on SB 7.9.42 -- Mayapur, March 22, 1976

तर इथे, को नु अत्र ते अखिल-गुरो भगवान प्रयास. तर प्रत्येकाला अतिरिक्त प्रयत्नांची गरज असते आपली मर्जी राखण्यासाठी, पण कृष्णांना त्याची गरज लागत नाही. ते श्रीकृष्ण आहेत. त्यानां जे आवडेल ते काहीही करू शकतात. ते इतरांवर अवलंबून नाहीत. इतर कृष्णांच्या मंजुरीवर अवलंबून असतात, पण कृष्णांना कोणाच्याही मंजुरीची आवश्यकता नाही. म्हणून प्रल्हाद महाराज सांगतात भगवान प्रयास. सल्ला दिला जातो प्रयास न करण्याचा, विशेषतः भक्तांना. असे कोणतेही कार्य करू नये ज्यात भरपूर कष्ट आहेत. नाही. आपण सोप्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्या शक्य आहेत.

अर्थात एक भक्त जोखीम घेतो. हनुमानाप्रमाणे. तो प्रभू रामचंद्रांचा सेवक होता. तर प्रभू रामचंद्रांना सीतादेवीची माहिती हवी होती. तर त्याने विचार केला नाही, "मी समुद्राच्या दुसऱ्या बाजूला, लंकेला कसा जाऊ?" त्यांनी केवळ, प्रभू रामचंद्रांवर विश्वास ठेवला, "जय राम," त्यावर उडी मारली. रामचंद्रांना पुलाची बांधणी करायची होती. अर्थात, तो पूल अद्भुत होता कारण माकडं दगड आणत होती. आणि ते समुद्रात फेकत होते, पण दगड तरंगत होता. तर कुठे आहे तुमचा गुरुत्वाकर्षणाचा नियम? उं?दगड पाण्यावर तरंगत होता.

हे शास्त्रज्ञांद्वारे केले जाऊ शकत नाही. पण प्रभू रामचंद्रांची इच्छा होती; एक दगड तरंगतो. अन्यथा किती दगड आपल्याला समुद्रात फेकावे लागतील की जे पूल बनण्याच्या पातळीपर्यंत येतील? ओह, ते शक्य नव्हते, ते शक्य होते, सर्वकाही शक्य होते, पण रामचंद्र, प्रभू रामचंद्रांना हवे होते, "हे सरळ होऊ दे. तर त्यांना दगड आणू दे आणि तो तरंगेल. मग आपण जाऊ." तर दगडशिवाय ते जाऊ शकत होते, पण त्यांना माकडांकडून काही सेवा हवी होती. बरीच माकडं होती. बरो बरो बदरे, बरो बरो पेट, लंका डींगके, मत करे हेत. तेथे अनेक माकडं होती, पण हनुमानासारखी सक्षम नव्हती. म्हणून त्यांनाही थोडी संधी दिली गेली की "तुम्ही काही दगड आणा. तुम्ही हनुमानासारखे समुद्रावर उडी मारू शकत नाही, तर तुम्ही दगड आणा, आणि मी दगडांना तरंगायला सागतो." तर श्रीकृष्ण काहीही करू शकतात. अङ्गानि यस्य सकलेन्दियवृत्तिमन्ति. ते काहीही करू शकतात. आपण त्यांच्या कृपेशिवाय काही करू शकत नाही.

तर प्रल्हाद महाराज विंनती करतात की " जर तुम्ही आमच्यावर दया केलीत, तर तुमच्यासाठी हे खूप मोठे अवघड कार्य नाही, कारण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. कारण तुम्ही निर्मिती,निर्वाह आणि विनाशाचे कारण आहात. तर हे तुमच्यासाठी कठीण नाही." त्याशिवाय, मुढेषु वै महद-अनुग्रह आर्त-बंधो. सामान्यतः, जे आर्त-बंधू आहेत, दुःखी मानवतेचे मित्र, ते विशेषतः मूढांवर, दुष्टांवर कृपा करतात. श्रीकृष्ण त्या हेतूने येतात कारण आपल्यापैकी प्रत्येकजण, आपण मूढ आहोत. दुष्कृतिनो. न माम दुष्कृत्तीनो मूढा: प्रपद्यन्ते. (भ.गी. ७.१५) ।

सामान्यतः आपण, कारण आपण पापी आहोत, कारण आपण मूढ आहोत, आपण श्रीकृष्णांना शरण जात नाही. न माम प्रपद्यन्ते. जो कोणी श्रीकृष्णांना शरण जात नाही, त्याचे दुष्कृतीन,मूढ, नराधम माययापहृत-ज्ञाना असे वर्गीकरण केले जाते. श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय काही करणे कधीही शक्य नाही. ते शक्य नाही. म्हणून जे स्वतंत्रपणे काम करण्याचा प्रयत्न करतात, कृष्णांच्या मर्जीशिवाय, ते मूढ, दुष्ट आहेत. ते श्रीकृष्ण जे सांगतात, ते स्वीकारणार नाहीत, आणि ते कृष्णाशिवाय काही कायदा स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. "भगवंतांची काही गरज नाही." हे असे आहे, बहुतेक शास्त्रज्ञ, ते असेच म्हणतात.

"आता आपल्याकडे विज्ञान आहे. आपण सर्व काही करू शकतो." ते शक्य नाही. तुम्ही स्वतंत्रपणे श्रीकृष्णांच्या कृपेशिवाय काही करू शकत नाही. म्हणून सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही थेट श्रीकृष्णांची कृपा मिळवू शकत नाही. तो आणखी एक वेगळा मुद्दा आहे. किम तेन ते प्रिय-जनान अनुसेवतं नः. तुम्ही श्रीकृष्णांपर्यंत पोहचू शकत नाही त्यांच्या भक्तांच्या कृपेशिवाय. यस्य प्रसादात भगवत-प्रसादः. तुम्ही थेट भगवंतांची कृपा मिळवू शकत नाही. तो आणखी एक मूर्खपणा आहे.

तुम्ही श्रीकृष्णांच्या सेवकांच्या मार्फत गेले पाहिजे. गोपी-भर्तृर पद कमलयोर दास-दास-दासानुदासः. हि आमची पद्धत आहे. आम्ही थेट कृष्णाजवळ जात नाही. आम्ही आमची सेवा कृष्णांच्या सेवकांपासून सुरु करतो. आणि कृष्णाचे सेवक कोण आहेत. जो कृष्णाच्या दासाचा दास बनला आहे. त्याला म्हणतात दास दासानुदास. कोणीही स्वतंत्रपणे कृष्णाचा दास बनू शकत नाही. तो आणखी एक मूर्खपणा आहे. कृष्ण कोणाचीही थेट सेवा स्वीकारत नाही. ते शक्य नाही. तुम्ही दासाचा दास त्याच्या मार्फत आले पाहिजे. (चैतन्य चरितामृत मध्य १३.८०) याला परंपरा प्रणाली म्हणतात.

जसे परंपरा प्रणालीद्वारे तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले… श्रीकृष्णांनी ब्रम्हाला सांगितले, ब्रम्हानी नारदांना सांगितले. नारदांनी व्यासदेवांना सांगितले आणि आपल्याला हे ज्ञान मिळत आहे. जसे की कृष्ण… कृष्णानी अर्जुनाला भगवद् गीता सांगितली. जर आपण अर्जुनाप्रमाणे हि प्रक्रिया समजण्याचा प्रयत्न केला नाही, तर तुम्ही कधीही कृष्ण किंवा देवाला समजण्यासाठी समर्थ बनू शकणार नाही. ते शक्य नाही. तुम्ही ती प्रकिया स्वीकारली पाहिजे जी अर्जुनाने स्वीकारली. अर्जुनाने हे हि सांगितले की "मी तुमचा स्वीकार करतो, पूर्णपुरुषोत्तम भगवान, कारण व्यासदेवानी स्वीकारले आहे, असितानी स्वीकारले आहे, नारदानी स्वीकारले आहे. तीच गोष्ट.

आपल्याला कृष्णाला समजून घ्यावे लागेल. आपण थेट समजू शकत नाही. म्हणून हे दृष्ट जे चुकीच्या अर्थाने थेट कृष्णाला समजण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सर्व दुष्ट आहेत ते कृष्णाला समजू शकत नाहीत. तो तथाकथित मोठा मनुष्य असू शकतो. कोणीही मोठा मनुष्य नाही. ते सुद्धा आहेत स वै… श्र्वविड्वराहोष्ट्रखरैः संस्तुतः पुरुषः पशुः (श्रीमद भागवतम् २.३.१९) पुरुषः पशुः हि मोठी मोठी माणसे ज्यांची काही दृष्टांद्वारे प्रशंसा केली जाते. सर्व मोठे मोठे नेते, ते काय आहेत. कारण ते कृष्ण भक्त नाहीत, ते नेतृत्व करू शकत नाहीत. ते फक्त दिशाभूल करतील. म्हणून आम्ही त्यांना दुष्ट मानतो. हि परीक्षा आहे. हि परीक्षा घ्या. कोणाकडूनही तुम्ही काही शिकू इच्छिता, सर्व प्रथम तो कृष्ण भक्त आहे का ते पहा. अन्यथा कोणताही धडा घेऊ नका. अशा व्यक्तीकडून आम्ही कोणताही धडा घेत नाही, "कदाचित," "असू शकेल," या सारखे. नाही. आम्हाला असे वैज्ञानिक किंवा गणितज्ञ नको आहेत. नाही. एखादा जो कृष्णाला जाणतो, जो कृष्ण भक्त आहे, ज्याला नुसते कृष्ण ऐकून परमानंद होतो, तुम्ही त्याच्याकडून धडा घ्या. नाहीतर सगळे दुष्ट. खूप खूप धन्यवाद.