MR/Prabhupada 0368 - तुम्ही मूर्खपणें विचार करत आहात की तुम्ही शाश्वत नाही



Morning Walk -- January 3, 1976, Nellore

प्रभुपाद : हि थिऑसॉफिकल सोसायटी आहे. मला वाटते, हं? हा ट्रेडमार्क. किंवा रामकृष्ण मिशन.

अच्युतानंद: नाही साल्वेशन आर्मी.

प्रभुपाद:साल्वेशन आर्मी, ओह.

हरीकेश: प्रत्यक्षात आम्हीच एक साल्वेशन आर्मी आहोत. (खंडित)

अच्युतानंद: … एका प्राधिकरणाचे अधिकार. आम्ही त्यांचे अधिकार स्वीकारत आहोत, पण त्यांचे अनुभव येतात प्रत्यक्ष अनुभूतीने, जे पुन्हा येतात…

प्रभुपाद: आम्ही असे अधिकारी घेत नाही जे इतरांकडून अनुभव घेतात. आम्ही अधिकार घेतो जे आहेत…

केशवलाल त्रिवेदी: अनुभवी.

प्रभुपाद: स्वयंचलितपणे. परास्य भक्तिर विविधैव श्रुयते स्वभाविकी ज्ञान-बल-क्रिया च. स्वभाव, तुम्ही करू शकता… ज्याप्रमाणे तुम्ही मला विचारलेत कि कसे काही करायचे. जर मी म्हणालो, होय,तू असे कर," स्वभाविकी. माझ्या स्वभावाने मला ज्ञान मिळाले आहे हे कसे उत्तम प्रकारे करायचे. हे चालू आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयाते सचराचरम (भ.गी. ९.१०) श्रीकृष्ण आदेश देतात की "तू अशाप्रकारे कर." तर तुम्ही पहाल, सर्वकाही परिपूर्ण होत आहे. कडुलिंबाच्या बीपासून कडुलिंबाचे झाड येईल हे खूप छान तऱ्हेने कृष्णाद्वारे केले गेले आहे कृष्ण-बिजो अहं सर्वभूतानां (भ.गी. ७.१०) (BG 9.10), की ते कडुलिंबाचे झाड येईल, आंब्याचे झाड नाही. रसायने अशी मिसळली आहेत. तुम्हाला कळणार नाही काय आहे, छोटी बी, वटवृक्ष. आणि मोठे वडाचे झाड येईल, दुसरे झाड नाही. ते ज्ञान आहे. त्यांनी संपूर्ण दिले आहे, मला म्हणायचे आहे, छोट्या बीमध्ये सर्व काही. म्हणून कृष्ण सांगतात, बिजो अहं सर्वभूतानां. तिथे कोणतीही चूक नाही. तुम्ही फक्त ते घ्या आणि लागवड करा. तुम्हाला परिणाम दिसेल.

अच्युतानंद: तर ते तत्व, ज्याने गोष्टी वाढतात, सर्वकाही, ईषोपनिषद सांगते, अहं अस्मि: "मी ते तत्व आहे." ईषोपनिषद शेवटच्या श्लोकात सांगते, तर अहं अस्मि: "मी ते तत्व आहे."

प्रभुपाद: अस्मि म्हणजे " ती माझी शक्ती आहे. ती माझी शक्ती आहे.

अच्युतानंद: नाही, ते सांगते.... प्रभुपाद: जर मी असे म्हणालो की "मी इस्कॉन आहे," त्यात चुकीचे काय आहे? कारण मी हे तयार केले आहे; म्हणून मी म्हणतो, "इस्कॉन म्हणजे मी. मी इस्कॉन आहे." त्यात चुकीचे काय आहे? हे असे आहे. श्रीकृष्णांच्या शक्तीने सर्वकाही निर्माण होते. म्हणूनच मी म्हणतो, "मी हे आहे, मी हे आहे, मी हे आहे.मी हे आहे. विभूति-भिन्नम. कारण सर्वकाही… जन्माद्यस्य येतो (श्रीमद भागवतम १.१.१) |श्रीकृष्णापासून सर्वकाही आले आहे.

अच्युतानंद: नाही, ईशोपनिषद सांगते की तुम्ही ते तत्त्व आहात. ईशोपनिषद सांगते तत्त्व जे सूर्याला प्रकाशित करते, " ते तत्त्व मी आहे."

प्रभुपाद: होय, भक्त स्वीकार करतो… ते आम्ही स्वीकार करतो.

अच्युतानंद: जो सूर्यावरील प्रकाश आहे, मी तो आहे.

प्रभुपाद: मला तुझे म्हणणे समजले नाही.

अच्युतानंद: सो अहं अस्मि. तो सोळावा…

हृषीकेश: सूर्याप्रमाणे, जसा मी आहे."

प्रभुपाद: होय, सो अहं अस्मि - कारण मी अंश आहे.

अच्युतानंद: नाही, पण ते म्हणतात "मी तो आहे," तो नाही "मी त्याचा अंश आहे." "मी तो आहे." नाही असे म्हटल्यास ते स्वीकारले जाऊ शकते, कारण मी गुणात्मकदृष्टया समान आहे.

केशवलाल त्रिवेदी: गुण, खूप फरक आहे.

प्रभुपाद: होय.

प्रभुपाद; जर मी म्हटले, "मी भारतीय आहे," जर मी म्हटले, "मी भारतीय आहे" त्यात चूक काय आहे?

अच्युतानंद: ते दुसरे काही आहे.

प्रभुपाद: होय. दुसरे काही नाही.

अच्युतानंद: पण श्रुती थेट स्वीकारणे, असे म्हणतात तुम्ही तेच तत्त्व आहात.

प्रभुपाद: आणि म्हणून तुम्ही गुरूकडून शिकायला हवे. आणि जर तुम्ही थेट शिकलात, ते तुम्ही मूर्ख आहात. म्हणून तुम्हाला गुरु आवश्यक आहे. हा श्रुतीचा आदेश आहे. तद्विज्ञानार्थं स गुरुम एवाभिगच्छेत (मुंडक उपनिषद . १.२.१२). तुम्ही श्रुती शिकली पाहिजे. तुम्ही गुरुकडे गेले पाहिजे.

अच्युतानंद: नाही, पण हे त्याच्या नंतर आहे. उपनिषदाचा अंतिम निष्कर्ष. श्रुती, अधिकार, असे आहे की तुम्ही तेच तत्व आहात.

प्रभुपाद: होय, मी तेच तत्व आहे. नित्यो नित्यानां.

अच्युतानंद: बरं, दुसऱ्या शाश्वतापेक्षाही काही अधिक चिरंतर असू शकत नाही.

प्रभुपाद: प्रत्येकजण शाश्वत आहे.

अच्युतानंद: मग ते विरोधाभासी आहे. नित्यो नित्यानां. तुम्ही म्हणू शकत नाही की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा अधिक चिरंतर आहे.

प्रभुपाद: नाही, नाही. तो मुद्दा नाही. प्रत्येकजण शाश्वत आहे.

अच्युतानंद: तर कसे एक अधिक शाश्वत होऊ शकतो…

प्रभुपाद: जसे भगवान शाश्वत आहे, तसे तुम्ही सुद्धा शाश्वत आहात. कारण तुम्ही हे भौतिक शरीर स्वीकारले आहे, तुम्ही मूर्खपणें विचार करता की तुम्ही शाश्वत नाही. नाहीतर, जसे भगवान शाश्वत आहे, तसे तुम्ही सुद्धा शाश्वत आहात.

अच्युतानंद: मग का ते दोघे एकमेकांपासून वेगळे व्हायला पाहिजेत जर ते दोघे शाश्वत आहेत?

प्रभुपाद: जसे सूर्य उन्हापासून भिन्न आहे, पण गुणात्मकदृष्टीने उष्णता आणि प्रकाश तिथे आहे. पण सूर्यप्रकाश असल्यामुळे तुम्ही तेथे सूर्य आहे असे म्हणू शकत नाही. तसे तुम्ही म्हणू शकत नाही. मत्स्थानि सर्वभुतानि नाहं तेश्व अवस्थितः(भ.गी. ९.४) । स्पष्टपणे सांगितले आहे.

केशवलाल त्रिवेदी: मला वाटते, स्वामीजी, मी त्यातून तर्कशुद्धता काढू शकलो, ते "मी ईश आहे, पण मी सर्वेश नाही. मी आत्मन आहे पण परमात्मा नाही." "मी अंश आहे पण परमांश नाही."

प्रभुपाद: होय. ते दुसरीकडे स्पष्ट केले आहे… तुम्ही संदर्भ घेतला पाहिजे. ईश्वर परमः कृष्ण: (ब्रम्हसंहिता ५.१०). मी सुद्धा ईश्वर आहे. ते मी अनेकवेळा स्पष्ट केले आहे. पण त्याचा अर्थ असा नाही का मी परमेश्वर आहे. परमेश्वर कृष्ण आहे. हि इमारत काय आहे?

केशवलाल त्रिवेदी: अहं ब्रम्हास्मि मी समजू शकलो नाही जोपर्यंत मी पहिल्या दिवशी स्वामीजींना ऐकले नव्हते मंदपूरमध्ये राजेश्वरला त्यामध्ये बसते. नाहीतर मायावादी. "ठीक आहे, पण शंकराचार्य सांगतात, अहं ब्रम्हास्मि. तुम्ही नाही का म्हणता?" कारण अनेक लोकांनी मला प्रश्न विचारला. आणि जेव्हा मी सांगायला गेलो, मला ते सांगता आले नाही. पण मुक्तीची ज्याप्रकारे व्याख्या केली आहे, मुक्ती, होय, आणि व्याख्यानात, आणि ईश, सर्वेश, त्या सगळ्या गोष्टी - आत्मा, परमात्मा, अंश, परमांश - तिथे मला जाणवले की हे स्पष्ट करता येऊ शकते. कारण अनेक लोक, लायन्स क्लब सारख्या सार्वजनिक सभेत विचारतात, जिथे आम्ही हा विषय घेतो. मग आम्हाला वाटते आमची हुशारी संपली. पण आता मला वाटते मी स्पष्ट करू शकेन. प्रभुपाद: ते माझे स्पष्टीकरण योग्य आहे का?

केशवलाल त्रिवेदी: होय, मला तसे वाटते. आणि अच्युतानंद स्वामींच्या प्रश्नाला सुद्धा तेच लागू होईल. मला वाटते.

अच्युतानंद: नाही. मी फक्त बाहुली आहे.

केशवलाल त्रिवेदी: नाही, नाही, ठीक आहे… मला माहित आहे…

अच्युतानंद: तर दुर्गा विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण विष्णूला योग-निद्रेतून जागे करायला दुर्गेची जरूर आहे. मधू आणि कैटभ मारायला. तर तीने त्याला नियंत्रित केले.

प्रभुपाद: होय, जर मी माझ्या सेवकाला सांगितले की " तू मला सात वाजता उठवायला सांगितले होतेस… (हशा)