MR/Prabhupada 0380 - दशावतार स्तोत्र भाग २



Purport to Dasavatara Stotra, CD 8

मग, पुढील अवतार वामनदेव आहे. हा वामनदेव, एक बटू, ते बली महाराजांकडे गेले आणि त्याच्याकडे तीन पावलं जमीन मागितली. आणि त्याचे गुरु, शुक्राचार्य, त्याला वचन देण्यास विरोध केला कारण ते विष्णू आहेत. पण बली महाराज विष्णूला काही अर्पण करण्यासाठी खुश होते. त्यांनी गुरु बरोबरचे आपले संबंध तोडले, कारण त्याला गुरु विष्णूची सेवा करण्यास विरोध करत होते. म्हणून बली महाराज महाजनांपैकी एक आहेत. कोणीही विष्णूची पूजा करण्यासाठी विरोध करू शकत नाही. जर कोणी विरोध केला, ते गुरु असू शकतात, ते वडील असू शकतात, ते नातेवाईक असू शकतात, त्याचा ताबडतोब त्याग केला पाहिजे. म्हणून बली महाराज महाजन आहेत. त्यांनी उदाहरण दाखवून दिले: कारण त्यांच्या गुरूंनी विष्णूची पूजा करण्याच्या मार्गात अडथळा आणला, त्यांनी आपल्या गुरु बरोबरच आपला संबंध तोडला. तर अशा पद्धतीने त्यांनी भिक्षा मागितली, परंतु ते भिक्षा मागत नव्हते प्रत्यक्षात ती फसवणूक होती. पण बली महाराजानी भगवंतांकडून फसण्यास मान्य केले. ते भक्ताचे लक्षण आहे. भक्त भगवंतांच्या कोणत्याही कृतीशी सहमत असतो, आणि बली महाराजांनी पहिले की भगवंत फसवू इच्छितात. तीन पावलं जमीन मागून, ते संपूर्ण ब्रम्हांड घेतील, तर ते कबुल झाले. आणि दोन पावलांनी संपूर्ण ब्रम्हांड व्यापले वर आणि खाली मग वामनदेवानी त्याला विचारले तिसरे पाऊल कुठे ठेवू? तर बली महाराज तयार झाले. भगवंत, तुम्ही तो माझ्या डोक्यावर ठेवा, माझे शरीर अजून शिल्लक आहे." अशा प्रकारे त्यानी विष्णू, वामनदेवला विकत घेतले. आणि वामनदेव बली महाराजांचे द्वारपाल म्हणून राहिले. तर सर्वस्व देऊन, सर्वात्म स्नपने बली, त्यांनी सगळे काही भगवंतांना दिले आणि ते देऊन, त्यानी भगवंतांना विकत घेतले. ते स्वेच्छेने बली महाराजांचे द्वारपाल बनून राहिले. तर, छलयसी विक्रमने बलिम अद्भुत-वामन पद-नख-नीर-जनित-जन-पवन, जेव्हा वामनदेवांनी वरच्या दिशेने पायाचा विस्तार केला, त्यांच्या अंगठ्याने विश्वाच्या आच्छादनाला छिद्र पडले होते. आणि वैकुंठातून वाहणाऱ्या गंगेचे पाणी त्या छिद्रातून आले. पद-नख-नीर-जनित, आणि आता ते गंगेचे पाणी या विश्वामध्ये वाहत आहे. सर्व जागा पवित्र करत आहे, जिथे गंगाजल आहे. पद-नख-नीर-जनित-जन-पावन.

पुढचा अवतार आहे भृगुपति, परशुराम. परशुराम शक्त्यावेश अवतार आहे. तर त्यांनी एकवीस वेळा क्षत्रियांना मारले. तर परशुरामांच्या भीतीने सर्व क्षत्रिय, यौरोपच्या दिशेने स्थलांतरित झाले, असे इतिहासात, महाभारतात सांगितले आहे. तर त्यांनी एकवीस वेळा क्षत्रियांवर हल्ला केला. ते योग्य नव्हते, म्हणून त्यांनी त्याना मारले. आणि कुरुक्षेत्रात मोठा तलाव आहे जिथे सर्व रक्त साठवले. नंतर त्याचे पाणी बनले.

तर क्षत्रिय-रुधिर, दुःखग्रस्त पृथ्वीला शांत करण्यासाठी, त्यांनी क्षत्रियांच्या रक्ताने पृथ्वीला भिजवले. स्नपयसि पयसि समित-भव-तपम. वितरसि दिक्षु रने दिक-पति-कमणियम दस-मुख-मौलि-बलिम रमनियम. पुढचा अवतार रामचंद्र आहे. तर रावण, ज्याला दहा डोकी होती, त्यानी भगवंतांना आव्हान दिले, आणि प्रभू रामचंद्रांनी आव्हान स्वीकारले आणि त्याला मारले. मग वहसि वपुसि विसदे वसनं जलदभं हल-हती-भिति मिलीत-यमुनभम. जेव्हा बलदेव इच्छित होते यमुना त्यांच्या जवळ यावी, तर ती येत नव्हती. म्हणून त्याला त्याच्या हलाने पृथ्वीचे दोन भागात विभाजन करायचे होते. आणि त्यावेळी यमुना नतमस्तक झाली आणि ती प्रभूंच्या जवळ आली. हल-हति-भिति-यमुन, हल-हति-भिति-मिलित- यमुनभम, प्रभू बलदेवांद्वारे यमुनेला शासन होते. केशव धृत-हलधर-रुप, हल, हलधर म्हणजे हल, हलधर-रुप जय जगदीश हरे.

पुढचे, बुध्द, भगवान बुध्द. निंदसी यज्ञ-विधेर अहह श्रुति-जातम. भगवान बुद्धांनी वैदिक आदेश नाकारला, कारण त्यांचे कार्य पशु-हत्या थांबवणे होते. आणि वेदांमध्ये, काही यज्ञबळीत, पशु-हत्येला मान्यता आहे. तर वैदिक नियमांचे जे तथाकथित अनुयायी आहेत, त्यांना थांबवायचे होते बुद्धदेवांना त्यांच्या पशु-हत्या रोखण्याच्या कार्यापासून, तर म्हणून जेव्हा लोक वेदांमधून पुरावे देऊ इच्छित होते, वेदात वर्णन आहे, यज्ञात पशुला बळी देण्याला परवानगी आहे, तुम्ही का थांबवत आहात? ते, निंदसि, त्यांनी निषेध केला. आणि कारण त्यांनी वेदांचे अधिकार नाकारले, म्हणून बुद्ध तत्वज्ञान भारतामध्ये स्वीकारले गेले नाही. नास्तिक, जो कोणी वैदिक अधिकार नाकारतो, त्याला नास्तिक म्हणतात, अविश्वसनीय. वेदांचा अनादर होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे, भगवान बुद्ध, गरीब प्राण्यांना वाचवण्यासाठी, ते काही वेळा वेदांचे आदेश नाकारतात. केशव धृत बुद्ध-शरीर जय जगदीश.

पुढचा अवतार कल्कि अवतात आहे. आम्ही वाट पाहत आहोत. आज पासून चारशे हजार वर्षानंतर कल्की अवतार होईल. राजा प्रमाणे घोड्यावर बसून तो तलवार घेईल,आणि ते फक्त सर्व नास्तिकी जीवांना मारत जातील, कोणताही प्रचार होणार नाही. जसा अन्य अवतारांमध्ये प्रचार आहे. कल्की अवतारामध्ये संपूर्ण जगाची लोकसंख्या पशु कृत्यामध्ये गुंतली असेल . की तिथे देवाला किंवा आध्यात्मवाद म्हणजे काय समजण्याची शक्ती असणार नाही, आणि हे आता आधी पासूनच आहे,कली युग. ते वाढत जाईल. लोकांकडे हे तत्वज्ञान, भगवत चेतना समजण्याची शक्ती नसेल. तर त्यावेळी त्या सर्वाना मारण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसेल आणि एका दुसऱ्या सत्य युगाची सुरवात करणे. तो मार्ग आहे (अस्पष्ट).