MR/Prabhupada 0389 - हरि हरि बिफलेचे तात्पर्य



Purport to Hari Hari Biphale -- Hamburg, September 10, 1969

हरी हरी! बिफले जन्म गोऐनू. हे नरोत्तम दास ठाकूर, एक निष्ठावंत आचार्य यांनी गायलेले एक गाणे आहे, जे चैतन्य महाप्रभूंच्या सांप्रदायाच्या परंपरेमध्ये आहे. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत, महत्वपूर्ण गाणी, आणि त्यांची गाणी वैदिक निष्कर्ष म्हणून स्वीकारली जातात. खूप अधिकारयुक्त गाणी. म्हणून ते सांगतात, भगवान कृष्ण याना प्रार्थना करतात. "माझ्या प्रिय भगवंता," हरी हरी, "मी केवळ माझे आयुष्य वाया घालवले आहे."

हरी हरी बिफले जन्म गोऐनू. का तू तुझे आयुष्य वाया घालवले? ते सांगतात, मनुष्य-जन्म पाया, "मला हा मनुष्य जन्म लाभला," राधा-कृष्ण ना भजिया, "पण मी राधा- कृष्णाची पूजा करण्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून मी माझे आयुष्य वाया घालवले." आणि हे कसे होते? हे एखाद्याने जाणूनबुजून विष पिण्यासारखे आहे. जर कोणी अजाणतेपणी विष प्यायले, त्याला क्षमा आहे, पण जर कोणी जाणूनबुजून विष प्यायले, तर ती आत्महत्या आहे. तर ते म्हणतात की "मी या मनुष्य जीवनात राधा आणि कृष्ण यांची पूजा न करून केवळ आत्महत्या केली आहे."

मग ते म्हणतात, गोलोकेर प्रेम-धन, हरी-नाम-संकीर्तन. हे कृष्णभावनामृत आंदोलन, संकीर्तन आंदोलन, हे भौतिक नाही. हे थेट आध्यात्मिक राज्यातून आयात केले आहे ज्याला गोलोक वृंदावन म्हणतात. म्हणून गोलोकेर प्रेम-धन. आणि हे सर्व साधारण गाणे नाही. हा भगवंतांच्या प्रेमाचा खजिना आहे. म्हणून… "पण मला याच्यासाठी काही आकर्षण नाही." "रती ना जन्मिलो केने ताय "मला याच्यासाठी काही आकर्षण नाही. याच्या उलट," विषय-बिषानले दिबा-निशी हिया ज्वाले, "आणि कारण मी हे स्वीकार करत नाही, म्हणून भौतिक अस्तित्वाच्या विषाची धगधगती आग मला सतत जाळत आहे."

दिबा-निशी हिया ज्वाले. "दिवस आणि रात्र, माझे हृदय जळत आहे, या विषारी भौतिक अस्तित्वाच्या परिणामामुळे." आणि तरीबरे ना कोईनू "पण मला यासाठी काही उपाय दिसत नाही." दुसऱ्या शब्दात, या भौतिक अस्तित्वाच्या धगधगत्या आगीवर उपाय हे संकीर्तन आंदोलन आहे. हे आध्यात्मिक राज्यातून आयात केले आहे. आणि हे कोणी आयात केले आहे? किंवा कोणी हे आणले आहे? मग ते म्हणतात, ब्रजेन्द्र-नंदन जेई, सची-सुत होईलो सेई. ब्रजेन्द्र-नंदन, ब्रजच्या राजाचा पुत्र. तो कृष्ण आहे. कृष्णाला नंद महाराजांचा पुत्र म्हणून ओळखतात. ते ब्रजभूमीचे राजा आहेत.

म्हणून ब्रजेन्द्र-नंदन जेई. तीच व्यक्ती जो पूर्वी नंद महाराजांचा पुत्र होता. आता सची मातेच्या पुत्राच्या रूपात अवतरित झाले आहेत. सची-सूत होईलो सेई. आणि बलराम होईलो निताई. आणि बलराम नित्यानंद बनले आहेत. तर हे दोन भाऊ अवतरित झाले आहेत. ते सर्व प्रकारच्या पतित जीवांचा उध्दार करीत आहेत. पापी-तापी जत चिलो. जेवढे पतित जीव या जगात आहेत. ते केवळ या जपाच्या प्रक्रियेने त्यांचा उध्दार करीत आहेत.

हरी-नामे उद्धारिलो, फक्त या जपाने. हे कसे शक्य आहे? मग ते म्हणतात, तार साक्षी जगाई आणि माधाई. जिवंत उदाहरण दोन भाऊ, जगाई आणि माधाई आहेत. हे जगाई आणि माधाई, दोन भाऊ, त्यांचा जन्म ब्राम्हण परिवारात झाला होता. पण ते एक नंबरचे लंपट बनले. आणि... अर्थात, आताच्या दिवसात, या युगात, त्यांची योग्यता लंपट समजली जात नाही. त्यांची वर्तणूक भ्रष्ट होती कारण ते दारुडे आणि महिला शिकारी होते. म्हणून त्यांना लंपट म्हणत. आणि मांस-भक्षक सुद्धा. तर… पण ते बनले, नंतर चैतन्य महाप्रभु आणि नित्यानंद यांनी उध्दार केला. महान भक्त. तर नरोत्तम दास ठाकुरांचे स्पष्टीकरण सांगते की या युगात, जरी लोक दारुडे आहेत. महिला-शिकारी, मांस-भक्षक, आणि सर्व… जुगारी, सर्व प्रकारचे पापी अभिनेते, तरीही, जर ते हे कृष्णभावनामृत आंदोलन आणि हरे कृष्ण जप, स्वीकारतील. निःसंशय, त्या सर्वांचा उध्दार होईल.

हा चैतन्य महाप्रभूंचा आशीर्वाद आहे. मग नरोत्तम दास ठाकूर प्रार्थना करतात, हा हा प्रभू नंद-सुत, वृषभानू-सुता-जुत. "माझ्या प्रिय कृष्णा, तुम्ही राजा नंदाचे पुत्र आहात, आणि तुमची सोबती राधाराणी राजा वृषभानूची पुत्री आहे. तर तुम्ही दोघे इथे एकत्र उभे आहात." नरोत्तम दास कहे, ना ठेलिहो रांगा पाय, "आता मी तुम्हाला शरण आलो आहे. कृपया मला लाथ मारू नका, किंवा तुमच्या पदकमला पासून दूर ढकलू नका, कारण मला दुसरा कुठलाही आसरा नाही. मी फक्त तुमच्या पदकमलांचा आसरा घेत आहे दुसऱ्या कुठल्याही साधनाशिवाय. तर कृपया मला स्वीकारा आणि माझा उद्धार करा." हे या गाण्याचे सार आहे.