MR/Prabhupada 0394 - निताई-पद-कमलचे तात्पर्य



Purport to Nitai-Pada-Kamala -- Los Angeles, January 31, 1969

निताई-पद-कमल, कोटि-चंद्र-सुषितल, जे छायाय जगत जुराय. हे नरोत्तमदास ठाकुर यांचे गाणे आहे, गौडीया-वैष्णव-संप्रदायाचे महान आचार्य. त्यांनी वैष्णव तत्वज्ञानावर अनेक गाणी लिहिली आहेत, आणि त्यांना वैदिक निर्देशांशी पूर्णपणे संबंधित म्हणून मान्यता दिली आहे. तर इथे नरोत्तमदास ठाकुर गात आहेत की "संपूर्ण जग भौतिक अस्तित्वाच्या धगधगत्या आगीत जळत आहे. म्हणून, जर एखाद्याने नित्यानंद प्रभूंच्या पदकमलांचा आश्रय घेतला…" ज्यांचा आज जन्मदिवस आहे, ३१, जानेवारी, १९६९. तर आपण नरोत्तमदास ठाकुर यांच्या सूचनांचा आस्वाद घेतला पाहिजे. या भौतिक अस्तित्वाचा आगीच्या कष्टापासून आराम मिळण्यासाठी, नित्यानंद प्रभूंच्या पदकमलांचा आश्रय घेतला पाहिजे, कारण त्या चंद्राच्या किरणांप्रमाणे थंड आहेत, जे लाखो एकत्रित चंद्राप्रमाणे आहे. त्याचा अर्थ एखाद्याला ताबडतोब शांतीपूर्ण वातावरण मिळेल. ज्याप्रमाणे एखादा माणूस दिवसभर काम करत असेल, आणि तो जर चंद्राच्या शीतल छायेखाली आला, तर त्याला आराम वाटेल. त्याचप्रमाणे, कोणतीही भौतिकतावादी व्यक्ती नित्यानंद प्रभूंच्या आश्रयाखाली आली ताबडतोब आराम अनुभवले. त्याचप्रमाणे, कोणतीही भौतिकतावादी व्यक्ती नित्यानंद प्रभूंच्या आश्रयाखाली आली तर ताबडतोब आराम अनुभवले.

हेनो निताई बिने भाई, राधा-कृष्ण पाईते नाय, धरो निताई-चरण दुःखनि. ते सांगतात की "जर तुम्ही परमधाम, देवाच्या घरी जाण्यासाठी उत्सुक आहात, आणि राधा आणि कृष्णांचे सहयोगी बनू इच्छित आहात, मग सर्वोत्तम नीती आहे नित्यानंद प्रभूंचा आश्रय घेणे." मग ते सांगतात, से संबंध नाही जार, बृथा जन्म गेलो तार: "जो कोणी नित्यानंदांशी संपर्क साधण्यात असमर्थ आहे. मग त्याने विचार केला पाहिजे की त्याने त्याचे बहुमूल्य आयुष्य केवळ वाया घालवले."

बृथा जन्म गेलो, बृथा म्हणजे व्यर्थ, आणि जन्म म्हणजे आयुष्य. गेलो तार, वाया. कारण त्याने नित्यानंद बरोबर संबंध जोडला नाही. नित्यानंद नाव सुचवते… नित्य म्हणजे शाश्वत. आनंद म्हणजे सुख. भौतिक आनंद शाश्वत नाही. हा फरक आहे. म्हणून जे बुद्धिमान आहेत, त्यांना या भौतिक जगाच्या चंचल सुखात रस नाही. जीव म्हणून, आपल्यापैकी प्रत्येकजण, आपण सुखाच्या शोधात आहोत. परंतु ज्या आनंदची आपण अपेक्षा करीत आहोत, तो चंचल, तात्पुरते आहे. ते सुख नाही. खरा आनंद आहे नित्यानंद, शाश्वत सुख. तर जो कोणी नित्यानंदांच्या संपर्कात नाही, असे समजले पाहिजे की त्याचे जीवन व्यर्थ आहे.

से संबंध नाही जार, बृथा जन्म गेलो तार, सेई पशु बोरो दुराचार, नरोत्तमदास ठाकुर इथे खूप कठोर शब्द वापरतात. ते सांगतात की असा माणूस जनावर आहे, अवशिकृत जनावर. अशी काही जनावरे आहेत ज्यांना प्रशिक्षण देता येत नाही. तर जोकोणी नित्यानंदाच्या संपर्कात येत नाही. त्याला अवशिकृत प्राणी मानले पाहिजे. सेई पशु बोरो दुराचार. का? कारण निताई ना बोलिलो मुखे: "त्यांनी नित्यानंदांचे पवित्र नाव कधीच उच्चारले नाही." आणि मजिलो संसार-सुखे, "आणि या भौतिक सुखात विलीन झाला."

विद्या-कुले कि कोरिबे तार. "त्या मुर्खाला माहित नाही, की त्याचे शिक्षण आणि कुटूंब, आणि परंपरा आणि राष्ट्रीयत्व त्याला काय मदत करेल?" या गोष्टी त्याला मदत करू शकणार नाहीत. या सर्व तात्पुरत्या गोष्टी आहेत. केवळ, जर आपल्याला शाश्वत सुख हवे असेल, आपण नित्यानंदाच्या संपर्कात आले पाहिजे. विद्या-कुले कि कोरिबे तार. विद्या म्हणजे शिक्षण, आणि कुलम्हणजे कुटूंब, राष्ट्रीयत्व. तर आपले खूप छान कौटूंबिक संबंध असतील, किंवा आपली खूप छान राष्ट्रीय प्रतिष्ठा असेल, पण या शरीराच्या अंतानंतर, या गोष्टी मला मदत करणार नाहीत. मी माझे कर्म माझ्या बरोबर नेणार, आणि त्या कर्मानुसार, मला दुसऱ्या प्रकारचे शरीर बळजबरीने स्वीकारावे लागणार. ते मानवी शरीराव्यतिरिक्त दुसरे काही असू शकते. तर या गोष्टी आपल्याला संरक्षण देऊ शकत नाहीत किंवा खरे सुख देऊ शकत नाहीत. तर नरोत्तमदास ठाकुर सल्ला देतात की विद्या-कुले कि कोरिबे तार.

मग ते सांगतात, अहंकारे मत्त होईया. "खोटी प्रतिष्ठा आणि ओळखी मागे वेडा होऊन…" शरीरा बरोबरची खोटी ओळख आणि शारीरिक संबंधांची प्रतिष्ठा, त्याला अहंकारे मत्त होईया म्हणतात. एखादा खोट्या प्रतिष्ठे पाठी वेडा आहे. अहंकारे मत्त होईया, निताई पद पासरिया. या खोट्या प्रतिष्ठेमुळे आपण विचार करतो, "ओह, नित्यानंद काय आहे? ते माझ्यासाठी काय करू शकतात? मला चिंता नाही." तर हि खोट्या प्रतिष्ठतेची लक्षणे आहेत. अहंकारे मत्त होईया, निताई-पद पास… असत्येरे सत्य कोरि मानि. परिणाम हा आहे की मी काहीतरी चुकीचे आहे ते स्वीकारतो. उदाहरणार्थ, मी हे शरीर स्वीकारतो. हे शरीर, मी हे शरीर नाही. म्हणून, खोट्या ओळखीने मी अधिकाधिक जाळ्यात गुंतत आहे. तर ज्याला या खोट्या प्रतिष्ठेचा अभिमान आहे, अहंकारे मत्त होईया, निताई-पद पा… असत्येरे सत्य कोरि मानि, तो काहीतरी चुकीचे बरोबर म्हणून स्वीकारतो.

मग ते म्हणतात, नीताईयेर करुणा हबे, ब्रजे राधा-कृष्ण पाबे. जर तुम्ही वास्तवात परमधाम, देवाच्याद्वारी जाण्यासाठी गंभीर आहात, तर कृपया नित्यानंदाच्या कृपेची याचना करा. नीताईयेर करुणा हबे, ब्रजे राधा-कृष्ण पाबे, धरो निताई-चरण दुःखानि "कृपया नित्यानंद प्रभूंचे पदकमल धरा." मग ते सांगतात, नीताईयेर चरण सत्य. एखादा विचार करेल की आपण इतके सारे आश्रय घेतले, पण नंतर या भौतिक जगात ते सगळे खोटे ठरतात. त्याचप्रमाणे, समजा आपण नित्यानंद प्रभूंचे पदकमल धरले तर ते देखील खोटे सिद्ध होऊ शकतील. पण नरोत्तमदास ठाकुर आश्वासन देतात, की निताईयेर चरण सत्य: "ते खोटे नाही. करणं नित्यानंद शाश्वत आहे, त्यांचे पदकमल देखील शाश्वत आहेत."

तॉंहार सेवक नित्य. आणि जो कोणी नित्यानंदची सेवा करतो, ते देखील शाश्वत बनतात. शाश्वत झाल्याशिवाय, कोणीही शाश्वतची सेवा करू शकत नाही. हा वैदिक आदेश आहे. ब्रम्ह बनल्याशिवाय, आपण परम ब्रम्ह पर्यंत जाऊ शकत नाही. जसे अग्नी बनल्याशिवाय, कोणीही अग्नीत प्रवेश करू शकत नाही. पाणी बनल्याशिवाय, कोणीही पाण्यात प्रवेश शकत नाही. त्याचप्रमाणे, पूर्णपणे आध्यात्मिक झाल्याशिवाय, कोणीही आध्यात्मिक राज्यात प्रवेश करू शकत नाही. तर निताईयेर चरण सत्य. जर तुम्ही नित्यानंद प्रभूंचे पदकमल पकडले, तर तुम्ही लगेच आध्यात्मिक बनाल. जसे तुम्ही विजेला स्पर्श केला, लगेच तुमचे विद्युतीकरण होते. ते नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे नित्यानंद शाश्वत आनंद आहे, जर तुम्ही या नाहीतर त्या मार्गाने नित्यानंद प्रभुना स्पर्श केलात, तर तुम्ही देखील कायमस्वरूपी सुखी व्हाल.

तॉंहार सेवक नित्य. म्हणून जो कोणी नित्यानंद प्रभूंच्या संपर्कात असेल, ते शाश्वत झाले आहेत. निताईयेर चरण सत्य. तॉंहार सेवक नित्य. दृढ कोरि धरो निताईर पाय तर त्यांना खूप घट्ट धरा. नरोत्तम बोरो दुःखी, निताई मोरे कोरो सुखी. सर्वात शेवटी, नरोत्तमदास ठाकुर, या गाण्याचे रचनाकार, ते नित्यानंद प्रभुंना याचना करतात, "माझ्या प्रिय भगवंता, मी खूप दुःखी आहे. तर आपण कृपया मला सुखी करा. आणि तुम्ही कृपया मला तुमच्या पादकमलांच्या कोपऱ्यात ठेवा." हे या गाण्याचे सार आहे.