MR/Prabhupada 0412 - कृष्णाची इच्छा आहे की ह्या कृष्णभावनामृत आंदोलनाचा प्रचार व्हायला पाहिजे



Conversation with Devotees -- April 12, 1975, Hyderabad

प्रभुपाद: अनाश्रितः कर्म-फलं कार्यं कर्म करोति यः, स संन्यासी (भ.गी. ६.१) | अनाश्रितः कर… प्रत्येकजण त्याच्या इंद्रियतृप्तीसाठी काही चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवतो. ते आहे आश्रितः कर्म-फलं. त्यांनी चांगल्या परिणामांचा आश्रय घेतला आहे. पण जो कोणी कार्यकलापांच्या परिणामांचा आश्रय घेत नाही… ते माझे कर्तव्य आहे. कार्यं. कार्यं म्हणजे "ते माझे कर्तव्य आहे. परिणाम काय आहे काही फरक पडत नाही. मी माझ्या उत्तम क्षमतेनुसार प्रामाणिकपणे हे केले पाहिजे मग मी परिणामांची काळजी करीत नाही. परिणाम श्रीकृष्णांच्या हातात आहे." कार्यं: "हे माझे कर्तव्य आहे. हे माझ्या गुरु महाराजांनी सांगितले आहे, तर ते माझे कर्तव्य आहे. ते यशस्वी झाले किंवा यशस्वी झाले नाही ते महत्वाचे नाही. ते श्रीकृष्णांवर अवलंबून आहे."

अशा प्रकारे, जर कोणी कार्य केले, तर तो संन्यासी आहे. वस्त्रे नाहीत, पण कार्य करण्याची वृत्ती. होय, तो संन्यास आहे. कार्यं: "ते माझे कर्तव्य आहे." स संन्यासी च योगी च. तो योगी आहे, प्रथम-श्रेणी योगी. अर्जुनाप्रमाणे. अर्जुनाने अधिकृतपणे, त्याने संन्यास घेतला नाही. तो एक गृहस्थ होता, सैनिक होता. पण जेव्हा त्याने हे खूप गंभीरपणे घेतले. कार्यं - "कृष्णाला हे युद्ध हवे आहे. काही हरकत नाही मला माझ्या नातेवाईकांचा वध केला पाहिजे. मला ते करायलाच हवे"- तो संन्यास आहे. सर्व प्रथम त्याने श्रीकृष्णांबरोबर वाद घातला की " या प्रकारचे युद्ध चांगले नाही," कुटुंबाची हत्या, आणि असे सर्व काही. त्यांनी तर्क केला पण भगवद् गीता ऐकल्यावर, जेव्हा तो समजला की "हे माझे कर्तव्य आहे. श्रीकृष्णांची इच्छा आहे मी हे करावे." कार्यं. एक गृहस्थ, एक सैनिक असूनसुद्धा, तो एक संन्यासी आहे. त्यांनी ते केले - कार्यं. कार्यं म्हणजे "हे माझे कर्तव्य आहे." तो खरा संन्यासी आहे. "श्रीकृष्णांची इच्छा आहे की ह्या कृष्णभावनामृत आंदोलनाचा प्रचार झाला पाहिजे. तर हे माझे कार्यं आहे. हे माझे कर्तव्य आहे. आणि दिशा दर्शवणारे माझे आध्यात्मिक गुरु आहेत. तर मी हे केलेच पाहिजे." हा संन्यास आहे. हा संन्यास आहे, संन्यासी मानसिकता. पण औपचारिकता आहे. ते… ते स्वीकारले पाहिजे.

भारतीय माणूस: याचा काही मानसिक परिणाम होतो.

प्रभुपाद: आह. भारतात विशेषतः, लोकांना आवडते. संन्यासी प्रचार करू शकतात. अन्यथा, संन्यासांचे सूत्र दिले आहे - कार्यं: "पण हे माझे एवढेच. कृष्णभावनामृत आंदोलनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. हे माझे कर्तव्य आहे." तो संन्यासी आहे. कारण कृष्ण व्यक्तिशः येतात, ते मागणी करतात, सर्व-धर्मान परित्यज माम एकं शरणं व्रज (भ.गी. १८.६६) |आणि चैतन्य महाप्रभु, कृष्ण, ते सांगतात, येई कृष्ण तत्त्व वेत्त सेई गुरु हय: "कोणीही जो कृष्ण विज्ञान जाणतो, तो गुरु आहे." आणि गुरुचे काम काय आहे? यारे देखा, तारे कह कृष्ण-उपदेश:(चैतन्य चरितामृत मध्य ७.१२८) जो तुम्हाला भेटेल त्याच्यावर, कृष्णांच्या सूचनांचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करा." सर्व-धर्मान परित्यज्य… तर अशाप्रकारे, जर आपण स्वीकारले, खूप गंभीरपणे - "हे माझे कर्तव्य आहे" - मग तुम्ही संन्यासी आहात. एवढेच. स संन्यासी. कृष्ण प्रमाणित करतात, स संन्यासी. लोक श्रीकृष्णांची शिकवण गंभीरपणे घेत नाहीत. ते भारताचे दुर्दैव आहे. ते कृष्णांसाठी अनेक स्पर्धक आणत आहेत. कृष्ण आहे… आणि "कृष्ण… रामकृष्ण पण कृष्णासमानच आहेत." या धूर्ततेने मारले आहे. त्यानी महान धर्माचे नुकसान केले आहे. कृष्णाऐवजी, त्यांनी एक बदमाश, रामकृष्णला आणले.

भागवत: त्यांचा भुवनेश्वरला मोठा मठ आहे. भुवनेश्वरमध्ये, त्यांचा मोठा रामकृष्ण मठ आहे. विवेकानंद शाळा, वाचनालय, खूप मोठी जागा, सर्व काही, खूप व्यवस्थित.

प्रभुपाद; तर आपण ते करू शकतो. तुम्हाला लोकांना पटवून द्यायला हवे. त्यांच्या बरोबर स्पर्धा करण्याचा काही प्रश्न नाही. पण तुम्ही , तुम्ही तुमच्या स्वतःच्या तत्वज्ञानाचा प्रचार कुठेही करू शकता.

भारतीय माणूस: ओरिसाच्या लोकांबरोबर जे घडत आहे…

प्रभुपाद: हं?

भारतीय माणूस: … त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा: नाही, ते खोटे आहे आणि अशाप्रकारे आहे.

प्रभुपाद: नाही, तिथे रामकृष्ण मिशनचे आकर्षण आहे दरिद्र-नारायण-सेवा आणि हॉस्पिटल. त्यांचे आकर्षण केवळ हेच आहे. त्यांचे काही कार्यक्रम नाहीत. त्यांच्या तत्वज्ञानाने कोणीही आकर्षित होणार नाही. आणि त्यांच्याकडे तत्वज्ञान कोणते आहे? काही हरकत नाही. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही.