MR/Prabhupada 0417 - या जन्मी आणि पुढील जन्मी सुखी रहा



Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968

तर या कृष्णभावनामृत आंदोलनाचा स्वीकार करा आणि या जन्मी आणि पुढील जन्मी सुखी बना. जर तुम्ही या जन्मी कृष्णावर प्रेम करण्याचे कार्य पूर्ण करु शकलात, तर तुम्ही शंभर टक्के केलेत. जर नाही, जेव्हढे टक्के या जीवनात तुम्ही केलेत, ते तुमच्या बरोबर राहील. ते जाणार नाही, भगवद् गीतेमध्ये आश्वासन दिले आहे. शुचीनां श्रीमतां गेहे योगो भ्रष्टो संजायते (भ.गी. ६.४१) |जो हि योग प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करु शकत नाही, त्याला पुढील जन्मात श्रीमंत कृटुंबात किंवा शुद्ध कुटुंबात जन्म घेण्याची संधी दिली जाते. दोन पर्याय.

तर एकतर तुम्ही शुद्ध कुटुंबात जन्म घेता किंवा श्रीमंत, कमीतकमी मनुष्य जन्म मिळण्याची खात्री आहे. पण जर तुम्ही हे कृष्णभावनामृत आंदोलन स्वीकारले नाहीत, तुम्हाला माहित नाही तुमचे पुढील आयुष्य काय आहे. ८,४००,००० भिन्न प्रजाती आहेत, आणि तुम्ही त्याच्यातील कोणालाही हस्तांतरित केले जाऊ शकता. जर तुम्हाला एक झाड बनण्यासाठी स्थानांतरित केले… जसे मी सॅन फ्रांसिस्कोमध्ये पाहिले. ते सांगतात की "हे झाड सात हजार वर्षांपासून उभे आहे." ते सात हजार वर्षांपासून बेंचवर उभे आहे. काहीवेळा शाळेमध्ये शिक्षकांद्वारे मुलांना शिक्षा केली जाते, "बेंचवर उभे राहा." तर या झाडांना शिक्षा केली आहे. "उभे रहा." निसर्गाच्या नियमाद्वारे. तर झाड बनण्याची संधी आहे, कुत्रा, मांजर, किंवा अगदी उंदीर बनण्याची संधी आहे. तर अनेक जन्म आहेत. मानवी जीवनाची हि संधी गमावू नका. तुमचे कृष्णावरचे प्रेम परिपूर्ण बनवा आणि या जन्मी आणि पुढील जन्मी सुखी बना.