MR/Prabhupada 0422 - महामंत्राचा जप करताना टाळायचे दहा अपराध ६ ते १०



Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968

प्रभुपाद: मग?

मधुद्विश: "क्रमांक सहा: जपाच्या नावावर पाप करणे."

प्रभुपाद: हो. आता हि दीक्षा, या दिवसापासून तुमचे खाते, मागील आयुष्य, सर्व पापकर्म, आता काय म्हटले जाते, जुळवून घेतले जाते. बंद. हे संपले. आता, कारण हरे कृष्ण जपाद्वारे तुम्ही तुमच्या पापकर्मांचे परिणाम संपवू शकता. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा कराल: "ओह, मी पाप करीन आणि मी जप करीन. ते सुधारले जाईल. शिल्लक शून्य असेल." नाही तसे नाही. असे करु नका. जे झाले ते झाले. आता आणखीन नाही. आता शुद्ध जीवन असले पाहिजे. अवैध यौन संबंध नाही, नशा नाही, जुगार नाही, आणि मांसाहार नाही. संपवा आता. असे नाही की "ओह, मी हरे कृष्ण जप करतो. चला मला हॉटेलात जाऊ द्या आणि थोडे मास घेऊ दे.: नाही. मग ते मोठे पाप होईल. ते करु नका. मग हरे कृष्ण जप फळाला येणार नाही, जर तुम्ही अपराध केलेत. पुढचा?

मधुद्विश: "क्रमांक सातवा: अभक्तांना भगवंतांचे नाव निर्देशित करणे."

प्रभुपाद: हो. अभक्त, ज्यांचा विश्वास नाही, की भगवंत आणि त्याचे नाव परिपूर्ण आहेत. ज्याप्रमाणे इथे या भौतिक जगात. नाव आणि व्यक्ती भिन्न आहेत. समजा तुझे नाव श्री.जॉन आहे. म्हणून जर मी जॉन, जॉन, जॉन, जप केला," तर जॉन शंभर मैल दूर असू शकेल. कोणताही प्रतिसाद नाही. पण नाव, भगवंतांचे पवित्र नाव, देव सगळीकडे उपस्थित आहे. जसे हे दूरदर्शन आहे. दूरदर्शन, मला म्हणायचे आहे, एका ठिकाणी प्रसारित होते. जर तुमच्याकडे मशीन आहे, लगेच चित्र तुमच्या खोलीत आहे. जर ते असेल, भौतिकदृष्ट्या ते शक्य आहे. आध्यात्मिक जगात याची शक्यता किती आहे, कृष्णाचे नाव? ताबडतोब तुम्ही श्री कृष्णाच्या नावाचा जप करता त्याचा अर्थ श्रीकृष्ण लगेच तुमच्या जिभेवर विराजमान आहेत. म्हणून ते काय आहे?

मधुद्विश: सातवा? "अभक्तांना पवित्र नाव निर्देशित करणे."

प्रभुपाद: तर, ज्याला विश्वास नाही की भगवंतांचे नाव आणि भगवंत स्वतः एकच आहेत, तिथे फरक नाही. त्याला भगवंतांच्या महानतेविषयी निर्देशित करू नये. त्याला समजावून दिले जाऊ शकते, पण जर तो समजू शकत नसेल तर, मग त्याला दीक्षा दिली नाही पाहिजे, किंवा तो समजून घेण्यासाठी काही वेळ आवश्यक आहे. पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे की नाम चिंतामणीः कृष्ण चैतन्य-रस-विग्रहः (चैतन्य चरितामृत मध्य १७.१३३) श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे नाव वेगळे नाही. जेव्हा तुम्ही हरे कृष्ण मंत्राचा जप करता त्याचा अर्थ कृष्ण तुमच्या जिभेवर नृत्य करीत आहेत. तुम्ही अशा प्रकारे सावध राहिले पाहिजे. जसे जर कृष्ण…

जसा तुम्ही मान देता तुमच्या आध्यत्मिक गुरूंना जेव्हा ते तुमच्या समोर येतात, त्याचप्रमाणे कृष्ण तुमच्या जिभेवर उपस्थित आहेत, तुम्हाला किती सावध राहिले पाहिजे. तुम्हाला नेहमी माहित असले पाहिजे की कृष्ण तिथे आहे. कृष्ण नेहमी सगळीकडे आहे. देव सगळीकडे आहे, पण आपण जाणू शकत नाही. पण हा विशेष जप, जेव्हा पवित्र नावाचा जप करता, त्याचा अर्थ तुम्हाला माहित असले पाहिजे. तर श्रीकृष्णांशी जोडले गेल्याने तुम्ही शुद्ध होता. श्रुण्वतां स्वकथाः. जसे आगीच्या संपर्कात तुम्ही गरम होता, तसेच, कृष्णांशी जोडले जाण्याचा अर्थ आहे तुम्ही शुद्ध होता. हळूहळू तुम्ही आध्यात्मिक बनता. आणखी भौतिक काही नाही, समाप्त. हि प्रक्रिया आहे. पुढचा?

मधुद्विश: "क्रमांक आठ: भौतिक धर्मपारायणते बरोबर पवित्र नावाची तुलना करणे."

प्रभुपाद: होय, आता हे कार्य केले जात आहे. असे नाही घेतले पाहिजे की आम्ही काही धार्मिक अनुष्ठान करीत आहोत. नाही. धार्मिक अनुष्ठान वेगळी गोष्ट आहे. हे आहे… जरी हे धार्मिक अनुष्ठानासारखे वाटले, पण हे दिव्य आहे. हे धर्माच्या सर्व प्रकारांच्या वरती आहे. हा पदव्युत्तर अभ्यास आहे. प्रक्रिया आहे कसे परम भगवंतांच्याबद्दल प्रेम विकसित करायचे. हे सर्वांच्या वरती आहे… धर्म म्हणजे, सामान्यतः, काही प्रकारची श्रद्धा. पण हा श्रद्धेचा प्रश्न नाही.

हे प्रत्येक्षात विकसनशील आहे, तुम्ही कृष्ण किंवा देवावर किती प्रेम करीत आहात. म्हणून हे सर्व धर्मांच्या वरती आहे. हा सर्वसाधारण धर्म नाही. धर्म म्हणजे... समाज तुम्ही ख्रिश्चन आहात, मी हिंदू आहे. जसे हे शरीर संपेल, माझे ख्रिश्चन असणे किंवा धर्म, सर्वकाही समाप्त होते. पण हे भगवंतांवरचे प्रेम संपणार नाही. ते तुमच्या बरोबर जाईल, ते विकसित होईल. जर तुम्ही संपवू शकलात, तर तुम्ही थेट कृष्णाकडे, भगवत धाम जाता, आणि तुमचे सर्व भौतिक संबंध संपवा. अगदी जरी तुम्हाला शक्य झाले नाही, तरी ते तुमच्या बरोबर जाते. मालमत्ता. हि आहे…बँकेतील शिल्लक कमी होत नाही. ती वाढते. मग?

मधुद्विश: "क्रमांक नऊ: पवित्र नावाचा जप करताना लक्ष नसणे."

प्रभुपाद: होय. जेव्हा तुम्ही जप करता आपण तो एकला देखील पाहिजे. ते ध्यान आहे. हरे कृष्ण, हे दोन शब्द, हरे कृष्ण तुम्ही ऐकू देखील शकता. जर तुम्ही ऐकलेत, तर तुमचे मन आणि तुमची जीभ दोन्ही मोहित होतील. ते परिपूर्ण ध्यान आहे. प्रथम श्रेणीचा योग, ऐकणे आणि जप करणे. पुढचा?

मधुद्विश: मग शेवटी क्रमांक दहा: "जप करण्याचा सराव करताना भौतिक गोष्टींत गुंतणे."

प्रभुपाद: होय. संपूर्ण प्रक्रिया हि आहे की आपण आपले प्रेम पदार्थांपासून देवाकडे स्थानांतरीत करणे. तर आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते आपोआप होईल. भक्ती: परेशानुभवो विरक्तीर अन्यत्र स्यात (श्रीमद भागवतम ११.२.४२) |जर तुम्ही प्रत्यक्षात भगवंतांवरचे प्रेम विकसित केलेत, तर नैसर्गिकरित्या तुम्ही या सर्व भौतिक मूर्खपणावर प्रेम करणे विसराल. हा क्रम आहे. पण तुम्ही देखील प्रयत्न केला पाहिजे. आपण केले पाहिजे... हे घडेल. ज्याप्रमाणे जर आपण खाल्ले, तर हळूहळू आपली खाण्याची आतुरता कमी होईल. जेव्हा तुमचे पोट भरते, तेव्हा तुम्ही सांगता, "मला आणखीन काही नको आहे. होय, मी…"

त्याचप्रमाणे, कृष्णभावनामृत इतके चांगले आहे की कृष्णभावनामृताच्या प्रगती बरोबर तुम्ही तथाकथित भौतिक मूर्ख आनंद विसरता. आणि जेव्हा तुम्ही परिपूर्ण अवस्थेत असता. ओह, तुम्हाला या कोणत्याही भौतिक मूर्खपणाची काळजी नसते. हि परीक्षा आहे. तुम्ही सांगू शकत नाही, "मी ध्यानात प्रगती करीत आहे, पण माझी इंद्रिय तृप्तीची भौतिक ओढ तीच आहे." ती प्रगती नाही. प्रगती म्हणजे तुम्ही तुमची भोतिक ओढ इंद्रिय तृप्तीची कमी करणे. हि प्रगती आहे. आता तुम्ही जप करू शकता... हं, तुम्हाला मिळाली आहे…

हरे कृष्ण जप करा.