MR/Prabhupada 0428 - मानवाचे विशेष उद्दीष्ट म्हणजे समजणे - मी कोण आहे



Lecture on BG 2.11 -- Edinburgh, July 16, 1972

समजण्या चा प्रयत्न करा कि आपण सगळे किती अज्ञान आहोत. हे ज्ञान होणं आवश्यक आहे कारण अज्ञाना पायी लोक एकमेकांशी भांडण करत आहेत. देश, राष्ट्र एकमेकांन बरोबर भांडण करत आहेत. एक धर्म मानणारा दुसर्या धर्माचा व्यक्ती शी भांडत आहे. पण ह्याचे एकच कारण आहे अज्ञान. मी हे शरीर नाही. म्हणून शास्त्र सांगत कि यस्यात्मा बुद्धीने कुनापे त्री धाकुते. आत्म बुद्धीः कुनापे, हे शरीर हाड मासांचे पोते आहे. आणि हे त्रिधातूं चे बनलेले आहे. धातु म्हणजे घटक. आयुर्वेदिक शास्त्रा प्रमाणेः कप पित्त वायू. पण मी एक पवित्र आत्मा आहे. मी परमेश्वराचाच एक अविभाज्यभाग आहे. अहम् ब्रम्हास्मि | ही वैदिक शिक्षा आहे. समजुन घ्या की तुम्ही ह्या भौतिक जगातले नाही आहात. तुम्ही सूक्ष्म जगातले आहात. तुम्ही देवाचच एक अंश आहे. मामेवम् सो जीव भूतः. भगवद्गीतेत देवाने सांगितले आहे कि "सारे प्राणीमात्र माझाच एक अंश आहे. मनः सस्थानिन्द्रीयाणी प्रकृती संस्थांनी करिष्यती प्राणीमात्र या भ्रमात राहुन आयुष्याशी झुंज देत आहे कि मी हा देह आहे. पण अशा प्रकारच्या भ्रमात राहाणे आणि अशी समजुन ठेवणे म्हणजे जनावरा शी बरोबरी आहे. कारण जनावरा सुद्धा खातात, झोपतात, मैथुन करतात. स्वतः चे रक्षण करतात. तसेच आपण ही जर मनुष्य असुन अशा गोष्टीं मध्ये रममाण राहिलो तर जसे कि खाणं, झोपणं, मैथुन, स्वतः चे रक्षण इत्यादी तर आपण जनावरां पेक्षा चांगले नाही आहोत. मानवाचा विशिष्ट हक्क हा आहे कि तयाने हे समजुन घेतले पाहिजे की " मी कोण आहे?" " मी हे शरीर आहे कि आणखी काही आहे. ?" खरं तर, मी हे शरीर नाही. मी तुम्हाला खुप उदाहरण दिले. मी आत्मा आहे. पण सध्या आपल्यातला प्रत्येक जण हे समजण्यात मग्न आहे कि मी हे शरीर आहे. कुणी ही हे समजण्या चा प्रयत्न करत नाही कि तो शरीर नाही तर एक शुद्ध स्वरूप आत्मा आहे. म्हणुन कृष्ण भक्तित सजग राहाण्याची मोहीम ला समजण्या चा प्रयत्न करा. आम्ही प्रत्येक व्यक्ती ला भेदभाव न करता सचेत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही शरीराला जास्त महत्त्व देत नाही. एखादे शरीर हिंदू असु शकते, मुसलमान असु शकते, युरोपियन असु शकते, अमेरिकन असु शकते. शरीर कुठल्याही प्रकार चे, कुठल्याही ढब चे असु शकते, जसे तुम्ही विविध प्रकारचे वस्त्र परिधान केलेली आहे. मी भगव्या वस्त्रात आहे, आणि तुम्ही काळ्या रंगाचे कोटात आहात. म्हणजे असे नव्हे की आपण सर्वांनी आपसात भांडण केले पाहिजे? तुम्ही वेगळ्या वस्त्रात असु शकता, मी वेगवेगळ्या वेषात असु शकतो. मग भांडणाचं कारण काय?? अशी समज असणं आवश्यक आहे, आज च्या काळात. नाही तर तुमच्यात आणि जंगलात फिरणार्या प्राण्यांन मध्ये काही फरक नाही. कुत्री, मांजर, वाघ सारखे प्राणी सतत भांडत असतात. म्हणुन जर आपल्याला खरं शांति हवी असेल तर तर आपल्या ला हे समजुन घेतले पाहिजे की " मी कोण आहे?" म्हणुन कृष्ण भक्ति मध्ये आम्ही प्रत्येकाला शिकवतो कि तो खरा कोण आहे. पण सर्वांची अवस्था अशी आहे की.......फक्त माझी किंवा तुमची नाही तर.. प्रत्येकाची. अगदी जनावरांची सुद्धा. त्यांच्यात ही तेच चैतन्य आहे जे आमच्यात आहे. कृष्ण सांगतात, कि सर्व योनीशु कौंतेय मुर्तयः संभवंती यः तसम् ब्रम्ह महद् योनिर्हम् बीजपर कृष्णाचे उपदेश आहे कि " मी सर्व प्राणीमात्रांचा बीजरूप आहे खरं तर हे सत्य आहे. जर आपल्याला या जगाच्या रचयित्या बद्दल जाणून घ्यायचे असेल तर भगवद्गीतेत सर्व विस्तारात सांगितले आहे. जसे कि पिता आईच्या गर्भाला बीज देतो. आणि बीज एका विशिष्ट आकाराच्या शरीरात रूपांतरित होते. तसेच आपण सर्व परमेश्वराचे अविभाज्य भाग आहोत. परमेश्वराने हे भौतिक जगत बनवले. आणि आपण विविध रूपात, शरीरात जन्म घेतला 84 लक्ष योन्या आहेत, जलज नव लक्षणी स्थावर लक्ष विंशती. याची भलीमोठी यादी आहे.