MR/Prabhupada 1062 - आपल्यामध्ये प्राकृतीवर नियंत्रण करण्याची प्रवृत्ती असते

From Vanipedia
Jump to: navigation, search
Go-previous.png मागील पृष्ठ - व्हिडिओ 1061
पुढील पृष्ठ - व्हिडिओ 1063 Go-next.png

आपल्यामध्ये प्राकृतीवर नियंत्रण करण्याची प्रवृत्ती असते
- Prabhupāda 1062


660219-20 - Lecture BG Introduction - New York

तर आम्ही, आम्ही चुकत असतो. जेव्हा ब्रह्मांडा मध्ये आश्चर्यकारक गोष्टी घडताना दिसतात, तेव्हा ह्या सृष्टी मागे एक नियंत्रक आहे हे आपण जाणले पाहिजे. कोणतीही गोष्ट नियंत्रणाशिवाय प्रकट होऊ शकत नाही. नियंत्रकच नाही असे समजणे हे बालिशपणा आहे. उदाहरणार्थ एक खूप छान मोटारगाडी, फार चांगल्या वेगाची, आणि फार चांगली अभियांत्रिकी व्यावस्थेची, रस्त्यावर चालत आहे. एखादे लहान बालक विचार करेल की, "ही मोटारगाडी कशी चालत आहे, घोडा किंवा इतर खेचून नेणर्‍या प्राण्यांच्या मदती शिवाय?" परंतु एखाद्या समजूतदार व्यक्तीला किंवा एखाद्या वयस्कर वाक्तीला, हे माहीत असते की मोटारगाडीत सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी व्यवस्था असूनही, चालका शिवाय ती चालू शकत नाही. एखाद्या मोटारगादीची अभियांत्रिकी व्यवस्था, किंवा वीजघरामध्ये... आता हल्लीच्या काळात हे यंत्रणाचे दिवस आहेत, आपल्याला सदैव माहीत असले पाहिजे की अशा यंत्रामागे, एखाद्या आश्चर्यकरकपणे चालणार्‍या यंत्रा मागे एक चालक असतो. याचप्रमाणे परमेश्वर चालक आहेत, अध्यक्ष. ते परमेश्वर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत असते. या सर्व जीवांना, किंवा प्राणिमात्रांना , भगवद गीते मध्ये भगवंतांनी स्वीकारले आहे. जसे आपण पुढे येणाऱ्या प्रकरणांमधून जाणू शकतो कि ते परमेश्वराचे अंश आहेत. ममैवान्शो जीवलोके (भ.गी. १५|७). अंश म्हणजे भाग किंवा अंग. जसे सोन्याचा एक कण देखील सोनेच असतो, समुद्रातील एक पाण्याचा थेंब देखील खारटंच असतो, त्याचप्रमाणे, आपण, जीव परमेश्वराचे अंश असल्यामुळे, ईश्वर, भगवान किंवा श्रीकृष्ण, आपल्याला त्याचे गुण प्राप्त झाले आहे, म्हणजे मला असे म्हणायचे आहे, गुणात्मतक दृष्टीने आपल्याकडे भगवंतांचे सर्व गुण आहेत परंतु सीमित (खूप कमी प्रमाणात). कारण कि आपण अतिशय छोटे ईश्वर आहोत, गौण (कमी प्रतीचे) ईश्वर आहोत, आपणही नियंत्रण करण्याचा किंवा सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो. आपण प्रकृति वर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या आपण अंतरिक्ष आपल्या नियंत्रणा खाली आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण कृत्रिम ग्रहांना अंतरिक्षामध्ये स्थित करण्याचा प्रयत्न करीत आहात. तर हि नियंत्रणाची अथवा सृजनाची प्रवृत्ती आहे कारण आंशिक रूपाने आपल्याकडे नियंत्रण करण्याची प्रवृत्ती आहे. परंतु आपण हे जाणले पाहिजे कि केवळ हि प्रवृत्ती असणे पुरेसे नाही. आपल्याकडे भौतिक जगातला नियंत्रित करण्याची, त्यावर सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती आहे, परंतु आपण परम नियंत्रक नाही. तर हि गोष्ट भगवद गीते मध्ये सांगण्यात आली आहे.

मग हि भौतिक प्रकृति काय आहे ? प्रकृतीची व्याख्या देखील केली गेली आहे. प्रकृति, भौतिक जगताची व्याख्या भगवद गीते मध्ये अपरा, अपरा प्रकृति म्हणून केली गेली आहे. अपरा प्रकृति किंवा निम्नतर प्रकृति, आणि जीवाची व्याख्या परा अथवा उच्चतर प्रकृति म्हणून केली गेली आहे. प्रकृतिचा अर्थ आहे जी सदैव नियंत्रित केली जाते.... प्रकृतिचा खरा अर्थ आहे स्त्री किंवा स्त्रीस्वरूप. ज्याप्रमाणे एक पती आपल्या पत्नीची कार्ये नियंत्रित करतो, त्याचप्रमाणे, प्रकृति हि निम्न आहे, आधिन आहे. स्वामी, परम पुरुषोत्तम भगवान अध्यक्ष / परम नियंत्रक आहेत. आणि या प्रकृति, दोन्हीही जीव आणि भौतिक, या भिन्न प्रकृति आहेत, ज्या भगवंतांद्वारे नियंत्रित केल्या जातात. तर भगवद गीते नुसार, जीव, जरी भगवंतांचे अंश आहेत, तरी त्यांना प्रकृति मानले गेले आहे. याच स्पष्ट उल्लेख भगवद गीतेच्या सातव्या अध्यायात केला गेला आहे. अपरेयम् इतस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परम् (भ.गी. ७|५). हे भौतिक जगात अपरा इयं आहे. इतस्तु, आणि याच्या पलीकडे अजून एक प्रकृति आहे. आणि ती प्रकृति कोणती आहे ? जीव-भूत

तर हि प्रकृति (अपरा ), तीन गुणांनी बनलेली आहे : सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तीन गुणांच्या परे आहे, शाश्वत काळ. काळ शाश्वत आहे. आणि प्राकृतिक गुणांच्या संयोगाने आणि कालाच्या नियंत्रणातून जी कार्ये घडतात, त्यांना कर्म असेल संबोधले जाते. अशी कार्ये शास्वत कालापासून चालत आलेली आहेत. आणि आपण आपल्या कर्माची चांगली वाईट फळे भोगत असतो.