MR/Prabhupada 1074 - भौतिक जगातल्या सर्व दुःखाचे मूळ हे शरीर आहे



660219-20 - Lecture BG Introduction - New York

या जगात जे दुखः आपण अनुभवतो - हे सगळे शरीरातून जन्माला येते भगवद्गीता मध्ये, अन्यथा असे म्हटले गेले आहे

अव्यक्तो अक्षर इत्युक्तस्
तमाहु: परमां गतिम्
यं प्राप्य न निवर्तन्ते
तद्धाम परमं मम: (भ गी ८।२१)

अव्यक्त याचा अर्थ अप्रकट .

जरी भौतिक जगाचा भाग आपल्या समोर प्रकट झाला नाही तरीही आपली संवेदना इतकी अपूर्ण आहेत की आपण पाहू शकत नाही कि किती तारे , किती ग्रह या भौतिक विश्वात आहेत . अर्थात, वैदिक साहित्य माध्यमातून आपल्याला सर्व ग्रहांची माहिती मिळते. आपण विश्वास करू किंवा नाही, परंतु ज्या महत्त्वाच्या ग्रहांशी आपला संबंध आहे त्यांचे वैदिक साहित्यात , विशेषत: श्रीमद-भागवतम मध्ये वर्णन केले आहे. पण आध्यात्मिक जग , जे या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे , परसतस्मात्तु भावोन्यो (भ गी ८।२०) परंतु अव्यक्त ,ते अप्रकट अध्यात्मिक आकाश , परमां गतिम् , आपल्याला त्या परम धामाला प्राप्त करण्याची इच्छा केली पाहिजे . आणि एकदा त्या सर्वोच्च राज्यात आल्यावर , यं प्राप्य, न निवर्तन्ते, त्याला या भौतिक जगात परत येण्याची गरज नाही. हेच प्रभुचे शाश्वत निवासस्थान आहे, ते जिथून जिथे आम्हाला परत येण्याची गरज नाही, तेच आपले आहे ..(विराम ) आता प्रश्न उद्भवला जाऊ शकतो, तिथे कसे जायचे , परमेश्वराच्या निवासस्थानि कसे पोहोचावे ? भगवद गीते मध्ये त्याचे देखील वर्णन केले आहे. ८ व्या अध्यायात असे म्हटले आहे की, श्लोक ५,६,७,८, परमेश्वर किंवा परमेश्वराचे निवासस्थान गाठण्याची प्रक्रिया देखील इथे दिली आहे . असं म्हटलं आहे कि :

अन्तकाले च मामेव
स्मरन्मुक्त्वा कलेवरम
य: प्रयाति स मद भावमं
याति नास्त्यत्र संशय: (भ गी ८।५)


अन्तकाले , आयुष्याच्या शेवटी , मृत्यूच्या क्षणी . अन्त-काले च मामेव । जो व्यक्ती श्री कृष्णाचे चिंतन करतो , स्मरण , जर तो आठवू शकला . मरणप्राय व्यक्ती जर तो मृत्यूच्या वेळी , जर तो कृष्णाचे रूप आठवतो , आणि त्याप्रकारे स्मरण करता करता , जर तो सध्याचे शरीर सोडतो , तर तो निःसंशय परम धमाची प्राप्ती करतो , मंद भवं . भवं म्हणजे आत्मिक स्वभाव. य: प्रयाति स मद भावं याति । मद- भावं शब्द म्हणजे परम पुरुषाची परम स्वभाव प्रकृती. जसे आपण वर वर्णन केले आहे , परम पुरुष सच्चिदानन्द विग्रह आहे (ब्र स ५।१) । ला त्याचे स्वरूप आहे, परंतु त्याचे स्वरूप शास्वत आहे, सत ; आणि ज्ञानाने भरलेले, चित ; आणि आनंदाने भरलेला, आनंद . आता आपण आपल्या शरीराची तुलना करू शकतो, हे शरीर सत-चित -आनंद स्वरूप आहे का नाही. हे शरीर असत आहे. सत च्याऐवजी हे असत आहे .

अंतवंत इमे देहा (भ गी २।१८), भगवद् गीता सांगते कि , हे शरीर अंतवत आहे , नाशवंत . आणि ... सच चिद अानंद . सत च्याऐवजी हे असत आहे , अगदी उलट . आणि चित च्याऐवजी , ज्ञानाने परिपूर्ण असण्याच्या ऎवजी , हे अज्ञानाने भरले आहे. आपल्याला आध्यात्मिक राज्याचे काहीच ज्ञान नाही , आणि या भौतिक जगाबद्दल सुद्धा आपल्याला नेट माहिती नाही. बर्याच साऱ्या गोष्टी आपल्याला अज्ञात आहेत, म्हणून हे शरीर अज्ञान आहे. . ज्ञानाने भरलेले असण्याऐवजी हे अज्ञानी आहे. शरीर नाशवंत आहे, अज्ञानाने भरलेले , आणि निरानंद आनंदाने पूर्ण असण्याऐवजी ते दुःखाने भरले आहे . भौतिक जगात आपण अनुभवत असलेले सर्व दुःख या शरीरा मुळेच आहेत.