MR/Prabhupada 0173 - आपण प्रत्येकाचे मित्र बनले पाहिजे

Revision as of 09:49, 27 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0173 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 1.7.6 -- Vrndavana, April 23, 1975


तर आपण भगवद्-गीता किंवा श्रीमद् -भागवतातून श्रीकृष्णांबद्दल ज्ञान मिळवलं पाहिजे. कृष्ण परम पुरुषे भक्तिर उत्पद्यते. जर तुम्ही श्रीमद् -भागवत ऐकलं... नक्कीच, जर आपण श्रीकृष्णांचे मूलभूत तत्व किंवा परिपूर्णतेचे मूलभूत तत्व जाणले नाही तर... ते सुरवातीला श्रीमद् -भागवतात म्हटले आहे.

धर्मः प्रोज्झितकैतsत्र परमो निर्मत्सराणाम् (SB 1.1.2)

इथे श्रीमद् -भागवतात तथाकथित निर्माण केलेले धर्मांना काढले आहे. तो परमहंसांसाठी आहे. निर्मत्सराणां. निर्मत्सर म्हणजे ज्याला कोणाबद्दलही मत्सर वाटत नाही. तर आपला मत्सराचे उगमस्थान श्रीकृष्ण आहेत. आपण श्रीकृष्णांना स्वीकारत नाही. मुख्यतः ते म्हणतात," श्रीकृष्णचं का केवळ परमपुरुष? असे इतर अनेक आहेत." तो मत्सर. तर आपला मत्सराचे उगमस्थान श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून तो अनेक प्रकारे विस्तारित झाला आहे. आणि आपल्या सामान्य जीवनात आपण प्रत्येकाचा मत्सर करतो. आपण आपल्या मित्रांचा द्वेष करतो, आपल्या वडिलांचा द्वेष करतो अगदी आपला मुलगा, इतरांबद्दल काय बोलणार - व्यापारी,राष्ट्र,समाज,जमात,केवळ द्वेष,मत्सर. "तो का पुढे जाणार?" मला मत्सर वाटतो. ही भौतिकवृत्ती आहे. तर जेव्हा एखादा श्रीकृष्णांना जाणतो,तो कृष्णभावनामृत आहे, तो निर्मत्सरी बनतो,कोणाचाही मत्सर नाही. त्याची मित्र बनण्याची इच्छा असते.

सुहृद: सर्वभूतानां तर ही कृष्णभावनामृत चळवळ आम्हाला सर्वांचा मित्र बनण्याची इच्छा आहे. करणं ते कृष्णभावनेच्या अभावी त्रास सहन करत आहेत, आम्ही दारोदार जात आहोत. कृष्णभावनामृताचा प्रचार करण्यासाठी शहर,गावोगाव, मोठ्या गावी जात आहोत. आणि कृष्ण कृपेने आम्ही बुद्धिमान दर्जाच्या माणसांचे लक्ष वेधून घेत आहोत. जर आम्ही हि पद्धत चालू ठेवली, मत्सरी न बनण्याची.. ते पशु स्वभाव,कुत्र्याचा स्वभाव,डुकराच्या स्वभावाचे आहे. मनुष्य स्वभाव पर-दुःख-दुःखी असला पाहिजे. इतरांना कष्टी अवस्थेत पाहून दुःखी व्हायला पाहिजे. तर प्रत्येकजण कृष्णभावनेच्या अभावी दुःख भोगत आहे. आपल एकमेव काम म्हणजे त्याची चेतना जागृत करणे,आणि संपूर्ण जग सुखी होईल.

अनर्थोपशमं साक्षाद्भत्त्कियोगमधोक्षजे लोकस्याजानतो

लोकांना याच्याबद्दल काहीच माहिती नाही. म्हणून आम्ही ही चळवळ पुढे नेत आहोत. लोकस्याजान...

विद्वांश्चक्रे सात्वत संहिताम् (SB 1.7.6)

कृष्णभावनामृत चळवळीचे दुसरे नाव भागवत धर्म आहे. भागवत धर्म. जर आपण तो स्वीकारला . तर संपूर्ण मानव समाज सुखी होईल.

आभारी आहे.