MR/Prabhupada 0217 - देवहुतीची स्थिती परिपूर्ण स्त्रीची आहे
Lecture on SB 3.28.1 -- Honolulu, June 1, 1975
तर हि राजकुमारी म्हणजे मनु यांची कन्या, ती कदंब मुनींची सेवा करू लागली. आणि योगआश्रमात , ती एक झोपडी होती आणि तिथे चांगले अन्न नव्हते, दासी नव्हत्या, काहीच नाही. त्यामुळे ती हळूहळू खूपच बारीक आणि कृश झाले आणि ती अतिशय सुंदर होती, राजाची मुलगी. म्हणूनच कदंब मुनींनी विचार केला की, "तिच्या वादिल्लानी तिला इथे दिले, आणि तिचे आरोग्य ,तिचे सौंदर्य बिघडत आहे . म्हणून पती म्हणून मला तिच्यासाठी काहीतरी करावे लागेल ." म्हणून योग शक्तीने त्यांनी मोठ्या शहराच्या विमानाचे निर्माण केले. हि योगिक शक्ती आहे . ७४७ नाही. (हशा) इतके मोठे शहर, तिथे तलाव होता, बाग होती, दासी होत्या , मोठी मोठी शहरे , आणि हे सर्व आकाशात तरंगत होते , त्यांनी तिला सर्व विविध ग्रह दाखवले. अशा प्रकारे ... हे चौथ्या अध्यायात सांगितले आहे , तुम्ही ते वाचू शकता. तर एक योगी म्हणून त्याने तिला प्रत्येक बाबतीत समाधानी केले.
आणि मग तीला मुले हवी होती. म्हणूनच कादंब मुनींनी तिला नऊ मुली आणि एक मुलाचे आश्वासन दिले, वचानासोबत कि , "जेव्हा तुला मुले होतील तेव्हा मी निघून जाइन . मी तुझ्यासोबत कायम राहणार नाही." तर तिने ते मान्य केले . तर मुले झाल्यानंतर , त्यांपैकीच हे कपिल मुनी एक होते , एक मुलगा , आणि जेव्हा तो मोठा झाला तेव्हा तो म्हणाला, "हे प्रिय आई, माझे वडील घर सोडून गेले आहेत , मी सुद्धा घराचा त्याग करेन . तुला माझ्याकडून काही उपदेश घ्यायचा असल्यास घेऊ शकतेस . मग मी निघून जाईन . तर जाण्याआधी आईने त्याने त्याच्या आईला उपदेश दिला . आता देवहुतीची हि स्थिती ही एक परिपूर्ण स्त्रीची आहे, तिला चांगले वडील मिळाले , चांगला पति मिळाला आणि तिला उत्कृष्ट मुलगा मिळाला. तर जीवनात स्त्रियांच्या तीन अवस्था असतात आणि पुरुषाच्या दहा अवस्था आहेत . या तीन चरणांचा अर्थ असा असतो की जेव्हा ती वयाने लहान असेल तेव्हा ती वडिलांच्या संरक्षणातच जगली पाहिजे. देवहुती प्रमाणेच . मोठी झाल्यावर तिने आपल्या विचारले की "मला त्या गृहस्थाशी लग्न करायचं आहे , ते योगी." आणि वडीलदेखील तयार झाले .
तर जोपर्यंत तिचं लग्न झालं नव्हतं ती वडिलांच्या संरक्षणाखाली राहिली . आणो जेव्हा तिने विवाह केला ती योगी पतीकडे राहिली . आणि तीने अनेक त्रास झाले कारण ती एक राजकन्या होती, राजाची मुलगी . आणि हे योगी, तो एका झोपडीत होता, खाण्यासाठी अन्न नाही , निवारा नाही , तसले काही नाही . त्यामुळे तिला दुःख सहन करावे लागले. तिने कधीही म्हंटले नाही कि "मी राजकन्या . मी सुख समृद्ध वातावरणात वाढली आहे . आता मला एक पती मिळाला आहे जो मला छान घर देऊ शकत नाही,अन्न देऊ शकत नाहि . त्याला घटस्फोट द्या. " नाही. असे कधीही केले नाही, ही स्थिती नाही आहे . " जे काहीही असो , माझे पती , तो जसा असेल , कारण मी त्याला पती म्हणून स्वीकारले आहे मी त्यांच्या सुखसोयीचा विचार केला पाहिजे , बाकी कशाचीहि पर्वा नाहि " हे स्त्रीचे कर्तव्ये आहे, पण ही वैदिक शिक्षा आहे . आजकाल थोडे विसंगती , मतभेद आणि घटस्फोट. दुसरा पती शोधा. नाही , ती राहिली . आणि मग तिला सुंदर मुले झाली . ईश्वराचे व्यक्तिमत्त्व असलेलें , कपिल . तर हे तीन चरण आहेत. महिलांनी महत्व्क्कांकशी व्हावे ... सर्वप्रथम त्यांना आपल्या कर्माद्वारे योग्य वडिलांकडे स्थान देण्यात मिळते , आणि नंतर योग्य पतीखाली मग कपिलदेवसारख्या छान मुलाला जन्म द्या.