MR/Prabhupada 0131 - वडिलांना शरण जाणे नैसर्गिक आहे

Revision as of 09:46, 3 April 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Hindi Pages with Videos Category:Prabhupada 0131 - in all Languages Category:HI-Quotes - 1966 Category:HI-Quotes - Lec...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 7.11-16 -- New York, October 7, 1966


हा वेडेपणा, हा भ्रम,ह्या भौतिक विश्वाच्या मोहजालावर मात करणे अवघड आहे. ते फार कठीण आहे. पण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय,

मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते (भ गी ७।१४).

जो कोणी स्वेच्छेने,किंवा त्याच्या दुःखमय आयुष्याचे कारण समजून,जर तो श्रीकृष्णांना शरण गेला. "माझ्या भगवान श्रीकृष्ण, अनेक जन्म मला तुमचा विसर पडला. आता मला समजले की तुम्ही माझे वडील आहात, तुम्हीच रक्षणकर्ता आहात. मी तुम्हाला शरण जातो." ज्याप्रमाणे एखादा हरवलेला मुलगा वडिलांकडे जातो. "माझे प्रिय पिताश्री, माझा गैरसमज झाला होता की मी तुमच्या संरक्षणापासून दूर गेलो, परंतु त्याचा मला त्रास झाला. आता मी तुमच्याकडे परत आलो आहे."वडील त्याला आलिंगन देऊन जवळ घेतात,"माझ्या प्रिय मुला,ये मी प्रत्येक दिवस तुझ्या काळजीत होतो. अरे,मी खूप आनंदी आहे की तू परत आलास." वडील खूप दयाळू असतात.

तर आपलीही हीच स्थिती आहे. जेव्हा केव्हा आपण भगवंतांना शरण जाऊ... ते फार अवघड नाही. मुलाने वडिलांना शरण जाणे,खरंच का हे फार अवघड आहे? तुम्हाला वाटत का की हे फार कठीण काम आहे? एखाद्या मुलाने वडिलांना शरण जाणे हे नैसर्गिक आहे. त्यात अपमानास्पद काही नाही. वडील नेहमीच वरिष्ठ असतात. जर मी माझ्या वडिलांच्या पायांना स्पर्श केला,जर मी त्यांना नमन केले, तर तो सन्मानच आहे. तो माझा अपमान नसून गौरव आहे.यात काही अडचण नाही. आपण श्रीकृष्णांना का शरण जायचं नाही? तर हि पद्धत आहे. मामेव ये प्रपद्यन्ते. "हे सगळे गोंधळलेले जीवात्मे,जेव्हा ते मला शरण येतील,"

मायामेतां तरन्ति ते (भ गी ७।१४).

"त्याला आयुष्यात कसलेही दुःख रहाणार नाही". तो वडिलांच्या संरक्षणाखाली राहील. हे तुम्हाला भगवद् गीतेच्या शेवटच्या अध्यायात सापडेल,

अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: (भ गी १८।६६)

जेव्हा वडील...जेव्हा मूल आई जवळ येत,आई रक्षण करते. जर काही धोका असेल,मुलाचे आयुष्य वाचवण्यासाठी आई आपलं आयुष्य द्यायला तयार असते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण भगवनतांच्या संरक्षणाखाली असतो,मग तिथे कसलंही भय नाही.