MR/Prabhupada 0153 - साहित्याच्या योगदानावरून एखाद्याची बुद्धिमत्ता तपासली जाते: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0153 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - C...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0152 - एक पापी मनुष्य श्री कृष्ण के प्रति जागरूक नहीं बन सकता है|0152|MR/Prabhupada 0154 - तुम अपने हथियार हमेशा तेज रखना|0154}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0152 - पापी व्यक्ती कृष्ण भावनामृत बनू शकत नाही|0152|MR/Prabhupada 0154 - तुमच्या शस्त्रांना कायम धार काढून ठेवा|0154}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 18: Line 18:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|ra_HOOQSdD8|साहित्याच्या योगदानावरून एखाद्याची बुद्धिमत्ता तपासली जाते <br/> - Prabhupāda 0153}}
{{youtube_right|TQ48tqoqUVI|साहित्याच्या योगदानावरून एखाद्याची बुद्धिमत्ता तपासली जाते <br/> - Prabhupāda 0153}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 17:53, 1 October 2020



Interview with Newsweek -- July 14, 1976, New York


मुलाखतकार: आपण उल्लेख केलेल्या तीन गोष्टीपैकी प्रत्येक गोष्ट तुम्ही विस्तृतपणे सांगू शकाल का - आहार, निद्रा आणि मैथुन, आणि मला सांगा विशेषकरून कोणते नियम आणि इशारे तुम्ही लोकांना द्याल. जे या मार्गाने त्यांच्या जीवनात प्रगती करण्यासाठी आत्मिक ज्ञान शोधत आहे.

प्रभुपाद: होय. होय, ती आमची पुस्तक आहेत, हि आपली पुस्तक आहेत. आमच्याकडे बरीच पुस्तक समजून घेण्यासाठी आहेत. ती अशी गोष्ट नाही की तुम्ही एका मिनिटात समजू शकाल.

मुलाखतकार: मला असं समजलं की तुम्ही खूप कमी झोपता. तुम्ही रात्री तीन ते चार तास झोपता. तुम्हाला असं वाटत का की कोणताही मनुष्य अध्यात्मिदृष्ट्या वास्तविकतेत हे अनुभवले का?

प्रभुपाद: हो, आम्ही गोस्वामींच्या वागण्यावरून पाहतो. त्यांना प्रत्यक्षात भौतिक गरज नव्हत्या. हे आहार,निद्रा,भय,आणि मैथुन व्यावहारिकदृष्ट्या त्यांना अशा काही गोष्टी नव्हत्या. ते फक्त श्रीकृष्णांच्या सेवेत गुंतले होते.

मुलाखतकार:कशात गुंतले?

रामेश्वर: श्रीकृष्णांच्या सेवेत किंवा भगवंतांच्या सेवेत.

बली-मर्दन: आधीच्या आचार्यांचे उदाहरणाचे अनुसरण करत आहेत.

मुलाखतकार: छान, मला यात रस आहे का... त्यानं असं वाटत का की तीन चार तास झोप पुरेशी आहे?

बली-मर्दन: वेगळ्या शब्दात,का... ती विचारत आहे. तुम्ही तीन ते चार तास का झोपता. तुम्ही त्या परिमाणापर्यंत कसे पोचलात?

प्रभुपाद: ते कृत्रिमरीत्या नाही. तुम्ही जास्तीत जास्त अध्यात्मिक गोष्टीत गुंतलात, तितके जास्त तुम्ही भौतिक गोष्टीतून मुक्त होता. ती खरी परीक्षा आहे.

मुलाखतकार: आणि म्हणून तुम्ही पोचलात त्या ...

प्रभुपाद: नाही, मी माझ्याबद्दल बोलत नाही,पण ती परीक्षा आहे.

भक्ति: परेशानुभवो विरक्ती रन्यत्र स्यात (श्री भ ११।२।४२). जर तुम्ही अध्यात्मिक जीवनात भक्तीमध्ये प्रगती केलीत,मग तुम्हाला भौतिक जीवनात रस राहत नाही.

मुलाखतकार: जगातील विविध लोकांमध्ये भिन्नता आहे असं तुम्हाला वाटत का? दुसऱ्या शब्दात, तुम्हाला असं वाटत का की यूरोपियन लोकांपेक्षा भारतीय लोकांमध्ये कृष्णभावनामृत स्वीकारायची प्रवृत्ती जास्त प्रमाणात आहे किंवा ते कृष्णभावना लवकर स्वीकारतात?

प्रभुपाद: नाही, कोणताही बुद्धिमान मनुष्य कृष्णभावनामृत बनू शकतो. ते मी आधी स्पष्ट केलं आहे. की एखादा जर बुद्धिमान नसेल तर तो कृष्णभावनामृत स्वीकारत शकत नाही. तर हे सगळ्यांसाठी खुलं आहे. पण बुद्धिमत्तेच्या निरनिराळ्या श्रेणी आहेत. यूरोप,अमेरिकेतील लोक, ते बुद्धिमान आहेत. पण त्यांची बुद्धिमत्ता भौतिक उद्देशासाठी वापरली जाते. आणि भारतातीयांची बुद्धिमत्ता अध्यात्मिक उद्देशासाठी वापरली जाते. म्हणून तुम्हालाअनेक उच्च दर्जाचे अध्यात्मिक आदर्श जीवन, पुस्तक,साहित्य सापडत. जसे व्यासदेव. व्यासदेव सुद्धा गृहस्थाश्रमात होते. पण ते जंगलात रहात होते,आणि त्यांचे साहित्याचे योगदान बघा. कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. तर साहित्यातील योगदानाद्वारे, एखाद्याची बुद्धिमत्ता तपासली जाते. सर्व मोठी मोठी भौतिक जगातील माणसं, शास्त्रज्ञ,तत्ववेत्ता, अगदी तंत्रज्ञ. त्याना त्यांच्या लिखाणावरून,योगदानावरून ओळखले जाते, त्यांच्या विशाल शरीरावरुन नाही.