MR/Prabhupada 0020 - कृष्णा त्यामुळे सोपे नाही आहे हे समजण्यास



Arrival Lecture -- Miami, February 25, 1975

श्रीकृष्णांना समजून घेणे ही सोपी गोष्ट नाही आहे. मनुष्याणां सहस्त्रेषु कश्र्चिद्यतति सिद्धये | यततामपि सिद्धानां कश्र्चिन्मां वेत्ति तत्त्वतः (भ.गी. ७.३) हजारो, लाखो लोकांमधून, एक त्याचे आयुष्य यशस्वी करण्यात उत्सुक असतो. कोणालाच स्वारस्य नाही. प्रत्यक्ष व्यवहारात खरंतर त्यांना जीवनाचे यश काय आहे हे माहित नाही. आधुनिक संस्कृती, प्रत्येकजण विचार करत आहे, "जर मला एक चांगली पत्नी आणि छान मोटारगाडी आणि एक छान घर मिळाले, की ते यश आहे." ते यश नव्हे. ते तात्पुरते आहे. खरे यश हे मायेच्या तावडीतून सुटका करून घेण्यात आहे. म्हणजेच हे भौतिक बद्ध जीवन हे जन्म, मृत्यू, वृद्ध आणि रोग ह्यांनी समाविष्ट आहे. आम्ही जीवनाच्या बर्‍याच प्रकारातून मार्ग काढत आहोत. आणि हा मनुष्यरूपी जन्म एक चांगली संधी आहे बाहेर पडण्याची ह्या साखळीतून जी एका मागून एक शरीर बदलते. आत्मा हा शाश्वत आणि प्रसन्न असतो कारण श्रीकृष्णाचा अविभाज्य अंग आहे, देवाचा, सच्-चिद्-आनन्द​, शाश्वत, संपूर्ण परमानंद, संपूर्ण ज्ञान. दुर्दैवाने, या भौतिक, सशर्त जीवनात आम्ही, विविध शरीर बदलत आहोत, पण आपण त्या आध्यात्मिक व्यासपीठावर स्थित होत नाही जिथे जन्म नाही, मृत्यू नाही. तिथे कुठले ही विज्ञान नाही. एके दिवशी एक मॅनोतज्ञ मला पाहावयास आला होता. आणि तुमचे आत्म्याला समजण्याचे शिक्षण कोठे आहे, त्याची घटनात्मक स्थिती? त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात संपूर्ण जग अंधकारात आहे. त्याना पन्नास,साठ, किंवा शंभर वर्षाच्या जीवन कालावधीत स्वारस्य आहे, पण त्याना हे माहीत नाही आहे की आपण शाश्वत, परमानंदी, संपूर्ण ज्ञानी आहोत, आणि या भौतिक शरीरामुळे आपण जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग ह्यांच्या अधीन आहोत. आणि सतत हे चालू आहे. त्यामुळे श्री चैतन्य महाप्रभू, त्यांची महान करुणा नैतिक अधःपतन झालेल्या आत्म्यांच्या प्रित्यर्थ, ते अवतरले. श्रीकृष्ण येतात, पण श्रीकृष्ण इतके उदारमतवादी नाही. श्रीकृष्ण अट घालतात की "सर्वप्रथम मला शरण या, नंतर मी तुमची जबाबदारी स्वीकारतो." पण श्री चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्णांपेक्षा जास्त दयाळू आहेत, जरी श्रीकृष्ण आणि श्री चैतन्य महाप्रभू, एकच आहेत. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंच्या आशीर्वादामुळे आम्ही श्रीकृष्णांचे सहजगत्या आकलन करू शकतो. जेणेकरून चैतन्य महप्रभू इथे उपस्थित आहेत. त्यांची पूजा करा, ते अवघड नाही आहे. यज्नैः सण्किर्तन प्रायैर्यजन्तिहि सु-मेधसः . कृष्णवर्णं त्विशाकृष्णं साण्गोपाण्गास्त्रपार्षदम्, यज्नैः सण्कीर्तनम् (श्री.भा.११.५.३२) तुम्ही फक्त हरे कृष्ण मंत्राचा जप करा, आणि तुम्हाला जे शक्य असेल ते, चैतन्य महप्रभूंना अर्पण करा. ते फार दयाळू आहेत, ते अपराध घेत नाहीत. राधा-कृष्ण ह्यांची पूजा करणे थोडे कठीण आहे. आम्हाला त्यांची श्रद्धायुक्त भय आणि भक्तिभावाने पूजा केली पाहिजे. पण चैतन्य महाप्रभू स्वेच्छेने अधःपतन झालेल्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी आले आहेत. थोडीशी सेवा, त्यांचे समाधान होईल. त्यांचे समाधान होईल. पण दुर्लक्ष करू नका. कारण ते दयाळू व कनवाळू आहेत, म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यांचे स्थान विसरावे. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून आपण त्यांचा आदर केला पाहिजे, आणि जितके शक्या होईल तितके... पण लाभ हा आहे की चैतन्य महप्रभू आपल्यावर रागावत नाहीत. आणि त्यांची पूजा करणे, आणि त्याना खुश करणे, फार सोपे आहे. यज्नैः सण्कीर्तनैःप्रायैर्यजन्तिहि सु-मेधसः . फक्त तुम्ही हरे कृष्णा ह्या महामंत्राचा जप करा आणि नाचा, आणि चैतण्या महाप्रभू अती प्रसन्न होतील. त्यांनी हा नाच आणि जपाची सुरवात केली, आणि ही फार सोपी पद्धत आहे देवाला अनुभवायची. तर जेव्हडे शक्य असेल तेव्हडे... जर शक्य असेल, चोवीस तास. हे शक्य नसेल, तर किमान चार वेळा, सहा वेळा, चैतन्य महाप्रभूंच्या समोर हरे कृष्ण मंत्राचा जप करा, आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळेल. ही वस्तुस्थिती आहे.