Please join, like or share our Vanipedia Facebook Group
Go to Vaniquotes | Go to Vanisource | Go to Vanimedia


Vanipedia - the essence of Vedic knowledge

MR/Prabhupada 0021 - का या देशात अनेक घटस्फोट

From Vanipedia


Why So Many Divorces In This Country -
Prabhupāda 0021


Lecture on SB 6.1.26 -- Honolulu, May 26, 1976

तर हा जीवनाचा सर्वसाधारण मार्ग आहे. प्रत्येकजण ह्या भौतिक कार्यात गुंतलेला आहे, आणि ह्या भौतिक कार्यांचे मूलभूत तत्व ग्रुहस्थ आहे, कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन, वैदिक प्रणाली नुसार, किंवा कोठेही, बायको, मुले ह्यांची देखभाल करण्याचे जबाबदार जीवन आहे. प्रत्येकजण व्यस्त झाले. त्यांना वाटते हे एकच क्रताव्या आहे. "कुटुंबाची देखभाल करणे, ते माझे कर्तव्य आहे. जेव्हडे आरामदायक शक्य होईल. ते माझे कर्तव्य आहे." कोणी एक असा विचार करीत नाही की ह्या प्रकारची कर्तव्ये प्राणी सुद्धा करतात. त्यांना सुद्धा मुले आहेत, आणि ते पोषण करतात, फरक काय आहे? त्यामुळे इथे शब्द वापरला आहे मूढ . मूढ म्हणजे गाढव. एक जो अशा कर्तव्यात गुंतलेला आहे, भुञ्जनः प्रपिबन खादन् . प्रपिबन. प्रपिबन म्हणजे पिणे, आणि भुञ्जनः म्हणजे खाणे. खात असताना, पीत असताना, खादन्, चावताना, चर्व चस्य रज प्रेय​ (?). खाद्यपदार्थ चार प्रकारचे असतात. काहीवेळा आपण चर्वण​ करतो, काहीवेळा आपण चाटतो,(संस्कृत) काहीवेळा आपण गिळतो, आणि काहीवेळा आपण पितो. त्यामुळे खाद्यपदार्थ चार प्रकारचे असतात. त्यामुळे आम्ही गातो चतुः विधा श्रीभगवत्प्रसादात्. चतुः विधा म्हणजे चार प्रकार. त्यामुळे आम्ही देवांना ह्या चार प्रकारातून भरपूर खाद्यपदार्थ अर्पण करतो. काही चघळले जातात, काही चाटले जातात , काही गिळले जातात. त्या प्रकारे. म्हणून भुञ्जनः प्रपिबन खादन् बालकं स्नेहयन्त्रितः. वडील आणि आई मुलांची काळजि घेतात, त्यांना खाद्यपदार्थ कसे द्यायचे. आपण यशोदा मातेला श्रीकृष्णांना भरवताना पाहिले आहे. तीच गोष्ट. हा फरक आहे. आपण एका सामान्य बालकाला भरवत आहोत, जे मांजर आणि कुत्रे देखील करतात. पण यशोदा माता श्रीकृष्णांना भरवत आहे. एकच प्रक्रिया. प्रक्रियेत काही फरक नाही आहे, पण एक श्रीकृष्ण केन्द्र आहे आणि दुसरे तर्हेवाईक केंद्र आहे. तो फरक आहे. जेव्हा श्रीकृष्णांना केंद्रित केले जाते, तेव्हा ते आध्यात्मिक असते. आणि जेव्हा तर्हेवाईक प्रकारे केंद्रित केले जाते, तेव्हा ते भौतिक असते. भौतिक मध्ये काही फरक नसतो.... हा फरक आहे. तिथे आहे... ज्याप्रमाणे वासनामय इच्छा आणि प्रेम, शुद्ध प्रेम. वासनामय इच्छा आणि शुद्ध प्रेम यात काय अंतर आहे? इथे आम्ही एकत्र करतो, पुरूष आणि स्री, वासनामय इच्छानी एकत्र आणतोय, आणि श्रीकृष्ण सुद्धा गोपींबरोबर एकत्र येत होते. वरवर ते सारखेच दिसते. तरीसुध्दा फरक काय आहे? त्यामुळे हा फरक चैतन्य चरितामृताच्या लेखकाने स्पष्ट केला आहे, की वासनामय इच्छा आणि प्रेम ह्यात काय फरक आहे? ते स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले आहे, आत्मेन्द्रिय​-प्रिति-वान्छा-तारे बलि " काम " ( चै.च​. ४.१६५ ), "जेव्हा मला माझ्या इँद्रीयांना संतुष्ट करायचे असेल, ते काम आहे." पण कृष्णेंद्रीय प्रीति-इच्छा धरे "प्रेम​" नाम​ , "आणि जेव्हा आपल्याला श्रीकृष्णांच्या इँद्रीयांना संतुष्ट करायचे असते, तर ते प्रेम आहे, प्रेम." तो फरक आहे. इथे या भौतिक जगतात प्रेम नाही आहे. कारण पुरूष आणि स्री, त्यांना ही कल्पना नाही की "मी पुरुषा बरोबर मिसळत आहे, जो पुरूष माझ्या इँद्रीयांना संतुष्ट करेल." नाही, "मी माझी इच्छा पुर्त करीन." हे मूलभूत तत्त्व आहे. पुरूष असा विचार करतो की "ह्या स्री बरोबर मिसळेन, मी माझ्या इँद्रीयांना संतुष्ट करीन," आणि स्री असा विचार करते की "ह्या पुरुषा बरोबर मिसळेन, मी माझ्या इँद्रीयांना संतुष्ट करीन." त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये फार प्रामुख्याने दिसून येते, वैयत्तिक इँद्रीये संतुष्ट करण्यात अडचण आली की लगेच, ताबडतोब घटस्पोट. हे मानसिक आहे, का या देशात इतके घटस्पोट आहेत. मूळ कारण हे आहे की "मला समाधान नाही मिळाले की लगेच , मला नको आहे." ते श्रीमद् भागवतम् मध्ये नमूद केले आहे: दांपत्यं रतिमेवहि. ह्या काळात, नवरा आणि बायको म्हणजे लैंगिक समाधान, वैयक्तिक. तिथे प्रश्नच उद्भवत नाही की "आपण एकत्र राहू; आपण श्रीकृष्णांना संतुष्ट कसे करायचे ह्याचे प्रशिक्षण घेऊन श्रीकृष्णांना संतुष्ट करूया." हे कृष्णभावनाभावित आंदोलन आहे.