MR/Prabhupada 0166 - तुम्ही बर्फ पडणं थांबवू शकत नाही



Lecture on BG 2.7-11 -- New York, March 2, 1966


आपण सतत दुःख भोगत आहोत हे विसरू नये. तीन प्रकारचे भोग आहेत. मी आर्थिक समस्येबद्दल बोलत नाही किंवा... ते सुद्धा वेगळ्या प्रकारचे दुःख आहे. पण वैदिक ज्ञानानुसार - किंवा ते सत्य आहे. तीन प्रकारचे भोग आहेत. एक प्रकारचा भोग जो मन आणि शरीराशी संबंधित आहे... आता, समजा माझं डोकं दुखत आहे. आता मला गरम वाटत आहे,मला थंडी लागत आहे, आणि इतके शारीरिक त्रास आहेत. त्याचप्रमाणे, आपल्याला अनेक मानसिक ताप आहेत. माझे मन आज अस्वस्थ आहे. मी केले आहे... कोणीतरी मला काहीतरी बोलले आहे. म्हणून मी दुःखी आहे. किंवा मी काहीतरी किंवा कोणी मित्र गमावला आहे,अनेक गोष्टी. तर शरीर आणि मनाचे भोग, आणि नैसर्गिक भोग,निसर्ग. त्याला आधिदैविक म्हणतात,ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही.

कुठल्याही भोगावर आपलं काही नियंत्रण नाही खासकरून... समजा इथे खूप बर्फ पडला. संपूर्ण न्यूयॉर्क शहर बर्फाने भरले आहे. आणि आपली गैरसोय होत आहे. तो एक प्रकारचा भोग आहेत. पण तुमच काही नियंत्रण नाही. तुम्ही बर्फ पडणं थांबवू शकत नाही. तुम्ही पहा? जर काही,काही,इथे वारा आहे, थंड वारा, तुम्ही तो थांबवू शकत नाही. याला अधिदैविक भोग म्हणतात. आणि मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास त्यांना अध्यात्मिक म्हणतात. आणि आणखी इतर भोग आहेत,अधिभौतिक,इतर प्राण्यांकडून हल्ला माझा शत्रू, काही प्राणी किंवा काही किडे, अनेक. तर हे तीन प्रकारचे भोग सतत असतात. नेहमी. आणि... पण आपल्याला हे भोग नको असतात. जेव्हा हा प्रश्न येतो... आता इथे अर्जुनाला जाणीव आहे. "इथे युद्ध सुरु आहे,आणि शत्रू बरोबर युद्ध करणे हे माझं कर्तव्य आहे, पण दुःख आहे कारण ते माझे नातलग आहेत." तर त्याला असं वाटत होत. तर जोपर्यंत या सत्याची मनुष्यप्राण्याला जाणीव होत नाही आणि तो जागृत होत नाही की आपण सतत भोगत आहोत पण आपल्याला हे भोग नको आहेत... . हा प्रश्न... अशा व्यक्तीने अध्यात्मिक गुरुकडे जाणे गरजेचे आहे,जेव्हा त्याला जाणीव होते. तुम्ही बघा? तोपर्यंत तो जनावरांप्रमाणे आहे, हे त्याला माहित नाही की तो सतत दुःख भोगत आहे... त्याला माहित नाही,त्याला काळजी नाही, किंवा तो त्यावर उपाय करू इच्छित नाही.

इथे अर्जुन त्रास सहन करत आहे, आणि त्याला त्यावर उपाय हवाय, आणि म्हणून त्याने अध्यात्मिक गुरूंचा स्वीकार केला. तर जेव्हा आपल्याला आपल्या दुःखाची जाणीव होते,तेव्हा आपण त्या दुःखद परिस्थितीत जागृत होतो... इथे भोग आहेत. दुःखा विषयी विसराळूपणा किंवा अज्ञान त्याला काही अर्थ नाही. भोग आहेतच. पण जेव्हा एखादा त्याच्या दुःखावर उपाय करण्याच्याबाबतीत गंभीर होतो,तेव्हा अध्यात्मिक गुरूंची गरज आहे. ज्याप्रमाणे आता अर्जुनाला अध्यात्मिक गुरुंची गरज आहे. हे स्पष्ट आहे का? हो, तर ते भोग आहेतच. कुठल्याही शिक्षणाची आवश्यकता नाही. फक्त विचार की,थोडा विचार. की "मला ही सगळी दुःख नको आहेत, पण मी दुःख भोगत आहे. का? याला काही उपाय आहे का? इथे आहे...?" पण त्याला उपाय आहे. हे सगळे साहित्य, सगळे वैदिक ज्ञान, सगळंकाही... आणि केवळ वैदिक ज्ञान नाही... आता... तुम्ही शाळेत का जात आहात? तुम्ही महाविद्यालयात का जात आहात? तुम्ही वैज्ञानिक शिक्षण का घेत आहात? तुम्ही कायद्याचे शिक्षण का घेत आहात? सर्वकाही आमच्या दुःखाचा अंत करण्यासाठी आहे. जर दुःख नसते,तर कोणीही शिक्षण घेतले नसते. तुम्ही बघा? पण विचार करतो की "जर मी शिकलेले असेन, जर मी डॉक्टर झालो,किंवा मी वकील झालो,किंवा मी अभियंता झालो,मी सुखी बनेन. आनंदी. ते अंतिम उद्दिष्ट आहे. "मला चांगली नोकरी मिळेल, सरकारी नोकरी. मी आनंदी होईन." तर आनंद म्हणजे प्रत्येकी गोष्टीचा शेवट आहे, मला म्हणायचंय,अनुपालन. तर... पण हे दुःख कमी करण्याचे उपाय, ते तात्पुरते आहेत.


वास्तविक दुःख,वास्तविक दुःख आपल्यामुळे झाले आहे, हे भौतिक अस्तित्व, हे तीन प्रकारच्या भोग. तर जेव्हा एखाद्याला त्याच्या दुःखाविषयी जाणीव असते आणि त्याला त्याच्या दुःखावर उपाय हवा असतो,मग तिथे आध्यत्मिक गुरूंची गरज आहे. आता, जर तुम्हाला तुमच्या दुःखावर उपाय करायचा असेल, आणि आपण एखाद्या व्यक्तीशी सल्लामसलत करायची असेल. आता कुठल्याप्रकरच्या व्यक्तीला तुम्ही भेटाल जो तुमच्या सगळ्या दुःखांचा अंत करु शकेल? त्याची निवड करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला रत्नजडित खडा, हिरा, आणि खूप किमती गोष्ट खरेदी करायची असेल, आणि जर तुम्ही वाण्याच्या दुकानात गेलात... अशा प्रकारचे अज्ञान - तुम्ही फसवले जाऊ शकाल तुम्ही फसवले जाल. कमीत कमी तुम्ही दागिन्यांच्या दुकानात गेले पाहिजे. दागिन्यांचे दुकान, तुम्ही बघा? इतकं ज्ञान असणे आवश्यक आहे.