MR/Prabhupada 0167 - देव निर्मित कायद्यांमध्ये दोष असू शकत नाही



Lecture on SB 6.1.8-13 -- New York, July 24, 1971


मानवनिर्मित कायदा, ते मानवाला गृहीत धरून ठार मारत आहेत. दुसरी गोष्ट, खुन्याची हत्या केली पाहिजे. पशु का नाही? पशुही जीव आहेत. माणूस सुद्धा सजीवप्राणी आहे. तुमचा कायदा आहे की जर एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारलं तर त्याची हत्या केली पाहिजे. जर एखाद्या माणसाने प्राण्याला मारलं तर त्याची सुद्धा हत्या केली पाहिजे. काय कारण आहे? मानवनिर्मित कायदा, सदोष. परंतु देव-निर्मित कायद्यामध्ये दोष असू शकत नाही.

देव-निर्मित कायदा, जर तुम्ही पशु हत्या केल्यास, तुम्ही मानव हत्या करण्या एवढेच शिक्षेला पात्र आहात तो देवाचा नियम आहे. त्यात क्षमा नाही की. जेव्हा तुम्ही मनुष्य हत्या करता तेव्हा तुम्ही शिक्षेस पात्र ठरता, पण जेव्हा तुम्ही पशु हत्या करता तुम्ही शिक्षेस पात्र ठरत नाही. हा दुटप्पीपणा आहे. हा खरा कायदा नाही खरा कायदा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त दहा आज्ञा देतात."तू हत्या करू नको." तो परिपूर्ण कायदा आहे. तुम्ही भेदभाव करू शकत नाही की "मी मनुष्य हत्या करणार नाही, पण पशु हत्या करीन." इथे निरनिराळी प्रायश्चित्त आहेत. वैदिक कायद्यानुसार, जर एखादी गाय तिच्या गळ्याला दोर बांधलेला असताना तिचा मृत्यू झाला. .. कारण गाय सुरक्षित नव्हती, या नाहीतर त्या कारणाने तिचा मृत्यू झाला, आणि गळ्याभोवती दोर होता. गायीच्या मालकाला प्रायश्चित्त घेतले पाहिजे. कारण असं मानलं जात की गायीच्या गळ्याभोवती दोर असल्यामुळे तिचा मृत्यू झाला तिथे प्रायश्चित्त आहे.

आता तुम्ही स्वेच्छेने गाय .आणि अनेक पशु मारता, तर आपण त्याला किती जबाबदार आहोत. म्हणून सद्यस्थितीत युद्ध होत आहेत. आणि मानवी समाज कत्तल होण्याला नाहक बळी पडत आहे. तुम्ही युद्ध थांबवू शकत नाही आणि पशु मारण चालू ठेवून, ते शक्य नाही. हत्यामुळे अनेक अपघात होतील. बऱ्याच संख्येने मारतात जेव्हा श्रीकृष्ण मारतात,ते बऱ्याच संख्येने मारतात. जेव्हा मी मारतो - एकामागून एका मारतो. पण जेव्हा श्रीकृष्ण मारतात,ते सगळ्यांना एका ठिकाणी जमा करतात आणि मारतात. म्हणून शास्त्रात प्रायश्चित्त आहे. ज्याप्रमाणे तुमच्या बायबलमध्ये सुद्धा प्रायश्चित्त सांगितलं आहे. कबुलीजबाब काही दंड भरणे. पण प्रायश्चित्त घेतल्यावर लोक का तेच पाप परत करतात? ते समजलं पाहिजे.