MR/Prabhupada 0188 - जीवनातील सर्व समस्यांवर अंतिम उपाय



Lecture on SB 2.3.17 -- Los Angeles, July 12, 1969


विष्णूजन : प्रभुपाद, आपण वर्णन केले आहे की ईश्वर कारण आहे, मूळ कारण आहे, आणि कोणीही प्रभूला ओळखत नाही म्हणून, लोक कसे समजू शकतात कि ते कोणामुळे नियंत्रित होत आहेत ? ते कसे जणू शकतात कि ते कसे नियंत्रित होत आहेत कारण कोणीच कृष्णाला ओळखत नाही आणि तोच मूळ कारण आहे ? ते कसे समजू शकतात कि कृष्णामुळेच सर्व गोष्टी घडत आहेत ?

प्रभुपाद: तुम्ही कसे सांगू शकता की तुम्ही राज्याद्वारे नियंत्रीत आहात? आपल्याला कसे कळेल?

विष्णूजन : राज्यराज्याचे एक कायद्याचे पुस्तक असते .

प्रभुपाद: म्हणून आपल्याकडे कायदे पुस्तिका आहेत. अनादि बहिर्मुख जीव कृष्ण भुलि गेला, अतैव कृष्ण वेद-पुराणे करिला कारण आपण कृष्णाला विसरला आहात, म्हणून कृष्णाने तुम्हाला इतकी पुस्तके दिली आहेत, वेदिक साहित्य. त्यामुळे मी जोर देत होतो , निरर्थक साहित्य वाचण्यात आपला वेळ वाया घालवू नका. केवळ वेदिक साहित्यामध्ये आपले लक्ष केंद्रित करा. मग तुम्हाला कळेल. ही पुस्तके का आहेत? फक्त आपल्याला कायदेशीर होण्याची आठवण करून देण्यासाठी . परंतु आपण त्याचा लाभ घेत नसल्यास, आपण आपल्या आयुष्याचा दुरुपयोग करीत आहात.

हे प्रचार कार्य, पुस्तकांचे प्रकाशन , साहित्य, मासिके, कृष्ण भावनामृत चळवळ , या सगळ्या गोष्टी आठवण करून देण्यासाठी आहेत आपण कसे नियंत्रित केले जात आहोत , सर्वोच्च नियंत्रक कोण आहे, आपले जीवन कसे यशस्वी होऊ शकते, आपण या बंध जीवनातून कसे मुक्त होऊ शकतो, कसे आपण स्वतंत्र जीवन प्राप्त करू शकता. ही चळवळ आहे. हे कृष्ण भावनामृत आंदोलन त्या प्रयोजनासाठी आहे; अन्यथा, या चळवळीची काय उपयोग आहे? हा तात्पुरती शांतता निर्माण करण्यासाठी निर्माण झालेला पंथ नाही . हा जीवनातील सर्व समस्यांचे अंतिम उपाय आहे, कृष्ण भावनामृत चळवळ. आणि हा जप हा हृदयातील पाथ आहे, जिथे आपण हा संदेश प्राप्त कराल.

चेतो दर्पण-मार्जनम् (चै च अन्त्य २०।१२),

हृदयाची स्वछता . मग आपण हा संदेश प्राप्त करण्यास सक्षम व्हाल. तर आपली प्रक्रिया अतिशय शास्त्रीय, अधिकृत आहे आणि जर कोणी त्याचे आचरण करेल तर त्याला हळूहळू जाणवेल, आणि तो उन्नत होईल. यात काही शंका नाही.