MR/Prabhupada 0189 - भक्तांना तीन गुणांच्या पलिकडे ठेवा



Lecture on SB 6.1.46 -- San Diego, July 27, 1975


तुम्ही निसर्गाचा नियम बदलू शकत नाही. अस्तित्वाचा संघर्ष: आम्ही निसर्गाचे नियम जिंकण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते शक्य नाही.

दैवी हि एशा गुनमयी मम माया दुरत्यया (भ गी ७।१४)

तर हे अभ्यासाचे विषय आहेत. प्रत्येकजण दुःखी आणि काही प्रमाणात आनंदी का आहेत? या गुणांनुसार. म्हणून इथे असे म्हटले आहे की, "कारण इथे आपण जीवनात, जीवनाच्या काळात विविधाता आहे, त्याचप्रमाणे, गुण-वैचित्रयात, गुणांच्या प्रकारानुसार गुण-वैचित्रयात, " तथान्यत्रानुमीयते । अन्यत्र म्हणजे पुढील जीवन किंवा पुढील ग्रह किंवा पुढील काहीही. सर्व काही नियंत्रित आहे. त्रैगुण्य-विशया वेदा निसत्रैगुण्यो भवार्जुन . कृष्ण अर्जुनाला सल्ला देत आहे कि "संपूर्ण भौतिक जग हे तीन गुणांद्वारे नियंत्रित केले जात आहे" , गुण-वैचित्रयात . "म्हणून तुम्ही निसत्रैगुण्य बना , जिथे हे तीन गुण काम करू शकत नाहीत." निसत्रैगुण्य भवार्जुना. तर आपण या तीन गुणांच्या कृत्यास कसे थांबवू शकता? ते देखील भगवद्गीतेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे:

माम् च अव्यभिचारिनि भक्ति योगेन य: सेवते
स गुणान समतीत्यैतान ब्रह्म-भूयाय कल्पते (भ गी १४।२६)

जर तुम्ही स्वतःला शुद्ध भक्ती सेवेमध्ये अविरतपणे गुंतवून ठेवले, तर तुम्ही नेहमीच दिव्य स्वभावात राहता या तीन गुणांच्या पलीकडे. तर आपली कृष्ण भावनामृत चळवळ भक्तगणांना तीन गुणांच्या पलीकडे ठेवण्यासाठी आहे . महासागराप्रमाणेच, जर तुम्ही महासागरात पडलात तर ते फार धोकादायक आहे. परंतु जर कोणी तुम्हाला समुद्रातील पाण्यातुन वर उचलून , एक इंच वर राहायला मदत करत असेल , तर काही धोका नाही. आपले जीवन सुरक्षित आहे तर ते हवे आहे , गुण-वैचित्रयात, जर तुम्हाला जीवनाच्या या विविधतेतून वाचायचे असेल तर तर ते हवे आहे , जन्म, मृत्यू , वृद्धत्वापासून आणि आजारपण ,आणि जीवनाच्या कित्येक विविधता स्वीकारच्या असतील..

जसे की आपण चालत असतांना तुम्ही सांगत होता, कॅलिफोर्नियामध्ये झाडं आहेत; ती पाच हजार वर्षांपासून जिवंत आहेत. ते देखील जीवनाच्या विविधतेतला एक प्रकार आहे. लोक अनेक वर्षे जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. निसर्गाच्या पद्धतीने, इथे एक झाड आहे, पाच हजार वर्षे. तर असे जगणे काही फायद्याचे आहे का , पाच हजार वर्षे जंगलात उभे रहाणे फायदेकारक आहे का? तर या भौतिक जगातलय अनेक विविधता चांगलय नाही आहेत, मग तुम्ही देवता असाल किंवा वृक्ष किंवा अजून काही. ते शिक्षण आहे . ते शिक्षण आहे . म्हणून एखाद्याने समजले पाहिजे कि जीवनशैलीची कुठलीही प्रजाती देवता किंवा कुत्रा, येथे जीवन त्रासदायकच आहे. देवता सुद्धा ते कित्येक वेळा धोक्यात आले ,अनेक वेळा.आणि मग ते देवाजवळ जातात. तर इथे तुम्ही नेहमी धोक्यात असाल.

पदम पदम यद विपदाम (श्री भ १०।१४।५८)

हे भौतिक जग धोकाहीन करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कारण तिथे विविध प्रकारचे जीव आहेत , विविध धोके , आपत्ती, तर एकामागून एक , तुम्हाला ... तर सर्वोत्तम गोष्ट आहे , हा व्यवसाय थांबवणे,भौतिक . हि वेदिक संस्कृती आहे . संपूर्ण वेदिक संस्कृती याच विचारांवर आधारित आहे, की "हे मूर्खपणाचे व्यवसाय थांबवा, जन्म, मृत्यू, वृद्धतव यांची पुनरावृत्ती." म्हणून कृष्ण म्हणाला,

जन्म-मृत्यु-जरा-व्याधि दुःख -दोषनुदर्शनाम (भ .गी . १३.९)

हे ज्ञान आहे. काय ज्ञान, हे तांत्रिक ज्ञान, हे ज्ञान? आपण या गोष्टी थांबवू शकत नाही. म्हणून मुख्य व्यवसाय म्हणजे हे कसे थांबवावे. आणि कारण ते मूर्ख लोक असल्याने,त्यांना असे वाटते की "या गोष्टी थांबवता येणार नाहीत. आपण या जन्म आणि मृत्यूच्या चक्रात फिरत राहू , आणि प्रत्येक जीवनात अस्तित्वात येण्यासाठी संघर्ष करत राहू " ही भौतिक सभ्यता, अज्ञान, आहे , ज्ञान नाही. भगवान श्रीकृष्णाने ज्ञान दिले आहे की, "हा उपाय आहे:

जन्म कर्म च मे दिव्यम् यो जानाति तत्वत:
त्यक्तवा देहम् पुनर जन्म नैति (भ गी ४।९)

" समस्या आहे कि पुनर्जन्म, जन्माची पुनरावृत्ती, आणि जर तुम्हाला ते थांबवायचे असेल,तर कृष्णाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही थांबवण्यात सक्षम व्हाल. तुम्ही कृष्णाला समजून घेतल्याबरोबर ... कृष्णाला समजने म्हणजे , जरी आपण अंधपणे स्वीकार केला,ते देखील फायदेशीर आहे. कृष्ण म्हणतो तो काय आहे , तो सर्वोच्च देव आहे.तर तुम्ही त्याला स्वीकारा .बस . फक्त हि श्रद्धा ठेवा की, "कृष्ण ईश्वराचे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व , परमेश्वर आहे ". ते तुम्हाला पुरेसे उन्नत करेल . परंतु भौतिकवादी व्यक्तींसाठी हे फार कठीण आहे. म्हणून कृष्ण म्हणतो ,

बहुनाम जन्मनाम अन्ते (भ गी ७।१९)

"बर्याच जन्माच्या प्रयत्नांनंतर,"बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते, ज्ञानवान, जो ज्ञानी आहे , तो कृष्णाकडे आत्मसमर्पण करतो ." अन्यथा,

न माम दुश्क्रितिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: (भ गी ७।१५)

"अन्यथा तो मूर्ख बनून राहतो आणि पापी कर्मांमध्ये फासून राहतो , मानवजातित सर्वात निम्न ,ज्ञानविहीन ." न माम प्रपद्यन्ते: "तो कधीच कृष्णाला शरण जात नाही."