MR/Prabhupada 0205 - मी अपेक्षा केली नाही "हे लोक स्वीकार करणार"



Morning Walk -- May 20, 1975, Melbourne

प्रभुपाद: ते असे नाही आहे की तुम्हाला बघितले पाहिजे की तो कृष्णभावनाभावित झाला आहे. कृष्णभावनाभावित होणे इतके सोपे नाही आहे. ते एव्हडे सोपे नाही आहे. ते घेईल, बहूनां जन्मनामन्ते (भ.गी.७.१९), खूप,खूप जन्मा नंतर . पण तुम्हाला तुमचे कर्तव्य केले पाहिजे. जा आणि प्रचार करा. यारे देख, तारे कह कृष्ण-उपदेश​ (चै. च. ७.१२८). तुमचे कर्तव्य संपले. अर्थात, तुम्ही त्याला बदलण्याचा प्रयत्न करा. जर तो बदलला नाही, तुमच्या कर्तव्यात विचलित होण्याचे कारण नाही. आपण फक्त जा आणि तोंडी संवाद साधा. ज्याप्रकारे मी तुमच्या देशात आलो, मला यश येईल असे कधी वाटले नव्हते. कारण मला माहीत होते, "जेव्हा मी सांगेन, 'अवैध लैंगिक संबध नाही, मांसाहार नाही', ते मला ताबडतोब नाकारतील." (हशा) त्यामुळे मी मुळीच आशावादी नव्हतो.

भक्त (१): ते सुद्धा आता संलग्न झाले आहेत.

प्रभुपाद: होय. तो तुमचा दयाळुपणा आहे जे तुम्ही मला स्वीकारले. पण मला अजिबात अपेक्षा नव्हती. मला कधीच अपेक्षा नव्हती की "ही माणसे मला स्वीकारतील." मला कधीच अपेक्षा नव्हती.

हॅरी-शौरी: म्हणजे आम्ही फक्त श्रीकृष्णांवर अवलंबुन राहिलो...

प्रभुपाद: होय, तेच फक्त आमचे काम आहे.

हॅरी-शौरी: आणि आम्ही परिणाम बघितला, तर...

प्रभुपाद: आणि आध्यात्मिक गुरूंनी निर्धारित केल्याप्रमाणे आपले कर्तव्य करावे. गुरू-कृष्ण-कृपाय (चै. च. १९.१५१). नंतर दोन्ही बाजूंनी, तुम्ही अनुकूल राहाल, आध्यात्मिक गुरुंकडून आणि श्रीकृष्णांकडून. आणि ती सफलता असेल.