MR/Prabhupada 0220 - प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे



Arrival Lecture -- Paris, July 20, 1972


ज्ञानी मनुष्य जो वास्तवात अध्यात्मिक मार्गावर आहे , तो जाणतो की " कोण ज्ञानी ब्राह्मण आहे आणि कोण कुत्रा आहे ". त्यांच्या कर्मांमुळे त्यांना वेगळे कपडे मिळाले आहेत , पण ब्राह्मणाच्या आत आणि कुत्र्याच्या आत तोच आत्मिक जीव आहे " तर आपल्या भौतिक स्तरावर आपण भेद करतो , " मी भारतीय आहे , तू फ्रेंच माणूस आहेस , तो इंग्रज आहे , तो अमेरिकन आहे , तो मांजर आहे , तो कुत्रा आहे " ही भौतिक जगाची दृष्टी आहे . अध्यात्मिक जगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक जीव घटक हा भगवंताचा अंश आहे , जसे भगवद गीतेमध्ये शिक्कामोर्तब केले आहे : माम एवेश जीव भूत : प्रत्येक जीव . तो काय आहे याने फरक पडत नाही . तिथे 84,00,000 योनी आहेत , पण ते सर्व , ते फक्त वेगवेगळ्या वस्त्रांनी झाकले आहेत . जसे तुमचा फ्रेंच माणूस , जरी तुम्ही वेगळी वेशभूषा करता , आणि इंग्रज मनुष्य वेगळी वेशभूषा करतो , आणि भारतीय वेगळी वेशभूषा करतो . पण वस्त्र महत्वाचे नाहीत . कपड्यातला मनुष्य तो महत्वाचा आहे . तसेच हे शरीर खूप महत्वाचे नाही .

अंतवंत इमे देहा नित्य सोक्ता शरिरिणा (भ गी 2.18)

हे शरीर नाशवंत आहे . पण शरीरातला आत्मा तो नाशवंत नाही . म्हणून हे मनुष्य जीवन हे शाश्वत ज्ञान संवर्धन करण्यासाठी आहे . दुर्दैवाने , आपले विज्ञान , शाळेतले , कॉलेज, विद्यापीठातले तत्वज्ञान , ते फक्त नाशवंत गोष्टींचा विचार करत आहेत , शाश्वत गोष्टीचा नाही . ही कृष्ण भावनामृत चळवळ शाश्वत ज्ञानच विचार करण्यासाठी आहे . तर ही आत्म्याची चळवळ आहे , राजकारणातली चळवळ नाही , धार्मिक किंवा सामजिक चळवळ नाही . ते नाशवंत शरीरासाठी आहेत . पण कृष्ण भावनामृत चळवळ शाश्वत जीवसाठी आहे . म्हणून आपले हे संकीर्तन आंदोलन , केवळ हरे कृष्ण मंत्र जपून , तुमचे हृदय हळूहळू स्वछ होईल , म्हणजे तुम्ही या आध्यत्मिक मार्गावर याल . जसे आपल्या या चळवळीत आपल्याकडे जगातील सर्व देशांचे विद्यार्थी आहेत , सर्व धर्माचे विद्यार्थी आहेत . पण ते विशिष्ट धर्म , देश , जात किंवा रंगाचा विचार नाही करत . नाही . ते सर्व आपण कृष्णाचा अंश आहोत असा विचार करतात .

जेव्हा आपण त्या स्तरावर पोहोचतो आणि स्वतःला त्या स्थितीच्या व्यवसायात गुंतवतो , तेव्हा आपण मुक्त होतो . म्हणून ही चळवळ खूप महत्वाची चळवळ आहे . साहजिकच काही मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व माहिती देणे शक्य नाही , पण जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता , पत्रव्यवहाराद्वारे , किंवा आमचे साहित्य वाचून , किंवा व्यक्तिगत रित्या . कोणत्याही प्रकारे , तुमचे जीवन उजळून निघेल . आम्ही असा भेद नाही कारत की ," हा भारत आहे ," " हा इंग्लंड आहे " , " हा फ्रांस आहे " , " हा आफ्रिका आहे ". आम्ही विचार करतो की प्रत्येक जीव , केवळ मनुष्य नाही , पशु सुद्धा , पक्षी , कीटक , वनस्पती , जलचर , जंतू , सरपटणारे प्राणी - सर्व भगवंताचे अंश आहेत .