MR/Prabhupada 0221 - मायावादी लोकांना वाटते ते परमेश्वरासोबत एकरूप झाले आहेत



Janmastami Lord Sri Krsna's Appearance Day -- Bhagavad-gita 7.5 Lecture -- Vrndavana, August 11, 1974


कृष्ण , जेव्हा अर्जुनाने त्याला विचारले होते की - "तुम्ही असे म्हणता की भगवद्गीतेचे हे तत्वज्ञानान आपण आधी सूर्याला शिकवले. मी त्यावर विश्वास कसा ठेवू शकतो?" उत्तर असे होते "गोष्ट अशी की आपण दोघे उपस्थित होते, पण तु विसरला आहेस. मी विसरलेलो नाही." हा कृष्ण आणि सामान्य जीवातला फरक आहे ... तो पूर्ण आहे; आम्ही पूर्ण नाही. आपण कृष्णाचा अपूर्ण, सूक्ष्म भाग आहोत . म्हणून आपण कृष्णाद्वारे नियंत्रित असले पाहिजे.

जर आपण कृष्णाद्वारे नियंत्रीत होण्यास सहमत नसलो तर आपण भौतिक जगाच्या उर्जेने नियंत्रण केले जाऊ ,हे

भूमिर आपो नलो वायू: (भगी ७।४)

वास्तविक, आपण अध्यात्मिक ऊर्जा आहोत आपण स्वेच्छेने कृष्णाद्वारे नियंत्रित होण्यास सहमत झाले पाहिजे . ती भक्ती सेवा आहे. ती भक्ती सेवा आहे.. आपण दिव्य ऊर्जा आहोत आणि कृष्ण हा परमात्मा आहे. तर आपण जर कृष्णाद्वारे नियंत्रित होण्य्याचे मान्य केले तर आपल्याला अध्यात्मिक जगात अग्रेसर होऊ . जर आपण सहमत झालो . कृष्ण तुमच्या लहानशा स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करत नाही.

यथेछासी तथा कुरु (भगी १८।६३)

कृष्ण अर्जुनाला म्हणतो, "तुला जे आवडेल ते कर." ते स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे . म्हणून त्या स्वातंत्र्यापासून आम्ही या भौतिक जगात आलो आहोत, मुक्तपणे आनंद भोगण्यासाठी . कृष्णाने आपल्याला ते स्वातंत्र्य दिले आहे , "तुम्ही मुक्तपणे आनंद घेऊ शकता." आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण याचा परिणाम असा होतो की आपण गुंतत जात आहोत. आपल्याला या भौतिक जगात काम करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येकजण भौतिक विश्वाचा स्वामी होण्याचा प्रयत्न करत आहे. कोणीही सेवक बनण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त आपण वैष्णव , सेवक बनण्याचा प्रयत्न करत आहोत . कर्मी आणि ज्ञानी त्यांना सेवक बनणे आवडत नाही . ते आपल्यावर टीका करतात कि , " तुम्ही वैष्णव , तुमची गुलामी प्रवृत्ती आहे." होय, आमची दास प्रवृत्ती आहे ... चैतन्य महाप्रभूंनी

गोपी-भर्तु-पद-कमलयोर, दास-दासानुदास (चैच मध्य १३।८०)

ते आमचे पद आहे . आहे कृत्रिमपणे "मी मालक आहे" असा दावा करण्याचा काय उपयोग आहे? जर मी स्वामी असतो तर मग पंख्याची गरज काय आहे ? मी उन्हाळी हंगामाच्या या प्रभावाचा सेवक आहे . त्याचप्रमाणे, मी हिवाळ्याच्या काळात गुलाम आहे , खूप थंडी आहे म्हणून . तर आपण नेहमीच दास आहोत. म्हणूनच चैतन्य महाप्रभु म्हणतात,

जीवेर स्वरूप हय नित्य-कृष्ण-दास (चैच मध्य २०।१०८-१०९)

वास्तविक, आपले घटनात्मक पद म्हणजे कृष्णाचे शाश्वत सेवक असणे . कृष्ण हा सर्वोच्च नियंत्रक आहे. हि कृष्ण भावनामृत चळवळ या उद्देशासाठी आहे, की हे मूर्ख व्यक्ती किंवा धूर्त , मूढा ... मी "मूर्ख" आणि "धूर्त " हे शब्द तयार करीत नाही. हे कृषणाद्वारे म्हटले गेले आहे .

न माम दुष्कृतीनो-मूढा प्रपद्यन्ते नराधमा: (भगी ७।१५)

तो असे बोलला आहे. तुम्हाला सापडेल. दुष्कृतीन: , नेहमी पापयुक्त कर्मात मग्न असणे आणि मूढ ,धूर्त , गाढव . नराधम, मुनुष्यांमधला सर्वात निकृष्ट . "अरे, तू ...? कृष्ण , तु या भौतिकवादी शास्त्रज्ञांबद्दल इतके वाईट बोलत आहेस ? इतके सारे तत्वज्ञ आहेत, ते सर्व नराधम आहेत? "होय, ते नराधम आहेत." "पण ते सुशिक्षित आहेत." "होय, ते देखील आहे ..." पण कुठल्या प्रकारचे शिक्षण?. मायया अपह्रत-ज्ञान: "त्यांच्या शिक्षणाचा परिणाम - मायेद्वारे ज्ञान आच्छादले आहे " जितके अधिक शिकलेले आहेत तितकेच अधिक नास्तिक आहेत सध्याच्या क्षणी ... अर्थात, शिक्षणाचा अर्थ असा नाही ... शिक्षणाचा अर्थ आहे समजून घेणे. ज्ञानी . शिक्षित, सुशिक्षित म्हणजे शहाणा मनुष्य, सुशिक्षित मनुष्य, ज्ञानी . वास्तविक ज्ञानी म्हणजे माम प्रपद्यते .

बहूनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रद्यन्ते (भगी ७।१९)

शिक्षण म्हणजे नास्तिक बनवणे नव्हे . "देव असं नाही. मी देव आहे, तुम्ही देव आहात, प्रत्येकजण देव आहे." हे शिक्षण नाही. हे अज्ञान आहे . मायावादि त्यांना असे वाटते की ते देवासोबत एकरूप झाले आहेत. ते शिक्षण नाही