MR/Prabhupada 0239 - कृष्णाला समजण्यासाठी विशेष इंद्रियांची आवश्यकता आहे



Lecture on BG 2.3 -- London, August 4, 1973

तर ही सहानुभूती अर्जुनाच्या सहानुभूती सारखी आहे. सहानुभूती, अता राज्य खुन्याला ठार मारत नाहीत. त्यांना सहानुभूती दाखवतात हा अर्जुन आहे. ते हृदयदौर्बल्यं आहे.ते कर्तव्य नाही. कोणताही विचार न करता. एखाद्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कठोरपणे कर्तव्याचे पालन केले पाहिजे. तर ह्या प्रकारची सहानुभूती, हृदयाचा कमकुवतपणा आहे. पण सामान्य मनुष्य समजू शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना जाणण्यासाठी दिव्य, इंद्रिय पाहिजेत. दिव्य इंद्रिय,भौतिक इंद्रिय नाहीत. दिव्य इंद्रिय म्हणजे तुम्ही तुमचे डोळे काढायचे आणि दुसरे बसवायचे? नाही. तुम्हाला शुद्ध करावे लागतील.

तत-परत्वेन निर्मलम (चैतन्य चरितामृत मध्य १९.१७०) |

ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या डोळ्यांना काही आजार झाला, तुम्ही औषध लावता. आणि जेव्हा ते बरे होतात, तुम्हाला सगळंकाही स्पष्ट दिसू शकत. त्याचप्रमाणे,अपूर्ण इंद्रियांनी, आपण श्रीकृष्ण म्हणजे काय हे समजू शकणार नाही.

सेवन्मुखे हि जिह्वादौ स्वयं एव स्फुरति अद: (भक्तिरसामृतसिन्धु १.२.२३४) |

जैसे श्रीकृष्ण के नामादौ, श्रीकृष्ण का नाम, रूप, गुण आदि, इन जड़ इंद्रियों से समझ में नहीं आती हैं, तो यह कैसे किया जा सकता है ? अब, सेवन्मुखे हि जिह्वादौ । फिर जिह्वादौ, जीभ से शुरुआत, जीभ को नियंत्रित करना । ज़रा देखो, यह कुछ अजीब है कि "तुम्हें कृष्ण को समझना होगा जीभ को नियंत्रित करके ?" यह अद्भुत बात है । कैसे है ये ?

जसे श्रीकृष्णांचे नामादौ, कृष्णांचे नाव,रूप,गुण .इत्यादी, या अपूर्ण इंद्रियांनी समजणार नाही,मग त कसे करावे? आता, सेवोन्मूखे हि जिव्हादौ. परत जिव्हादौ, जिभेपासून सुरवात,जिभेवर ताबा. आता पहा,हे काहीतरी विचित्र आहे की "जिभेवर ताबा ठेवून तुम्ही श्रीकृष्णांना जाणायचे?" हे काहीतरी काहीतरी आश्चर्यकारक ते कसे आहे? मला श्रीकृष्णांना जाणण्यासाठी माझ्या जिभेवर माझ्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे? पण हे,शास्राचे आदेश आहेत: सेवोन्मूखे हि जिव्हादौ. जिव्हा म्हणजे जीभ. तर श्रीकृष्णांना पहाण्यासाठी, पाहिलं काम तुमच्या जिभेवर ताबा मिळवणे आहे. म्हणून आम्ही सांगतो, मांस भक्षण करू नका, मद्यपान करू नका. कारण हे जिभेवर नियंत्रण आहे. जीभ ही सगळ्या इंद्रियात बलवान शत्रू आहे,विकृत इंद्रिय. आणि हे मूर्ख सांगतात, "नाही, तुम्ही काहीही जे तुम्हाला आवडेल ते खाऊ शकता.त्याचा धर्माशी काही संबंध नाही." पण वैदिक शास्त्र सांगत,"तुम्ही मूर्ख, सगळ्यात पहिले जिभेवर नियंत्रण ठेवा.मग तुम्हाला देव काय आहे समजेल." तर याला वैदिक आदेश म्हणतात - परिपूर्ण. जर तुम्ही जिभेवर नियंत्रण ठेवले,मग तुम्ही तुमचे पोटावर नियंत्रण ठेवलं, मग जननेंद्रीयावर नियंत्रन ठेवाल. रूप गोस्वामींनी सूचना दिल्यात,


वाचो वेगं मनसो क्रोध-वेगं
जिह्वावेगं उदरोपस्थ-वेगं,
एतान् वेगान यो विशहेत धीर:
सर्वाम अपिमां स पृथ्विम स शिष्यात्
(उपदेशामृत १) |

ही सूचना आहे, की जो कोणी जिभेवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे. मनावर ताबा, रागावर नियंत्रण,पोटावर नियंत्रण आणि जननेंद्रिय नियंत्रित करण्यासाठी. जर या सहा प्रकारचे नियंत्रण असेल,तो अध्यात्मिक गुरु बनण्याला लायक आहे. तो संपूर्ण जगाभरात शिष्य करू शकतो. आणि जर तुम्ही जिभेवर ताबा ठेऊ शकत नसाल, जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू (शकत नसाल), तुमच्या मनातील गोंधळावर ताबा,मग तुम्ही कसे अध्यात्मिक गुरु बनू शकता? ते शक्य नाही. पृथिविं स शिष्यात् जोकोणी करेल... त्याला गोस्वामी म्हणतात,गोस्वामी किंवा स्वामी,इंद्रियांचा स्वामी. या सहा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे स्वामी. तर सुरवात जिभेपासून आहे.

सेवन्मुखे हि जिह्वादौ स्वयम एव स्फुरति अद: (भक्तिरसामृतसिन्धु १.२.२३४) | सेवा ।

सेवा. जीभ भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतलेली असू शकते. कशी? हरे कृष्णाचा जप करा.सतत स्तुती करा. वाचांसि वैकुंठ गुणानुवर्णने वाचांसि,म्हणजे बोलणे. बोलणे जिभेचे कमी आहे, आणि चव घेणेही जिभेचे काम आहे. तर तुम्ही जीभ भगवंतांच्या सेवेत त्याची स्तुती करण्यात गुंतवा. जेव्हाकेव्हा...तुम्ही प्रतिज्ञा करता की "जेव्हा मी बोलेन,तेव्हा मी फक्त श्रीकृष्णांच्याबद्दल बोलेन आणखी काही नाही. ते जिभेवर नियंत्रण आहे. जर तुम्ही तुमच्या जिभेला इतर काही निरर्थक गोष्टी बोलू दिल्या नाहीत. ग्राम्य कथा... काही वेळा आपण एकत्र बसतो. आपण अनेक निरर्थक गोष्टी बोलतो. त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. "आता मी भगवंतांच्या सेवेमध्ये माझी जीभ गुंतवली आहे, म्हणून आम्ही काहीही निरर्थक इंद्रियांना सुख देणार बोलणार नाही." याला जिभेवर ताबा म्हणतात. "मी श्रीकृष्णांच्या प्रसादा व्यतिरिक्त काही खाणार नाही." हे जिभेवर नियंत्रण आहे. तर ही काही तंत्र आहेत,पण त्यांना खूप,खूप मूल्य आहे. श्रीकृष्ण तपस्येने खुश होतील आणि ते प्रकट करतील. तुम्ही समजू शकणार नाही. तुम्ही श्रीकृष्णांना पाहू शकणार नाही. तुम्ही श्रीकृष्णांना आदेश देऊ शकत नाही,"श्रीकृष्ण या,बासरी घेऊन नाच मी तुम्हाला पाहू शकतो. हा आदेश आहे. श्रीकृष्ण तुमच्या आदेशांचे अधीन नाहीत. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सूचना दिल्या आहे.

अाश्लिश्य वा पाद-रताम् पिनष्टु माम मर्म हताम करोतु वा अदर्शनम् (चैतन्य चरितामृत अन्त्य २०.४७) |