MR/Prabhupada 0240 - गोपींच्या भाक्तीच्या तुलनेत इतर कोणतीही पूजा श्रेष्ठ नाही



Lecture on BG 2.3 -- London, August 4, 1973


अदर्शनाम. प्रत्येकाला श्रीकृष्णांना बघायची इच्छा आहे. पण शुद्ध भक्त म्हणतो की "नाही,जर तुम्हाला मला बघायला आवडत नसेल, तर ठीक आहे. तुम्ही माझं हृदय मोडू शकता. मी सतत तुम्हाला बघण्यासाठी प्रार्थना करू शकतो. पण तुम्ही आला नाहीत,आणि माझं हृदय मोडलं, ते स्विकारीन, तरी सुद्धा मी तुमची पूजा करीन." ही शुद्ध भक्ती आहे. असं नाही की " मी श्रीकृष्णांना नाच करायला माझ्या समोर बोलवलं. ते आले नाही. तर मी हा मूर्खपणा सोडून देतो. कृष्णभावनामृत चळवळीला काही अर्थ नाही." तसे नाही हा राधाराणीचा दृष्टिकोन आहे. तर श्रीकृष्णांनी वृंदावन सोडले. सर्व गोपींनी त्यांचे दिवस श्रीकृष्णानंसाठी रडण्यात घालवले. पण श्रीकृष्णांची कधी निंदा केली नाही. जेव्हा कोण येत... श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्याबद्दल विचार करत कारण गोपी महान भक्त आहेत, सर्वश्रेष्ठ भक्त. गोपींच्या भक्तीची तुलना होणार नाही. म्हणून श्रीकृष्ण हे कायम त्यांचे ऋणी आहेत.

श्रीकृष्ण गोपीना सांगतात की "तुम्ही तुमच्या कामात समाधानी असलं पाहिजे. मी तुमच्या प्रेमाची परतफेड करू शकत नाही." श्रीकृष्ण, भगवान, सर्व शक्तिमान, तो गोपींचे ऋण फेडण्यात असमर्थ होता. तर गोपीं... चैतन्य महाप्रभु सांगतात,रम्या काचीद उपासना व्रज वधू वर्गेन या कल्पिता. गोपींच्या आराधने पेक्षा चांगली आराधना नाही.म्हणून गोपी सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. आणि सगळ्या गोपींमध्ये श्रीमती राधाराणी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ आहे. तर हे गौडीया वैष्णव तत्वज्ञान आहे. त्याला वेळ लागेल. तर श्रीकृष्णांचे कार्य,मूर्ख ते फक्त बघत असतील की "श्रीकृष्ण अर्जुनाला लढण्यासाठी उत्तेजन देत आहेत. म्हणून श्रीकृष्ण अनैतिक आहे." तो चुकीचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला श्रीकृष्णांना वेगळ्या दृष्टीने पहिले पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण भगवद् गीतेत सांगतात,

जन्म कर्म च मी दिव्यं, दिव्यं (भ.गी. ४.९).

श्रीकृष्णांची दिव्य कर्म,जर एखाद्याने जाणली. जर एखाद्याने जाणली, तर त्याला ताबडतोब मुक्ती मिळते. मुक्ती. सामान्य मुक्ती नाही,पण देवाच्याद्वारी परत जातो. परत देवाच्याद्वारी.

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति कौंतेय (भ.गी. ४.९).

महान मुक्ती. वेगळ्या प्रकारची मुक्ती सुद्धा आहे.

सायुज्य सारुप्य सार्स्ती सालोक्य सायुज्य...(चैतन्य चरितामृत मध्य ६.२६६)

पाच प्रकारची मुक्ती. तर सायुज्य म्हणजे अस्तित्वामध्ये विलीन होणे, ब्रम्हन, ब्रम्हलय. ती सुद्धा मुक्ती आहे. मायावादी किंवा ज्ञानी संप्रदाय,त्यांना अस्तित्वामध्ये विलीन होण्याची इच्छा असते,ब्रह्मन् अस्तित्व. ती सुद्धा मुक्ती आहे. त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. पण भक्तांसाठी, ही सायुज्य मुक्ती नर्कासारखी आहे. कैवल्यं नरकायते. तर वैष्णवांसाठी, कैवल्यं हे... अद्वैतवाद,सर्वोत्तमच्या अस्तित्वात विलीन होण्याची तुलना नरकाशी केली जाते.

कैवल्यं नरकायते त्रिदश पूर अकाश पुष्पायते (चैतन्य-चंद्रामृत ५).

आणि कर्मी... ज्ञानीना ब्रम्हजोतीमध्ये विलीन होण्याची चिंता असते. आणि कर्मी,त्यांचं ध्येय उच्च ग्रहांवर कसे जायचे स्वर्ग-लोक, जिथे इंद्रदेव आहे,किंवा ब्रम्हा आहे. स्वर्गात जाण्याची कर्मींची महत्वाकांक्षा असते. ते सगळे,वैष्णव तत्वज्ञाना व्यतिरिक्त, बाकी सगळ्या साहित्यात,बाकी सगळ्या शास्त्रात. म्हणजे ख्रिश्चन आणि मोहंमद, त्यांचं ध्येय स्वर्गात कसे जायचे.