MR/Prabhupada 0249 - प्रश्न विचारला होता कि युद्ध का घडते



Lecture on BG 2.6 -- London, August 6, 1973


तर इथे या सगळ्याच विचार करता अर्जुनाने लढायचं की नाही हा प्रश्नच येत नाही. कृष्णाद्वारे मंजूर आहे. म्हणून युद्ध होणे अटळ आहे. ज्याप्रमाणे आपण जेव्हा चालतो, प्रश्न उपस्थित होतो की "युद्ध का झालं?" तो समजायला खूप कठीण विषय नाही कारण आपल्यापैकी प्रत्येकाला लढण्याची इच्छाशक्ती मिळाली आहे. जरी मुले भांडतात,कुत्रे आणि मांजर लढतात,पक्षी संघर्ष करतात, मुंग्या लढतात,आम्ही ते पाहिलं आहे. तर मनुष्य का नाही? लढण्याची इच्छाशक्ती आहे. जिवंत असण्याचे ते एक लक्षण आहे. लढणे. तेव्हा त्या लढाईत काय घडेल? अर्थात,सध्याच्या क्षणी, महात्वाकांक्षी राजकारणी, ते लढतात. पण वैदिक संस्कृतीनुसार,लढाई म्हणजे धर्म-युद्ध. धार्मिक तत्वासाठी. राजकीय कल्पना लहरीखातर नाही. इझम. ज्याप्रमाणे दोन राजकीय गटात लढा सुरु आहे, साम्यवादी आणि भांडवलदार. ते कवळ संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लढा सुरु आहे.

जेव्हा अमेरिका एखाद्या क्षेत्रात येते,ताबडतोब रशिया सुद्धा तिथे असते. . भारत आणि पाकिस्तानच्या शेवटच्या लढाईत, जेव्हा राष्ट्राध्यक्ष निक्सन सातवे आरमार पाठवलं. भारताचा महासागर,बंगालचा उपसागर,जवळजवळ भारत समोर... ते बेकायदेशीर होते,पण अतिशय गर्विष्ठ,अमेरिका. पाकिस्तानला सहानुभूती दाखवायला सातवे आरमार पाठवले. पण ताबडतोब आपला रशियन मित्र तिथे आला. त्यामुळे अमेरिकेला परत मागे जावं लागलं. नाहीतर,मला वाटत,अमेरिकेने पाकिस्तानतर्फे,हल्ला केला असता. तर हे सुरु आहे. लढाई तुम्ही थांबवू शकत नाही. अनेक लोक,ते विचार करतात कसे युद्ध थांबवायचे. ते अशक्य आहे. . हा मुर्खासारखा प्रस्ताव आहे. ते शक्य नाही. कारण प्रत्यकामध्ये लढण्याची खुमखुमी आहे. ते जीवाचे लक्षण आहे अगदी मुलं ज्यांच्यात राजकारण,शत्रुत्व नसते, ती पाच मिनिटासाठी लढतात; परत ती मित्र बनतात.

तर लढण्याची खुमखुमी असते,आता,तिचा कसा वापर करायचा? आपली कृष्णभावनामृत चळवळ आहे. आपण म्हणतो भावना. आम्ही म्हणत नाही युद्ध थाबवा, "युद्ध थाबवा" किंवा हे करा,ते करा,"नाही. सर्वकाही कृष्णभावनामृतामध्ये केलं पाहिजे. ते आमच प्रचार तंत्र आहे. निर्बंध-कृष्ण-संबंधे जे काही तुम्ही कराल,त्याचा काही संबंध श्रीकृष्णांच्या संतुष्टीशी असला पाहिजे जर श्रीकृष्ण संतुष्ट असले, तर तुम्ही कृती कराल. ते कृष्णभावनामृत आहे.

कृष्णेंद्रीय तृप्ती वांछा तार नाम प्रेम (चैतन्य चरितामृत अादि ४.१६५)

हे प्रेम आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कोणावरतरी प्रेम करता; तुमच्या प्रेमाखातर,तुम्ही काहीही करू शकता, आणि आपण काहीतरी करतो. त्याचप्रमाणे,तीच गोष्ट श्रीकृष्णांकडे वळवली पाहिजे. एवढंच. श्रीकृष्णांवर कस प्रेम करायच हे स्वतःला शिकवण्याचा प्रयत्न करा आणि केवळ श्रीकृष्णांसाठी कर्म करा. हि जीवनाची परिपूर्णता आहे.

स वै पुंसां परो धर्मो यतो भत्त्किरधोक्षजे (श्रीमद भागवतम १.२.६)

भक्ती म्हणजे सेवा,भज-सेवायां. भज-धातू, सेवा करण्याच्या हेतूने त्याचा उपयोग करायचा. भज. आणि भज, संस्कृत व्याकरण आहे,कृती-प्रत्यय,त्याच नाम बनवायला. हे क्रियापद आहे. ते प्रत्यय,कृती प्रत्यय अनेक प्रत्यय आहेत. तर भज-धातू,भक्तीच्या बरोबरीचे. भक्ती म्हणजे श्रीकृष्णांना संतुष्ट करायच. भक्ती इतर कोणालाही लागू होत नाही. जर कोणी म्हणत "मी कालीचा महान भक्त आहे, काली देवी काली." ती भक्ती नाही. तो एक धंदा आहे. कारण तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करता त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो. साधारणपणे, लोक मांस भक्षण करण्यासाठी काली देवीचे भक्त बनतात. तो त्यांचा हेतू असतो. वैदिक संस्कृतीमध्ये, जे मांस भक्षक आहेत, त्यांना असा सल्ला दिला जातो की "कत्तलखान्यातून किंवा बाजारातून खरेदी केलेलं मांस खाऊ नका." खरंतर,कत्तलखाना चालू ठेवणे हि पद्धत आता कुठेही, संपूर्ण जगात नाही, हा नवीन शोध आहे.

कधी कधी आम्ही ख्रिश्चन सभ्य लोकांबरोबर बोलतो, आणि जेव्हा आम्ही चौकशी केली की . "प्रभू ख्रिस्त म्हणतो 'हत्या करू नका'; तुम्ही का मारता?" ते पुरावे देतात की "ख्रिस्ताने देखील मांस खाल्ले आहे." कधी कधी ख्रिस्ताने मांस खाल्ले आहे, पण ख्रिस्ताने सांगितले आहे का "तुम्ही "मोठं मोठे कत्तलखाने राखा आणि मांस खाणे सुरु ठेवा?" इथे अगदी सामान्य ज्ञान नाही. ख्रिस्ताने खाल्ले असेल. कधीकधी तो ... जर काहीही खायला उपलब्ध नसेल, तर तुम्ही काय करू शकता? तो वेगळा प्रश्न आहे. अतिशय गरजेच्यावेळी, जेव्हा मांस खाण्याव्यतिरिक्त दुसरं काही खायला नसेल... ती वेळ येत आहे. या काली युगात,हळूहळू अन्नधान्य कमी होत जाईल. हे श्रीमद् भागवतातील बाराव्या खंडात म्हटले आहे, तांदूळ नाही,गहू नाही,दूध नाही,साखर काहीही उपलब्ध नाही. मांस खावं लागेल. हि परिस्थिती असेल. आणि कदाचित मानवी मांस सुद्धा खावं लागेल. हे पापी जीवन हानिकारक आहे, एवढं की अधिकाधिक पापी बनतील.

तानहं द्विषतः क्रुरान्सं क्षिपाम्यजस्रम अंधे-योनिषु (भ.गी. १६.१९)

जे असुर असतात,जे पापी असतात, निसर्गाचा नियम आहे की त्यांना अशा परिस्थितीत ठेवायचं. त्यामुळे तो अधिकाधिक असुरी बनत जाईल आणि तो कधीही भगवंत काय आहेत हे समजू शकणार नाहीत. हा निसर्ग नियम आहे. जर तुमची देवाला विसरायची इच्छा असे, मग देव तुम्हाला अशा परिस्थितीत ठेवेल की तुम्ही कधीही समजू शकणार नाही देव काय आहे. ते असुरी जीवन आहे. ती वेळ सुद्धा येणार आहे. सध्याच्या क्षणी, अजूनही काही पुरुषांना स्वारस्य आहे, देव काय आहे.

आर्तो अर्थार्ती जिज्ञासू ज्ञानी (चैतन्य चरितामृत मध्य २४.९५)

पण या पुढे अशी वेळ येत आहे जेव्हा देवाला समजण्याची कुवत नसेल. तो कली युगाचा शेवटचा टप्पा आहे. आणि त्यावेळी कल्की अवतार,कल्की अवतार होईल. त्यावेळी तिथे ईश्वराच्या चेतनेचा कोणताही प्रचार नाही, फक्त हत्या,फक्त हत्या. कल्की अवतार त्याच्या तलवारी सकट केवळ कत्तल होईल. मग परत सत्य युग येईल.पुन्हा सुवर्णयुग येईल.