MR/Prabhupada 0250 - श्रीकृष्णांसाठी, देवासाठी, कर्म करा वैयक्तिक हितासाठी नाही



Lecture on BG 2.6 -- London, August 6, 1973


म्हणून हि लढाईची समस्या... आपण समजले पाहिजे की लढाईची भावना प्रत्येकामध्ये आहे. तुम्ही तपासू शकत नाही,तुम्ही थांबवू शकत नाही, आम्ही थांब म्हणत नाही. मायावादी तत्वज्ञानी सांगतात की "तुम्ही गोष्टी थाबवा, शक्य नाही. तुम्ही थांबवू शकत नाही. कारण तुम्ही सजीव आहात, तुम्हाला हे सर्व गुणधर्म मिळाले आहेत. कसे तुम्ही हे थांबवू शकता? पण याचा योग्यरीत्या वापर झाला पाहिजे. एवढंच. तुम्हाला लढाईची भावना मिळाली आहे. तिचा वापर कसा करायचा? हो. नरोत्तम दास ठाकूर शिफारशी करतात. क्रोध भक्त-द्वेषी-जने: "जे भगवंतांचे किंवा भगवंतांच्या भक्तांचे द्वेषी आहेत, तुम्ही तुमचा रागचा वापर त्यांच्यावर करू शकता." तुम्ही वापरू शकता. राग तुम्ही सोडू शकत नाही. आपलं काम तो कसा वापरायचा हे आहे. ते कृष्णभावनामृत. सर्व काही उपयोगात आणणे आवश्यक आहे. आम्ही असं सांगत नाही की "तुम्ही हे थाबवा,ते थाबवा."नाही. तुम्ही... कृष्ण सांगतात, यत्करोषि यज्जुहोषि यदश्नासि यत्तपस्यसि कुरुष्व तद मदर्पणम् (भगवद् गीता ९.२७).यत्करोषि. कृष्ण असं सांगत नाहीत की "तुम्ही हे जरा, तुम्ही ते करा." त्यांनी सांगितलं "जे काही तुम्ही करताय, पण त्याचे परिणाम माझ्यापर्यंत येऊ दे. तर इथे परिस्थिती अशी आहे की अर्जुन स्वतःसाठी लढत नाही,पण तो केवळ स्वतःचा विचार करत आहे. तो म्हणतो,ते अवस्थिताः प्रामुखे धार्तराष्ट्रा:,यानेव हत्वा न जिजीविषामस: (भगवद् गीता २.६) "ते माझे भाऊ,नातलग आहेत. जर ते मेले... आम्हाला मारायची इच्छा नाही. आता ते माझ्या समोर आहेत. मला त्यांची हत्या करावीच लागेल ?" तरी अजून तो स्वतःच्या समाधानाचा विचार करत आहे. तो पार्श्वभूमी तयार करत आहे - कसे भौतिकवादी लोक, ते स्वतःच्या समाधानाचा विचार करतात. तर ते सोडून दिलं पाहिजे. व्यक्तिगत समाधान नाही, श्रीकृष्णांचे समाधान. ते कृष्णभावनामृत आहे. जे काही तुम्ही करता, त्यांनी फरक पडत नाही. तुम्ही तपासलं पाहिजे, तुम्ही ते श्रीकृष्णांसाठी करत आहेत की नाही. ती तुमची परिपूर्णता आहे. केवळ परिपूर्णता नाही. ते तुमचा मानवी जीवनाच्या कार्याची परिपूर्णता आहे. मानवी जीवनाचा हा हेतू आहे. कारण मानवी रूपाच्या खाली, प्राण्यांचे जीवन, ते प्रशिक्षित आहेत, परिपूर्ण जाणीव, वैयक्तिक समाधान. त्यांना अशी कोणतीही भावना नाही की "इतर प्राणी सुद्धा..." जेव्हा काही खाण्याच्या वस्तू असतील,एखादा कुत्रा, तो विचार करेल "हे मला कसे मिळू शकेल?" कसे इतर कुत्रे सुद्धा घेण्यास समर्थ असतील हा तो कधीही विचार करत नाही. हा प्राण्यांचा स्वभाव नाही प्राण्यांचा स्वभाव म्हणजे त्यांचं समाधान. "माझे मित्र,माझे नातलग." हा प्रश्न तिथे नाही. अगदी, ते आपल्या स्वतःच्या मुलांबरोबरही वाटणी करत नाहीत, आपण कदाचित पहिले असेल. जर काही अन्नपदार्थ असतील, कुत्रे आणि कुत्रांची पिल्लं प्रत्येकजण ते घेण्याचा प्रयत्न करतात. हे प्राणी आहेत. तर जेव्हा या गोष्टी श्रीकृष्णांसाठी बदलली जाते, ते मानवी जीवन आहे. तो प्राणी जीवनातील फरक आहे. ते खूप कठीण आहे. म्हणून संपूर्ण शिकवण भगवद् गीतेत आहे, कसे लोकांना शिकवायचे, "श्रीकृष्णांसाठी, देवासाठी,कर्म करा वैयक्तिक हितासाठी नाही. मग तुम्ही गुंतलेले रहाल." यज्ञार्थात्कर्मणोSन्यत्र लोकोSयं कर्मबन्धनः (भगवद् गीता ३.९).जे काही तुम्ही करता, ते काही कर्म निर्माण करत,आणि तुम्ही त्या कर्मामुळे आनंद किंवा दुःख भोगता. काहीही तुम्ही करता, पण जर तुम्ही ते श्रीकृष्णांसाठी केलं तर कर्मबंधनांपासून रक्षण होत. ते तुमचं स्वतंत्र आहे. योगः कर्मसु कौशलम् (भगवद् गीता २.५०).आणि हे भौतिक जग, काम... नाहीतर, जेकाही तुम्ही करता,जेकाही तुम्ही काम करता, ते कर्म निर्माण करत आणि तुम्हाला त्या कर्मामुळे आनंद किंवा दुःख भोगावं लागत.

तर इथे परत,तीच गोष्ट. अर्जुन विचार करत आहे,न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो (भगवद् गीता २.६).तर तो गोंधळलेला आहे, कोणता पक्ष उत्कृष्ट असेल? मी युद्ध थांबवू शकेन,किंवा लढणार नाही नंतरच्या श्लोकात असं दिसेल... जेव्हा तुम्ही अशा गोंधळलेल्या स्थितीत आहात,"काय करू आणि काय करू नको," योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी, तुम्ही अध्यात्मिक गुरूंकडे गेलं पाहिजे. ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. अर्जुन म्हणेल की "मला माहित नाही. मी आता गोंधळात पडलो आहे. जरी मला माहीत आहे की क्षत्रिय म्हणून लढणं हे माझं कर्तव्य आहे, तरीही मी संकोच करत आहे. मी माझे कर्तव्य टाळत आहे. म्हणून मी गोंधळलेला आहे. तर श्रीकृष्ण, म्हणून मी तुम्हाला शरण आलोय." पूर्वी तो मित्राप्रमाणे बोलत होता. आता तो श्रीकृष्णांकडून धडा घेण्यासाठी तयार होईल.