MR/Prabhupada 0276 - गुरुचे काम तुम्हाला कृष्ण प्रेम द्यायचे, भौतिक गोष्टी नाही



Lecture on BG 2.7 -- London, August 7, 1973

म्हणून हे ज्ञान आवश्यक आहे,वास्तविक गुरु कसे शोधायचे आणि त्यांना शरण कसे जायचे. गुरु म्हणजे असे नाही की मी एक गुरु ठेवतो, आदेश-पुरवठादार. "माझ्या प्रिय गुरु,मी या पासून ग्रस्त आहे. तुम्ही मला काही औषध देऊ शकाल का?" "हो,हो. हे औषध घे." "होय." तो गुरु नाही. जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल,तुम्ही वैद्याकडे जा. तुम्हाला काही औषध देणे हे गुरुचे काम नाही. गुरुचे काम तुम्हाला कृष्ण देणे आहे. कृष्ण सेई तोमार कृष्ण दीते पार. वैष्णव गुरुकडे प्रार्थना करत आहे: "सर, तुम्ही कृष्ण भक्त आहात." "जर तुमची इच्छा असल्यास तुम्ही मला कृष्ण देऊ शकता." हि शिष्याची भूमिका असली पाहिजे. गुरुचे काम तुम्हाला कृष्ण प्रेम द्यायचे, न की भौतिक गोष्टी. भौतिक गोष्टींसाठी, अनेक संस्था आहेत. पण जर तुम्हाला कृष्ण पाहिजे असेल, तर गुरुची गरज आहे. कोण आहे, कोणाला गुरुची गरज आहे? तस्माद्गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम् शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम् :(श्रि भ ११।३।२१)

गुरुची कोणाला आवश्यकता आहे? गुरु फॅशन नाही. अरे,माझ्याकडे गुरु आहे. मी गुरु बनवीन." गुरु म्हणजे, एखादा जो गंभीर आहे. तस्माद्गुरुं प्रपद्येत. आपण गुरु शोधला पाहिजे. का? जिज्ञासुः श्रेय उत्तमम्. जी व्यक्ती सर्वोच्चला जाणण्यासाठी जिज्ञासू आहे. गुरुला फॅशन बनवू नका. ज्याप्रमाणे आपण कुत्रा पाळतो. त्याचप्रमाणे, आपण गुरु ठेवतो. तो गुरु नाही… "गुरु माझ्या निर्णयानुसार कार्य करेल." तसे नाही. गुरुचा अर्थ आहे जो तुम्हाला कृष्ण प्रेम देऊ शकेल.तो गुरु. कृष्ण सेई तोमर. कारण कृष्ण गुरु आहे. ते ब्रम्हसंहितेत सांगितले आहे. वेदेषु दुर्लभमदुर्लभमात्मभक्तो (ब्रम्हसंहिता ५.३३). वेदेषु दुर्लभम. जर आपण शोधू इच्छित असल्यास… वेद म्हणजे ज्ञान, परम ज्ञान आहे कृष्णांना समजणे. वेदैश्र्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् (भ गी १५।१५)। हि सूचना आहे. म्हणून जर तुम्ही स्वतंत्रपणे वेदांचा अभ्यास करू इच्छित असाल, जशी काही बदमाश लोक आहेत… ती सांगतात: "केवळ आम्ही वेद जाणतो." तुम्ही काय वेद समजणार.तुम्ही कसे वेद समजाल? तर वेद सांगतात, तद विज्ञानार्थं स गुरुं एव अभिगच्छेत (मु,उ.१.२.१२). तुम्ही वेद समजू शकाल,एक पुस्तक खरेदी करून,किंवा घेऊन तुम्ही वेद समजू शकाल? वेद एव्हढी स्वस्त गोष्ट नाही. ब्राम्हण बनल्याशिवाय,कोणीही वेद समजू शकत नाही. वेद काय आहे. म्हणून,ते प्रतिबंधित आहे. ब्राम्हण बनल्याशिवाय,कोणालाही वेदांचा अभ्यास करण्याची परवानगी नाही. हा सर्व मूर्खपणा आहे. वेदांबद्दल तुम्हाला काय समजू शकेल? म्हणून व्यासदेव,चार वेदांचे संकलन केल्यावर,वेद चार भागात वाटल्यावर त्यांनी महाभारत संकलित केले. कारण वेद, वेदांचा विषय खूप कठीण आहे. स्त्रीशूद्रद्विजबन्धुनां त्रयी न श्रुतिगोचरा (श्रि भ १।४।२५) स्त्रिया,शूद्र आणि द्विजबंधू साठी. ते वेद काय आहे समजू शकत नाहीत. तर हे सर्व बदमाश द्विजबंधू आणि शूद्र, ते वेदांचा अभ्यास करू इच्छितात. नाही. ते शक्य नाही. व्यक्तीला सर्व प्रथम ब्राम्हणीय पात्रते मध्ये स्थित झाले पाहिजे. सत्यं शमो दम तितीक्षवा आर्जवं ज्ञानं विज्ञान मस्तिक्यं ब्रम्ह कर्म स्वभाव…((भ गी१८।४२) मग वेदांना स्पर्श करा. नाहीतर, तुम्हाला वेद काय समजतील? म्हणून,वेद सांगतात:तद विज्ञानार्थं स गुरुं एव अभिगच्छेत (मु,उ.१.२.१२).वेद समजण्यासाठी तुम्ही गुरूचा आश्रय घेतला पाहिजे. आणि वेद काय आहे? वेदैश्र्च सर्वैरहमेव वेद्यो (भ गी १५।१५) वेद म्हणजे, वेदांचा अभ्यास करणे म्हणजे श्रीकृष्णांना समजणे. आणि त्यांना शरण जाणे. हे वैदिक ज्ञान आहे. इथे अर्जुन सांगतो की:प्रपन्नम. "आता मी तुम्हाला शरण आलो आहे. मी आता तुमच्याशी सामान पातळीवर बोलणार नाही जसे काही मला सर्व गोष्टी माहित आहेत. तो बरोबर आहे,पण तो भौतिक दृष्टिकोनातून विचार करत आहे. तो विचार करतो की प्रदुषन्ति कुलस्त्रियः(भ गी १।४०)। प्रत्येकजण… हा भौतिक मुद्दा आहे. पण वैदिक ज्ञान आध्यत्मिक आहे, उत्तमम. तस्माद् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम् (श्रि भ ११।३।२१) श्रेय उत्तमम् यच्छ्रेयः स्यान्निच्श्रितं. स्थिर राहणे. तिथे बदलण्याचा प्रश्न नाही. हि सूचना आता श्रीकृष्ण देतील. सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज. आणि हे होत - बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते (भ ग ७।१९)। म्हणून सर्वात उच्च,जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तीला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या प्रतिनिधींचा आश्रय घेतला पाहिजे. मग त्याचे जीवन यशस्वी आहे. आभारी आहे.