MR/Prabhupada 0277 - कृष्णभावनामृत म्हणजे सर्व प्रकारचे ज्ञान असणे



Lecture on BG 7.2 -- San Francisco, September 11, 1968

ज्ञानं तेSहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः
यज्ञात्वा नेह भूयोSन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते

(भ गी ७।२) आपण या श्लोकावर चर्चा करत होतो, ज्ञान काय आहे. ज्ञान म्हणजे हे विश्व कसे कार्यरत आहे, कार्यरत शक्ती काय आहे,ऊर्जा काय आहे. ज्याप्रमाणे शास्त्रज्ञ,ते वेगवेगळ्या ऊर्जा शोधत आहेत. जसे हि पृथ्वी वजनहिनतेवर तरंगत आहे. अनेक पर्वत,अनेक समुद्र,महासागरासह भौतिक शरीराचा इतका मोठा समूह. गगनचुंबी घर,शहरे,गावे,देश- ते हवेत कापसाच्या गोळ्याप्रमाणे तरंगत आहे. तर एखाद्याला समजले ते कसे तरंगतात,ते ज्ञान आहे. कृष्णभावनामृत म्हणजे सर्व प्रकारचे ज्ञान असणे. असे नाही की आम्ही कृष्णभावनामृत लोक काही भावनांनी वाहून जात आहोत. आम्हाला तत्वज्ञान,विज्ञान,धर्मशास्त्र,आचारसंहिता,नीतिशास्त्र, सर्वकाही मिळाले आहे.- जीवनाच्या मानवी स्वरूपात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी माहित आहेत. तर श्रीकृष्ण सांगतात की " मी तुझ्याशी सर्व ज्ञानाबद्दल बोलेन." तर हे कृष्णभावनामृत आहे. कृष्णभावनामृत… कृष्णभवनामृत व्यक्ती मूर्ख असू नये. जर त्याला स्पष्ट करायची आवश्यकता आहे हे ग्रह कसे तरंगत आहेत. अनेक प्रजातींमध्ये मानवी शरीर कसे फिरत आहे,ते कसे विकसित होत आहे… हे सर्व वैज्ञानिक ज्ञान,भौतिकशास्त्र,वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र,खगोलशास्त्र, सर्वकाही. म्हणून श्रीकृष्ण सांगतात,यज्ञात्वा,जर तुम्हाला हे कृष्णभावनामृत ज्ञान समजले. तर तुम्हाला आणखी काही समजण्याची आवश्यकता नाही. त्याचा अर्थ तुम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले असेल. आपण ज्ञानाचा ध्यास घेतला आहे,पण जर आपण कृष्णभावनामृत आहोत. जर आपल्याला श्रीकृष्ण माहिती असतील,तर सर्व ज्ञान समाविष्ट झाल्यासारखे आहे. तर तच्छक्ती विषय विविक्तस्वरूप विषयकं ज्ञानं तुम्हाला तुमच्या घटनात्मक स्थितीबद्दल पूर्ण ज्ञान असेल. हे भौतिक जग, अध्यात्मिक जग, ईश्वर,आपले परस्पर संबंध,अवकाश,सर्वकाही. जाणण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.पण मुख्य मुद्दा आहे की... ईश्वर,जीव,वेळ कर्म,आणि हि भौतिक ऊर्जा. या पाच गोष्टी ज्ञात होतील. आपण नाकारू शकत नाही "देव नाही." देव नियंता आहे, सर्वोच्च नियंत्रक. आपण म्हणू शकत नाही की आपण नियंत्रक नाही. नियंत्रक आहे. ज्याप्रमाणे राज्यात,तुम्ही म्हणू शकत नाही की नियंत्रक नाही. नियंत्रक आहे. प्रत्येक रस्तावर,प्रत्येक घरात,नियंत्रण आहे,सरकारी नियंत्रण. समजा हे गोदाम,इथे सुद्धा सरकारी नियंत्रण आहे. आपल्याला यासारखे गोदाम निर्माण करायचे आहे, आपण जगू शकत नाही. जर हे निवासी घर आहे,"अशाप्रकारे अग्निशामक व्यवस्था असावी." तेथे नियंत्रण आहे. अगदी तुम्ही रस्त्यावर चालताना,तुम्ही तुमची गाडी चालविताना, तिथे नियंत्रण आहे: "उजवीकडे ठेवा." जिथे "थांबा."लिहिले आहे तिथे आपण रास्ता ओलांडू शकत नाही. तुम्हाला थांबलेच पाहिजे. तर प्रत्येक मार्गावर, आपण नियंत्रणाखाली आहोत. तिथे नियंत्रक आहे. आणि सर्वोच्च नियंत्रक श्रीकृष्ण आहे. इथे एका नियंत्रकावर दुसरा नियंत्रक आहे. जर तुम्ही सर्वोच्च नियंत्रक कोण आहे शोधत गेलात, तर तुम्हाला कृष्ण सापडेल. सर्व-कारण-कारणं (ब्रम्हसंहिता ५.१). ब्रम्हसंहिता खात्री देते, ईश्वरः परमः, सर्वोच्च नियंत्रक श्रीकृष्ण आहेत. ईश्वरः परमः कृष्ण: (ब्रम्हसंहिता ५.१). ईश्वरः म्हणजे नियंत्रक. तर आपल्याला या नियंत्रकाचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे, कसा तो नियंत्रण ठेवत आहे. (मुल आवाज करत) ते त्रासदायक आहे. तर ज्ञानं विज्ञानं ते सहितं केवळ नियंत्रकाला जाणणे नाही,पण तो कसे नियंत्रण करतो हे जाणणे. नियंत्रकाला किती शक्ती मिळाल्या आहेत.आणि तो एकटा सर्व कशाप्रकारे नियंत्रित करतो- ते विज्ञानं आहे. तर ज्ञानं विज्ञानं ते नते तुभ्याम प्रपन्नाय अशेषतः.