MR/Prabhupada 0278 - शिष्याचा अर्थ आहे जो अनुशासन स्वीकारतो



Lecture on BG 7.2 -- San Francisco, September 11, 1968

आता हे ज्ञान अशा व्यक्तीला समजू शकेल ज्याने श्रीकृष्णांबरोबर नातं जोडल आहे.आणि आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केल्याशिवाय,नियंत्रक, (त्याच्या) शक्ती आणि तो कसे सर्व नियंत्रित करतो हे समजणे खूप कठीण आहे. तुभ्यां प्रपन्नाय अशेषतः समग्रेन उपदेक्षामि. हि स्थिती आहे. तुम्हाला नंतरच्या अध्यायात सापडेल की श्रीकृष्ण सांगतात, नाहं प्रकाशः सर्वस्य (भ गी ७।२५) ज्याप्रमाणे आपण कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश करतो. जर आपण संस्थेचे नियम पाळले नाहीत. आपणाला संस्थेद्वारे दिलेल्या माहितीचा फायदा कसा मिळवता येईल? सर्वत्र,जेथे आपण काही प्राप्त करू इच्छिता, आपल्याला नियंत्रित असायला पाहिजे,किंवा नियम पाळले पाहिजेत. जसे आपल्या वर्गात आम्ही भगवद् गीतेतील शिकवण देत आहोत. आणि जर तुम्ही या वर्गातील नियम पाळले नाहीत. तर हे ज्ञान प्राप्त करणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे,नियंत्रक आणि नियंत्रण करण्याची पद्धत याचे ज्ञान समजू शकते जेव्हा एखादा अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांना शरण जातो. जोपर्यंत एखादी व्यक्ती पूर्णतः शरणागत होत नाही,तोपर्यंत हे शक्य नाही. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की कृष्ण, अर्जुन कृष्णाला शरण गेला होता. शिष्यस्तेSहं शाधि मां प्रपन्नम् (भ गी २।७) तर म्हणून कृष्ण सुद्धा त्याच्याशी बोलत होते. वास्तविक, या शास्त्राच्या चर्चेचा प्रभाव पडला नसता, जोपर्यंत वक्ता आणि श्रोता यांच्यात काही संबंध नसता. तर श्रोता म्हणजे शिष्य. शिष्याचा अर्थ आहे जो अनुशासन स्वीकारतो. शिष्य. शिष्य. अचूक संस्कृत शब्द शिष्य आहे. शिष्य म्हणजे… एक क्रिया आहे, संस्कृत क्रिया,ज्याला शास म्हटले जाते. शास म्हणजे नियंत्रित करणे. शास पासून शास्त्र आले आहे. शास्त्र म्हणजे नियंत्रित पुस्तके. आणि शासपासून शास्त्र.शास्त्र म्हणजे शस्त्र. जेव्हा युक्तिवाद अयशस्वी होतो,तर्क विफल होतो…जसे सरकार नियंत्रित करते. सर्वप्रथम ते कायदा देतात. जर तुम्ही कायदा मोडलात, जर तुम्ही कायद्यांच्या पुस्तकांचे म्हणजे शास्त्र पालन केले नाही. तर पुढचे पाऊल शस्त्र. दंड जर तुम्ही सरकारी नियम पाळले नाहीत. उजव्या बाजूला रहा, मग पोलिसांचा दंडुका असतोच - शस्त्र तर तुम्ही नियंत्रित राहिले पाहिजे. जर तुम्ही सज्जन व्यक्ती असाल,तर तुम्हाला शास्त्रच्या नियंत्रणाखाली राहिले पाहिजे. आणि जर तुम्ही विरोध केलात,तर दुर्गादेवीचा त्रिशूळ आहेच. तुम्ही दुर्गादेवीचे चित्र पाहिले असेल, त्रिशूळ,त्रिविध ताप. मला म्हणायचं आहे,तुम्ही कुठल्याही नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. जसे सरकार,त्याचप्रमाणे सर्वोच्च सरकार कृष्ण. हे शक्य नाही. उदाहरणार्थ आरोग्यासाठी काही नियम आहेत. जर तुम्ही अधिक खाल्लत, तर तुम्ही कुठल्यातरी आजाराचे शिकार व्हाल तुम्हाला अपचन होईल आणि वैद्य तुम्हाला तीन दिवस काही न खाण्याचा सल्ला देतील. तर नियंत्रण आहे.निसर्गाद्वारे, निसर्ग म्हणजे ईश्वराचे कायदे,आपोआप कार्य करतात. ईश्वराचे कायदे मूर्ख लोक पाहत नाहीत, पण ईश्वराचे कायदे आहेत. सूर्य अगदी वेळेवर उगवतो,चंद्र सुद्धा अगदी वेळेवर उगवतो. वर्षाचा पहिला महिना,जानेवारी वेळेवर यतो. तर तिथे नियंत्रण आहे. पण मुर्ख लोक, ते हे बघत नाहीत. सर्वकाही नियंत्रित आहे. तर भगवंतांना समजण्यासाठी आणि कश्या गोष्टी कार्यरत आहेत आणि नियंत्रित केल्या जात आहेत. या गोष्टी ज्ञात होतील आपण केवळ भावाने द्वारे जाऊ नये. धार्मिक भावना,आंधळेपणी अनुसरण करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगल्या आहेत. पण सध्याच्या क्षणी, लोकांनी तथाकथित शैक्षणिक प्रगती केली आहे. तर भगवद् गीता तुम्हाला संपूर्ण माहिती देते जेणे करून तुम्ही तुमच्या ज्ञानाने,तुमच्या तर्काने देवाला स्वीकारू शकाल. तो अंध विश्वास नाही.कृष्णभावनामृत भावना नाही. त्याला ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञानाचा आधार आहे. विज्ञानं,ज्ञानं विज्ञानं सहितं. तर विज्ञान शिवाय सहितं… आणि हे ज्ञान समजण्याची प्रक्रिया आहे शरणागत होणे. म्हणून, आपण… शिष्य, शिष्य म्हणजे जो शिस्त स्वोकारतो. शिस्त स्वीकारल्या शिवाय, आपण कोणतीही प्रगती करू शकत नाही. ते शक्य नाही. माहितीचे कुठलेही क्षेत्र,कार्याचे कुठलेही क्षेत्र,आपल्याला जागरूक व्हायचे असेल तर, शास्त्रीयदृष्टया आणि वास्तविकतेने,तुम्हाला नियंत्रणाचे तत्व स्वीकारले पाहिजे. समग्रेन वक्स य स्वरूपं सर्वोकरं यत्र धियं तद उभय-विषयकं ज्ञानं व्यक्तुम