MR/Prabhupada 0287 - तुमच्या श्रीकृष्णांवरच्या प्रेमाची स्मृती पुन्हा जागृत करा



Lecture -- Seattle, September 30, 1968

प्रभुपाद: काही प्रश्न आहेत का? मधुद्विश : प्रभुपाद? तुमच्या भगवद गीतेच्या प्रकाशना नंतर श्रीमद भागवतं वाचले तर योग्य आहे का? किंवा भगवद गीता जशी आहे तशीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही संपूर्ण वेळ पूर्णपणे वाहून घेतले पाहिजे, आणि मग आम्ही… आणि मग तिथून प्रगती केली, किंवा श्रीमद भागवताचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे? प्रभुपाद: नाही. तुम्ही भगवद गीता जशी आहे तशी वाचली पाहिजे. हा केवळ एक प्रार्थमिक विभाग आहे. आध्यात्मिक स्तरावर सर्व काही परिपूर्ण आहे. जर तुम्ही भगवद गीता जशी आहे तशी वाचलीत,तुम्हाला श्रीमद भागवता प्रमाणेच समान तत्व सापडेल. असे नाही की तुम्ही श्रीमद भागवताचा अभ्यास केल्यावर भगवद गीतेचा अभ्यास करण्याची गरज नाही. ते तसे नाही. तुम्ही हे साहित्य वाचलेत आणि हरे कृष्णाचा जप केलात, नियम आणि शिस्त पाळा आणि आनंदाने रहा. आमचा कार्यक्रम खूप आनंदी कार्यक्रम आहे. आम्ही जप करतो, नाच करतो, आम्ही कृष्ण प्रसाद ग्रहण करतो,आम्ही छान कृष्णाची चित्रे रंगवतो आणि सुबकपणे सुशोभित करतो. आणि आम्ही तत्वज्ञान वाचतो. मग तुम्हाला अजून काय हवे आहे? (हशा) जान्व्हा: सुरवातीला कसे व का आपण कृष्णांबद्दलच्या आपल्या खऱ्या प्रेमाच्या अनुभूतीला मुकतो? प्रभुपाद: हं? तमाल कृष्ण: कसे आणि का… सुरवातीला कसे आणि का आपण कृष्णांबद्दलच्या आपल्या प्रेमाला मुकतो? जान्व्हा: नाही, प्रेम नाही. केवळ प्रेमाच्या अनुभूतीला, आपल्या कृष्णांबद्दलच्या खऱ्या प्रेमाच्या अनुभूतीला. प्रभुपाद: आपल्याला अनुभूती होते. तुम्ही कोणावरतरी प्रेम करता. पण आपण श्रीकृष्णांवर प्रेम केले आहे. ते तुम्ही विसरता. तर विस्मरण हा आपला स्वभाव आहे. काहीवेळा आपण विसरतो. आणि मुख्यतः कारण आपण खूप छोटे, अंश, म्हणून अगदी काल रात्री या वेळेला मी नक्की काय करत होतो हे मला आठवत नाही. तर विस्मरण आपल्यासाठी अनैसर्गिक नाही. आणि पुन्हा, जर कोणी आपली स्मृती जागृत केली, ते स्वीकारणे, ते सुद्धा अनैसर्गिक नाही. तर आपल्या प्रेमाची वस्तू श्रीकृष्ण आहेत. या नाहीतर त्या कारणाने,आपण त्याला विसरलो आहोत. आपण केव्हा विसरलो याचा इतिहास शोधत नाही. ते निरुपयोगी श्रम आहेत. पण आपण विसरलो आहोत,ते खरं आहे. आता पुनर्जीवित करा. इथे स्मरण करून देतात. त्या संधीचा फायदा घ्या प्रयत्न करू नका,इतिहास, का आपण विसरलो,आणि माझ्या विसरभोळेपणाचा काय तारीख होती. अगदी तुम्हाला माहित असेल, त्याच काय उपयोग? तुम्ही विसरला आहेत. ते स्वीकारा. जसे तुम्ही एखाद्या वैद्याकडे गेलात,तो तुम्हाला कधीही विचारणार नाही तुम्हाला हा रोग कसा झाला, या रोगाचा इतिहास काय, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळी तुम्ही संक्रमित झालात. नाही. तो तुमची नाडी तपासतो आणि बघतो की तुम्हाला हा रोग झाला आहे आणि तो तुम्हाला औषध देतो: "हो तुम्ही हे घ्या." त्याचप्रमाणे, आपण दुःख भोगत आहोत. ते सत्य आहे. कोणीही नाकारू शकत नाही. का तुम्ही दुःख भोगत आहात? श्रीकृष्णांच्या विस्मरणामुळे. एवढेच. आता तुम्हाला श्रीकृष्णांसंबंधीच्या तुमच्या स्मृतीला पुनर्जीवित केले पाहिजे, तुम्ही सुखी व्हाल. एव्हढेच. खूप सोपी गोष्ट. आता तुम्ही केव्हा विसरलात याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही विसरला आहात, ते सत्य आहे, कारण तुम्ही दुःख भोगत आहात. आता हि संधी आहे,कृष्णभावनामृत चळवळ. श्रीकृष्णांवरच्या तुमच्या प्रेमाची स्मृती पुनर्जीवित करा. साधी गोष्ट. हरे कृष्णाचा जप,नृत्य करा,आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करा. आणि जर तुम्ही शिकलेले नसाल, तुम्ही अशिक्षित असाल,ऐका. जसे तुम्हाला नैसर्गिक देणगी कान मिळाला आहे. तुम्हाला नैसर्गिक जीभ मिळाली आहे. तर तुम्ही हरे कृष्णाचा जप करू शकता आणि भगवद गीता किंवा श्रीमद भागवत ऐकू शकता अश्या व्यक्तीकडून जी ज्ञानी आहे. तर त्यात काही अडचण नाही. अडचण नाही. त्यासाठी पूर्व शिक्षणाची आवश्यकता नाही. केवळ तुमच्याकडे जी संपत्ती आहे तिचा वापर केला पाहिजे. एव्हढेच. तुम्ही सहमत असणे आवश्यक आहे. ते जरुरी आहे. "हो मी कृष्णभावनामृत स्विकारीन." ते तुमच्यावर अवलंबून आहे कारण तुम्ही स्वतंत्र आहेत. जर तुम्ही सहमत नसाल, "नाही. मी का श्रीकृष्णांचा स्वीकार करू?" कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही. पण जर तुम्ही सहमत असाल,हे खूप सोपं आहे, स्वीकारा.