MR/Prabhupada 0288 - जेव्हा तुम्ही भगवंतांबद्दल बोलता, तुम्हाला माहित आहे का भगवंतांची व्याख्या काय आहे



Lecture -- Seattle, September 30, 1968

पाहुणा: कदाचित याचे उत्तर तुम्ही आधी दिले आहे. मला खात्री नाही. मी ऐकले नाही. पण मी लहान मुलगा होतो, तेव्हापासून, देवावर प्रेम करायला मला शिकवले आहे, आणि मग मी सर्वांवर प्रेम करेन. कृष्ण देव आहेत का? प्रभुपाद: होय. तुला इतर देव माहित आहेत का? कृष्णाशिवाय इतर कोणता देव? पाहुणा: जरा,प्रश्न पुन्हा सांगता का? अरे, नाही,नाही… प्रभुपाद: फक्त देव काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाहुणा: मला माहित नव्हते की श्रीकृष्ण देव होते. प्रभुपाद: नाही, प्रत्येकाला व्याख्या असते. ज्याप्रमाणे जर मी म्हटले "हे घड्याळ आहे." तर त्याला एक व्याख्या आहे. घड्याळ म्हणजे ते गोल आहे आणि त्याला एक पांढरी चकती आणि दोन काटे आहेत, वेळ दर्शवणारे अनेक आकडे आहेत. त्याप्रमाणे, मी तुम्हाला काही वर्णन करू शकतो. तर काहीही. आपण जे काही पाहतो किंवा अनुभवतो किंवा समजण्याचा प्रयत्न करतो, त्यात काहीतरी व्याख्या असली पाहिजे. तर जेव्हा तुम्ही भगवंतांबद्दल बोलता, तुम्हाला माहित आहे का भगवंतांची व्याख्या काय आहे? पाहुणा: होय. मला वाटत ते प्रेमाचे प्रतिक आहेत. प्रभुपाद: प्रेमाची व्याख्या नाही; प्रेम कृती आहे. होय, प्रेम. मी देवावर प्रेम करतो. प्रेम माझे कार्य आहे. पण ईश्वराची काही व्याख्या असली पाहिजे. ते सुद्धा तुम्हाला माहित आहे .आता तुम्ही ते विसरला आहात. आता,एका शब्दात ते म्हणतात की "देव महान आहे." तर तुम्ही कोणाच्या महानतेची परीक्षा कशी घ्याल? दुसरा मुद्दा. जर तुम्ही म्हटलेत की "हि व्यक्ती महान आहे," आता एक समज असणे आवश्यक आहे, तुम्ही कसे तो महान आहे हे ठरवणार. हे समजून घेण्याचे वेगवेगळे स्तर आहेत. तर देव महान आहे हे तुम्ही कसे समजणार ? देव महान आहे, या मुद्दयावर तुमचा तर्क काय आहे, ज्याप्रमाणे तुमच्या बायबलमध्ये म्हटले आहे, "देव सांगतात निर्मिती होऊ दे, आणि निर्मिती झाली." नाही का? असे विधान नाही का? तर हि महानता आहे. त्यांनी फक्त म्हटलं, "निर्मिती होऊ द्या," आणि निर्मिती झाली होती. तुम्ही ते करू शकता का? समजा तुम्ही खूप चांगले सुतार आहात. तुम्ही म्हणू शकता का, "एका खुर्चीची निर्मिती होऊ दे," आणि एकदम खुर्ची निर्माण झाली? हे शक्य आहे का? समजा तुम्ही ह्या घड्याळाचे निर्माता आहात. तुम्ही म्हणू शकता का की "मी सांगतो, घड्याळ निर्माण होऊ दे," आणि लगेच तिथे घड्याळ निर्माण झाले? ते शक्य नाही. म्हणून भगवंतांचे नाव सत्य-संकल्प. सत्य-संकल्प. सत्य-संकल्प म्हणजे जे काही ते विचार करतात, ते लगेच निर्माण होते. देव नाही,पण ज्यांनी योगाची सिद्धता प्राप्त केली आहे, ते भगवंतांप्रमाणे विचार करू शकत नाहीत. पण जवळपास. अद्भुत गोष्ट… एक योगी,जर त्याला सिद्धी प्राप्त झाली असेल,जर तो काही इच्छित असेल, की "मला हे पाहिजे," लगेच ते तिथे येईल. याला सत्य-संकल्प म्हणतात.या प्रकारे, अशी अनेक उदाहरण आहेत. ती महानता आहे. मी काय… ज्याप्रमाणे आधुनिक शास्त्रज्ञ, ते वेगाने अंतरिक्ष यान उडवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून ते चंद्रावर जाऊ शकतील. अनेक अमेरिकेचे,रशियाचे शास्त्रज्ञ, आणि इतर देश, ते प्रयत्न करत आहेत. पण ते करू शकत नाही. त्याचे स्फुटनिक परत येत आहे. पण भगवंतांची शक्ती पहा. लाखो ग्रह कापसाप्रमाणे तरंगत आहेत. हि महानता आहेत. तर कोणी मूर्ख,जर तो म्हणेल की "मी देव आहे," तो दुष्ट आहे. देव महान आहे. तुम्ही देवाबरोबर स्वतःची तुलना करू शकत नाही. इथे तुलना नाही.पण मूर्खपणा चालू आहे. "प्रत्येकजण देव आहे. मी देव आहे, तुम्ही देव आहात" - तर तो कुत्रा आहे. पहिले देवाप्रमाणे शक्ती दाखवा, मग तुम्ही म्हणा. पहिले लायक बना,मग इच्छा करा. आपल्याकडे काय शक्ती आहे? आपण नेहमी अवलंबून असतो. तर देव महान आहे,आणि आपण देवावर अवलंबून आहोत. म्हणून स्वाभाविक निष्कर्ष असा आहे की आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. हे (अस्पष्ट) पूर्ण आहे. सेवा म्हणजे प्रेमाने. जोपर्यंत… आता ज्याप्रमाणे हि मुले, माझे शिष्य, ते माझी सेवा करतात. मी जे काही म्हणो ते लगेच अमलात आणत आहेत. का? मी भारतीय आहे, मी परदेशी आहे. दोन तीन वर्षांपूर्वी मी त्यांना ओळखत नव्हतो,किंवा ते मला ओळखत नव्हते. ते असे का करत आहेत? कारण हे प्रेम आहे. सेवा करणे म्हणजे प्रेमभावना वाढवणे. तर जोपर्यंत तुम्ही देवावरचे आपले प्रेम विकसित करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांची सेवा करू शकत नाही. कुठेही. जेव्हा आपण काही सेवा करतो तेव्हा ती प्रेमावर आधारित असते. ज्याप्रमाणे असहाय्य मुलाची सेवा आई करते. का? प्रेम. तर त्याचप्रमाणे, आपले जीवन परिपूर्ण होईल जेव्हा आपले शुद्ध प्रेम सर्वश्रेष्ठ व्यक्तीशी असेल. मग ठीक आहे. तुम्ही हे शकले पाहिजे. याला कृष्णभावनामृत म्हणतात - श्रीकृष्णांशी संबंधित. जसे मी माझ्या शिष्यांवर प्रेम करतो, माझे शिष्य माझ्यावर प्रेम करतात. का? माध्यम काय आहे? कृष्ण.