MR/Prabhupada 0333 - प्रत्येकाला दिव्य बनण्यासाठी शिक्षित करणे



Lecture on BG 16.6 -- Hawaii, February 2, 1975

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः (भ.गी. ४.२) । तर नक्कीच असेच. येथे सूर्य नगण्य भाग आहे, भगवंतांची निर्मिती. आणि सूर्याची किरणे ऐवढी तेजस्वी आहेत की ती सर्व जगाला प्रकाशमान करतात आणि ऊर्जा देतात. ते तुम्ही नाकारू शकत नाही. हि सूर्याची स्थिती आहे. आणि असे लाखो करोडो सूर्य आहेत, प्रत्येक सूर्य काहीवेळा या सूर्यापेक्षा मोठा असतो. हा सर्वात लहान सूर्य आहे. असे मोठे, मोठे सूर्य आहेत. तर आपण शारीरिक किरणे म्हणजे काय ते समजू शकतो. त्यात काही अडचण नाही. कृष्णांच्या शरीराच्या तेजाला ब्रह्मन म्हणतात. यस्य प्रभा प्रभावतो जगदण्डकोटी कोटिष्वशेषवसुधादिविभूतिभन्नम् तद्-ब्रम्हः (ब्रम्हसंहिता 5.40). "ते ब्रम्हन आहे, प्रभा." तर त्याचप्रमाणे, श्रीकृष्ण सगळ्यांच्या हृदयात व्यक्तिशः स्थित आहेत. हा निराकार विस्तार आहे. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे सूर्याचा निराकार विस्तार आहे, त्याचप्रमाणे, ब्रम्ह तेज हे श्रीकृष्णांच्या शरीराचे निराकार विस्तारित रूप आहे. आणि ज्या भागात ते सर्वत्र उपस्थित आहेत, अण्डान्तरस्थपरमाणुचयान्तरस्थं (ब्रम्हसंहिता ५.३५). ते या विश्वात आहेत. ते तुझ्या हृदयात आहेत, माझ्या हृदयात आहे. ते सर्व गोष्टीत आहेत. "सर्वकाही" म्हणजे अणू, परमाणूमध्ये आहेत. ते त्याचे परमात्मा रूप आहे. आणि शेवटचे आणि अंतिम रूप श्रीकृष्णांचे व्यक्तिगत शरीर आहे. सच्चिदानन्दविग्रहः. ईश्वर परमः कृष्णः सच्चिदानन्दविग्रहः (ब्रम्हसंहिता ५.१). विग्रह म्हणजे मूर्ती. ते रूप आपल्यासारखे नाही. ते सत् , चित्, आनंद आहे. शरीराला देखील तीन वैशिष्टये आहेत. सत् म्हणजे शाश्वत.

तर म्हणून. त्यांचे शरीर आपल्या शरीरापेक्षा वेगळे आहे. आपले, हे शरीर शाश्वत नाही. जेव्हा हे शरीर आई आणि वडिलांनी निर्माण केले, त्याला तारीख, सुरवात आहे. आणि जेव्हा हे शरीर नाश पावते, तेव्हा दुसरी तारीख आहे. तर सर्वकाही ज्याला तारीख आहे, तो इतिहास आहे. पण श्रीकृष्ण तसे नाहीत. अनादी. केव्हा श्रीकृष्णांचे शरीर निर्माण झाले याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही अनादी आदी, परत आदी. ते सर्वांचा प्रारंभ आहेत. अनादी. ते स्वतः अनादी आहेत, कोणीही शोधू शकत नाही त्यांची जन्म तारीख काय आहे. ते जणण्यापलीकडले आहे. पण ते आदि पुरुष आहेत. जसे माझे वडील माझ्या शरीराचे प्रारंभ आहेत. माझे शरीर किंवा तुमच्या शरीराचे, प्रत्येकाच्या शरीराचे वडील प्रारंभ आहेत. तर म्हणून त्यांना प्रारंभ नाही, की त्यांना वडील नाहीत, पण ते सर्वोच्च वडील आहेत. हि संकल्पना आहे, ख्रिश्चन संकल्पना: देव सर्वोच्च पिता आहे. ते सत्य आहे, कारण ते सर्वांचा प्रारंभ आहेत. जन्मांदस्य यतः (श्रीमद् भागवतम् १.१.१) "जे काही अस्तित्वात आहे,ते कृष्णमुळेच आहे." ते भगवद्-गीतेत सांगितले आहे. अहमादिर्हि देवानां (भ.गी. १०.२) देवता… हे ब्रम्हांड हि ब्रम्हाची निर्मिती आहे. त्याला एक देवता म्हणतात. तर श्रीकृष्ण सांगतात, अहमादीर्हि देवानां, "देवतांचे मूळ मी आहे." जर तुम्ही याप्रकारे श्रीकृष्णांचा अभ्यास केलात, तर तुम्ही दिव्य बनाल दिव्य . दिव्य.

आपले कृष्णभावनामृत अंदोलन प्रत्येकाला शिक्षित करण्यासाठी आहे, दिव्य बनण्यासाठी. तो कार्यक्रम आहे. तर दिव्य बनण्यात काय फायदा आहे. त्याचे वर्णन मागील श्लोकात केले आहे. दैवी संपद्विमोक्षाय ( भ.गी. १६.५) । जर तुम्ही दिव्य व्हाल आणि दैवी गुण प्राप्त कराल, अभयं सत्त्व-संशुध्दीही ज्ञान-योग-व्यवस्थिती:... ते आहे… आपण आधी चर्चा केली आहे. जर तुम्ही दिव्य बनलात… दैवी होण्यासाठी अडथळा नाही. फक्त त्या पदासाठी सराव केला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्येकजण उच्च न्यायालयीन न्यायाधीश बनू शकतो. प्रत्येकजण अमेरिकेचा अध्यक्ष बनू शकतो. त्याला काही बंधन नाही. पण आपण पात्र असणे आवश्यक आहे. जर आपण स्वतःला पात्र बनवल्यास, तुम्ही कोणत्याही… पदासाठी लायक बनू शकता. त्याचप्रमाणे,जसे सांगितले आहे,दिव्य, दैवी बनण्यासाठी, तुम्हाला स्वतःला योग्य बनवले पाहिजे. दिव्य कसे बनायचे? ते आधीच वर्णन केले आहे. आपण आधीच…

जर तुम्ही स्वतःला दिव्य गुणांनी योग्य बनवलेत,तर काय फायदा आहे? दैवी संपद्विमोक्षाय. मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्ती. म्हणून जर आपण दैवी गुण विकसित केलेत, तर तुम्ही मुक्त होण्यास पात्र आहात. मुक्ती काय आहे? जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती. ते आपले खरे दुःख आहे. आधुनिक, बदमाश संस्कृती, त्यांना दुःखाचा शेवट काय आहे हे माहित नाही त्यांना माहित नाही. तसे शिक्षण नाही. विज्ञान नाही. ते विचार करतात की. "या आयुष्याच्या छोट्या कालावधीत,जास्तीत जास्त, पन्नास वर्षे, साठ वर्षे, शंभर वर्षे, जर आपल्याला चांगली बायको मिळाली, चांगले घर, चांगली मोटर कर, सत्तर मैल वेगाने धावणारी, आणि छान व्हिस्कीची बाटली…" ती त्याची पूर्णता आहे. पण ते विमोक्षय नाही. वास्तविक विमोक्षय, मोक्ष, म्हणजे, परत जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी नाही. ते विमोक्ष आहे. पण त्यांना माहित नाही.