MR/Prabhupada 0335 - लोकांना अव्वल दर्जाचे योगी बनवण्याचे शिक्षण



Lecture on BG 2.24 -- Hyderabad, November 28, 1972

एक ब्राम्हण. तो कृष्णाला प्रार्थना करतो: "माझ्या प्रिय देवा, मी इंद्रियांचा दास बनलो आहे." इथे सर्वजण त्यांच्या इंद्रियांचे दास आहेत. त्यांना इंद्रियांची तृप्ती करायची आहे. आनंद नाही - त्यांना इंद्रियांची सेवा करायची आहे. माझी जीभ सांगते, "कृपया अमक्या अमक्या उपहारगृहात मला घेऊन जा आणि मला असा कोंबडीचा रस द्या." मी लगेच जातो. आनंद घेण्यासाठी नाही. पण माझ्या जिभेच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी.

म्हणून तथाकथित आनंदाच्या नावाखाली, आपण सर्व इंद्रियांची सेवा करत आहोत. संस्कृतमध्ये याला गो-दास म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय. म्हणून जर तुम्ही गोस्वामी बनला नाहीत, तर तुमचे जीवन वाया जाईल. गोस्वामी. तुम्ही इंद्रियांद्वारे दिल्या जाणाऱ्या आज्ञांचे पालन करू शकत नाही. तुम्ही इंद्रियांना आज्ञा द्या. जेव्हा जीभ म्हणते, "आता तुम्ही मला त्या उपहारगृहात न्या, किंवा मला सिगरेट द्या," जर तुम्ही म्हणालात, "नाही. सिगरेट नाही, उपहारगृह नाही; फक्त कृष्ण प्रसाद," तर तुम्ही गोस्वामी आहात. ते गोस्वामी आहेत. हे वैशिष्ट्य आहे, सनातन. कारण श्रीकृष्णांनचा शाश्वत सेवक आहे. तर याला सनातन-धर्म म्हणतात. ते आम्ही अजामिल-ऊपाख्यानमध्ये वर्णन केले आहे. हि स्थिती मिळवता येते. तपसा ब्रह्मचर्येन शमेन दमेन शौचेन त्यागेन यमेन नियमेन (श्रीमद् भागवतम् ६.१.१३) |

म्हणून संपूर्ण वैदिक साहित्य इंद्रियांवर कसा ताबा मिळवायचा यासाठी आहे. योग. योग इंद्रिय-संयम. तो योग आहे. योग म्हणजे जादू दाखवणे नव्हे. हि प्रथम श्रेणीची जादू आहे. जर तुम्ही योगाचा सराव करत असाल… मी कितीतरी तथाकथित योगी बघितले आहेत, पण ते धूम्रपान करण्याची भावना नियंत्रित करू शकत नाहीत. तुम्ही बघा. धूम्रपान आणि इतर अनेक गोष्टी चालू आहेत. आणि तरीही, ते योगी म्हणून वावरत आहेत. काय प्रकारचे योगी योगी म्हणजे ज्याने इंद्रियांवर नियंत्रण ठेवले आहे. शमेन दमेन ब्रम्हचर्येन. तिथे आहे… भगवद गीतेत हे सर्व समजावून सांगितले आहे तेथे योग प्रणालीचे वर्णन आहे. आणि पाच हजार वर्षपूर्वी, अर्जुन योग, इंद्रियांच्या नियंत्रणाबद्दल ऐकत होता तर तो गृहस्थ होता, आणि राजकारणी सुद्धा, कारण तो राजघराण्यातील होता. तो राज्यावर विजय मिळवण्यासाठी लढत होता. तर अर्जुन मोकळेपणाने म्हणाला, माझ्या प्रिय कृष्ण, मी योगी बनणे शक्य नाही, कारण ते खूप कठीण काम आहे. तू मला निर्जन ठिकाणी, पवित्र ठिकाणी बसायला सांगत आहेस, आणि काटकोनावस्थेत, फक्त नाकाच्या टोकाकडे पाहायचे, माझ्या नाकाच्या. अनेक गोष्टी आहेत… पण ते माझ्यासाठी शक्य नाही." त्याने स्पष्टपणे नकार दिला. म्हणूनच कृष्ण, आपल्या मित्रांना आणि भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी… अर्जुन निराश होत आहे हे त्याला समजले. त्याने मोकळेपणाने कबुल केले की हे त्याच्यासाठी हे शक्य नाही. प्रत्यक्षात तो एक राजकारणी आहे. योगी बनणे त्याच्यासाठी कसे शक्य आहे? पण आपली राजकारणी, ते जाहिरात करत आहेत की ते योगाचा सराव करत आहेत. कशा प्रकारचा योग? अर्जुनापेक्षा ते मोठे झाले आहेत का? या पतित युगात? पाच हजार वर्षांपूर्वी, किती अनुकूल स्थिती होती. आणि आता, या प्रतिकूल परिस्थितीत, बिघडलेल्या स्थितीत, तुम्हाला तथाकथित योगी बनायचे आहे? ते शक्य नाही. कृते यध्द्यायतो विष्णुं (श्रीमद् भागवतम् १२.३.५२) । योग म्हणजे विष्णूचे चिंतन करणे. ते सत्य-युगात शक्य होते. वाल्मिकींप्रमाणे. ते साठ हजार वर्षे ध्यान करत होते, आणि परिपूर्ण बनले. तर कोण साठ हजार वर्षे जगेल? म्हणून ते शक्य नाही. म्हणून कृष्ण, त्याला प्रोत्साहित करण्यासाठी… वास्तविक, योगाचा उद्देश, त्यांनी अर्जुनाला स्पष्ट केला. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां स मे युत्त्कतमो मताः  :(भ.गी. ६.४७) । प्रथम दर्जाचा योगी कोण ? योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना. जो सतत माझा,कृष्ण विचार करतो." तर हे कृष्णभावनामृत आंदोलन लोकांना प्रथम श्रेणीचे योगी बनण्यासाठी शिक्षित करीत आहे. श्रीकृष्णांचा विचार करा. हरे कृष्ण, हरे कृष्ण,कृष्ण कृष्ण, हरे हरे/हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, ती खोटी गोष्ट नाही. ती वास्तविक वस्तुस्थिती आहे. तुम्ही योगी बनू शकता. तुम्ही ब्रह्मन बनू शकता. ब्रह्म-भुयाय कल्पते.

माम च यो अव्यभिचारेण
भक्ति योगेन सेवते
स गुणान् समतीत्यैतान्
ब्रह्मभूयाय कल्पते
(भ.गी. १४.२६)

आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, ब्रह्मा-भूत. (श्रीमद् भागवतम् ४.३०.२०) ब्रह्मभूत: प्रसन्नात्मा (भ.गी. १८.५४), मग त्याच्यासाठी काय राहिले? जीवनाचा हाच अंतिम उद्देश आहे. अहं ब्रम्हास्मि बनणे. वैदिक साहित्य आपल्याला शिकवते की "असा विचार करू नका की तुम्ही एका पदार्थाचे बनले आहात तुम्ही ब्रम्ह आहात." कृष्ण पर-ब्रम्ह आहे, आणि आपण दुय्यम ब्रम्ह आहोत. नित्य-कृष्ण-दास. आपण सेवक ब्रम्हन आहोत. ते स्वामी ब्राम्हण आहेत. मी सेवक ब्राम्हन आहे समजण्याऐवजी मी विचार करतो की मी स्वामी ब्रम्हन आहे. तो दुसरा भ्रम आहे. तो दुसरा भ्रम आहे.