MR/Prabhupada 0336 - असं कसं, ते भगवंतांच्या पाठी वेडे झाले आहेत



Lecture on SB 1.2.5 -- Aligarh, October 9, 1976

आता तुम्ही या देशात आहात, समजा भारतात, आणि पुढच्या आयुष्यात, कारण तुम्हाला तुमचे शरीर बदलले पाहिजे, पुढच्या आयुष्यात आपण भारतात जन्म घ्याल असे नाही. तुम्ही स्वर्गीय ग्रह किंवा प्राणी जगतात जन्म घेतला असेल. कारण कोणतीही हमी नाही. कृष्ण सांगतात तथा देहान्तर प्राप्तिर. मृत्यू म्हणजे शरीर बदलणे. पण कोणत्या प्रकारचे शरीरी तुम्ही स्वीकाराल, ते सर्वोच्च व्यवस्थेवर अवलंबून असेल. पण आपण देखील व्यवस्था करू शकता. जसे तुम्ही वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होता. शासकीय वैद्यकीय सेवा मंडळात सेवा मिळण्यासाठी आपण वैद्यकीय अधिकारी बनण्याची शक्यता आहे. पण तरीही, ते वैद्यकीय मंडळातर्फे निवडलेले असले पाहिजे. तिथे अनेक अटी आहेत. त्याचप्रमाणे पुढचे शरीर मिळण्यासाठी, ती तुमची निवड नाही. ते सर्वोच्च अधिकारीवर अवलंबून आहे. कर्मणा दैवनेत्रेणजन्तु र्देहोपपत्तेये(श्रीमद् भागवतम् ३.३१.१) । ते आपल्याला माहित नाही, की पुढील आयुष्य. पुढचे आयुष्य काय आहे त्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. हे शरीर सोडल्यावर आपल्याला पुढचे आयुष्य स्वीकारावे लागेल. म्हणून आपण त्या हेतूसाठी तयारी केली पाहिजे. तर तयारी म्हणजे भगवद् गीतेत सांगितले आहे यान्ति देवव्रता देवान (भ.गी. ९.२५) । जर तुम्ही स्वतःला उच्च लोकात जाण्यासाठी तयार केलेत, चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक, स्वर्गलोक,ब्रम्हलोक, जनलोक, महर्लोक, तपलोक - तिथे अनेक,शेकडो आहेत. जर तुम्हाला तिथे जाण्याची इच्छा असेल, तर तुम्ही त्या मार्गाने तयारी करा. यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः जर तुम्हाला पितृलोक जायची इच्छा असेल, तुम्ही तिथे जाऊ शकता. जर तुम्हाला देवलोकातील उच्च ग्रहावर जाण्याची इच्छा असेल, तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि जर तुम्हाला इथे राहण्याची इच्छा असेल, तुम्ही इथे राहू शकता. आणि जर तुम्हाला गोलोक वृन्दावन जाण्याची इच्छा असेल, मद्याजिनोsपि यान्ति माम (भ.गी. ९.२५) । तुम्ही तिथे जाऊ शकता. परत घरी, जाऊ देवाचिया द्वारी. ते शक्य आहे.

कृष्ण सांगतात त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति (भ.गी. ४.९) । जर तुमची इच्छा असली परत घरी, देवाच्या द्वारी जाऊ शकता. ते शक्य आहे. म्हणून बुद्धिमान लोक, त्यानं माहित असले पाहिजे "जर मी देवलोक गेलो, तिथे जाण्याचा काय परिणाम होतो. जर मी पितृलोक गेलो, त्याच परिणाम काय आहे. जर मी इथे राहिलो, त्याचा परिणाम काय आहे. आणि जर घरी परत देवाच्या द्वारी गेलो, त्याच परिणाम काय आहे." अंतिम परिणाम परत घरी, परत देवाच्या द्वारी गेलात, तर कृष्ण सांगतात त्याचा परिणाम काय आहे. परिणाम आहे त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति(भ.गी. ४.९), या भौतिक जगात तुम्हाला पुन्हा जन्म मिळत नाही. तर तो मोठा लाभ आहे. पुनर्जन्म नैति मामेति.

मामुपेत्य पुनर्जन्म
दुःखालयमशाश्वतम्
नाप्नुवन्ति महात्मानः
संसिध्दि परमां गताः
(भ.गी. ८.१५) |

ती सर्वोच्च परिपूर्णता आहे. आणि म्हणून इथे असे सांगितले आहे, स वै पुंसां परो धर्मो यतो भत्त्किरधोक्षजे (श्रीमद् भागवतम् १.२.६) | जर तुम्हाला परत घरी, परत देवाच्या द्वारी, जाण्याची इच्छा असेल तर येतो भत्त्किरधोक्षजे. आपल्याला हा भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः (भ.गी. १८.५५) । कृष्ण, किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवान, कर्म, ज्ञान, योगाद्वारे समजू शकत नाही. कृष्णाला समजण्यासाठी कोणतीही प्रक्रिया पुरेशी नाही. म्हणून आपल्याला श्रीकृष्णांनी शिफारस केलेल्या प्रक्रियेला स्वीकारले पाहिजे भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः(भ.गी. १८.५५) ।

म्हणून आम्ही श्रीकृष्णांच्या लीलामध्ये गुंतत नाही जोपर्यंत त्या भक्ताद्वारे अमलात आणल्या जात नाहीत. व्यावसायिक व्यक्ती नाही. ते निषिद्ध आहे. चैतन्य महाप्रभु कधीही गुंतले नाहीत. कारण कृष्णाचा विषय भक्ती प्रक्रियेद्वारे समजला जाऊ शकतो यतो भत्त्किरधोक्षजे (श्रीमद् भागवतम् १.२.६) । भक्ती शिवाय, हे शक्य नाही. भक्ती प्रक्रिया अवलंबली पाहिजे जर त्याला खरंच परत घर, परत देवाच्या द्वारी जायचे असेल. ती कृष्णभावनामृत चळवळ आहे. आमचे अंदोलन, हे कृष्णभवनामृत अंदोलन,लोकांना भक्तीमध्ये प्रगती कशी करायची त्याचे शिक्षण देत आहे. आणि परत घरी, परत देवाच्या द्वारी कसे जायचे. आणि हे फार कठीण काम नाही हे अतिशय सोपे आहे. जर ते सोपे नसते तर कसे युरोपियन,अमेरिकन लोकांनी गंभीरपणे घेतले असते.? कारण ते, मला वाटते दहा वर्षपूर्वी, हे आंदोलन सुरु होण्यापूर्वी, त्यापैकी बहुतेकांना, त्यांना कृष्ण काय आहे माहित नव्हते. आता ते सर्व कृष्णाचे भक्त आहेत. अगदी ख्रिस्ती धर्मोपदेशक, ते आश्चर्यचकित आहेत. बोस्टनमध्ये, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, त्यांनी स्वीकारले की " हि मुले हि आमची मुले आहेत, ख्रिस्ती किंवा जेविष समजातून आलेली तर या आंदोलनाच्या आधी ते आम्हाला बघतही नव्हते, किंवा देवाबद्दल काही प्रश्न विचारत किंवा चर्चमध्ये येत नव्हते. ते पूर्णपणे टाळत. आणि आता ते कसे भगवंताच्या पाठी वेडे झाले आहेत? ते आश्चर्यचकित झाले. "का? ते असे का झाले…?" कारण त्यांनी हि प्रक्रिया अंगिकारली आहे. प्रक्रिया महत्वाची आहे. फक्त अनुमान… भक्ती सैद्धांतिक आहे. ती प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. यतो भत्त्किरधोक्षजे. जर तुमची भक्ती प्रक्रिया स्वीकारायची इच्छा असेल, ती काल्पनिक नाही तुम्ही प्रत्यक्ष या प्रक्रिये गुंतले पाहिजे. यतो भत्त्किरधोक्षजे. ती प्रक्रिया आहे.

श्रवणं किर्तनं विष्णोः
स्मरणं पादसेवनम्
अर्चनं वन्दनं दास्मं
सख्यमात्मनिवेदनम्
(श्रीमद् भागवतम् ७.५.२३)