MR/Prabhupada 0339 - भगवान शक्तिमान आहेत, आपण त्यांच्या अधीन आहोत



Lecture on SB 5.5.2 -- Hyderabad, April 11, 1975

जोपर्यन्त आपण या भौतिक विश्वात, जीवनाच्या शारीरिक संकल्पनेत आहोत. मग तिथे फरक असेल: "मी भारतीय आहे," "तुम्ही अमेरिकन आहात," "तुम्ही इंग्लिश आहेत," "तुम्ही हे आहात," अनेक गोष्टी, अनेक हुद्दे. म्हणून.जर तुम्हाला आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर प्रगती करायची इच्छा असेल, मग सूत्र आहे सर्वोपाधी-विनिर्मुक्तम. सर्वोपाधी-विनिर्मुक्तम. तत्-परत्वेन निर्मलम (चैतन्य चरितामृत मध्य १९.१७०) । ती सुरवात आहे. ते म्हणजे ब्रम्ह-भूत स्तराची सुरवात आहे. ब्रम्ह-भूत… (श्रीमद् भागवतम् ४.३०.२०) । तीच गोष्ट. ते नारद पंचरात्र आहे, सर्वोपाधी-विनिर्मुक्तम, आणि ब्रम्ह-भूतः प्रसन्नात्मा ( (भ.गी. १८.५४ भगवद्-गीता, तीच गोष्ट. जिथे तुम्हाला वैदिक साहित्य सापडेल, समान गोष्ट. म्हणून हे आधिकृत आहे. कोणताही विरोधाभास नाही. भौतिक स्तरावर तुम्ही एक पुस्तक लिहिता, मी एक पुस्तक लिहितो, मग मी तुमच्याशी सहमत नाही आणि तुम्ही माझ्याशी सहमत होत नाही. तो भौतिक स्तर आहे. पण आध्यात्मिक स्तरावर, तिथे आत्मसाक्षात्कारचा स्तर आहे. तिथे चूक नाही, तिथे माया नाही, तिथे अपूर्ण इंद्रिय नाहीत आणि तिथे फसवणूक नाही. तो आध्यात्मिक स्तर आहे. म्हणून भगवद्-गीता सांगते,ब्रम्हभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांङ् क्षति (भ.गी. १८.५४ । नारद पंचरात्रमध्ये अशाच गोष्टीला पुष्टी दिली आहे.

सर्वोपाधि विनिर्मुक्तम्
तत परत्वेन निर्मलम्
हृषिकेण हृषिकेश
सेवनम् भक्तिर् उच्यते
(चैतन्य चरितामृत मध्य १९.१७०) ।

हा स्तर आध्यात्मिक स्तरापर्यंत आपण आले पाहिजे ज्यामध्ये ह्रिषीकेन… ह्रिषीक म्हणजे इंद्रिय, भौतिक इंद्रिय आणि आध्यात्मिक इंद्रिय. तर आध्यात्मिक इंद्रिय काय आहेत? आध्यात्मिक इंद्रिय निराकार नाही. नाही. शुद्ध इंद्रिय. कलुषित इंद्रियमध्ये मी विचार करतो. "हे शरीर भारतीय आहे; म्हणूनच मी भारताची सेवा करायला कटिबद्ध आहे," "हे शरीर अमेरिकन आहे, म्हणून अमेरिकेची सेवा करायला कटिबद्ध आहे." हि उपाधी आहे. पण आध्यात्मिक इंद्रिय म्हणजे सर्वोपाधी-विनिर्मुक्तम - "मी भारतीयही नाही अमेरिकनही नाही, ब्राम्हणही नाही क्षुद्रही नाही." मग मी कोण आहे? जसे चैतन्य महाप्रभूंनी सांगितले, कृष्णांनी सुद्धा सांगितले सर्व-धर्मान् परित्यज्य माम एकम... (भ.गी. १८.६६) ।

तो आध्यात्मिक स्तर आहे, की यापुढे मी या किंवा त्या धर्माशी संबंधित नाही. मी केवळ श्रीकृष्णांना शरण गेलो आहे. हे सर्वोपाधी-विनिर्मुक्तम (चैतन्य चरितामृत मध्य १९.१७०) । जर एखादा या आध्यात्मिक जाणिवेच्या स्तरापर्यंत आला की " मी आत्मा आहे. अहं ब्रम्हास्मि. मी भगवंतांचा अंश आहे…" ममैवाशॊ जीव भूतः(भ.गी. १५.७) । कृष्ण सांगतात, हे सर्व जीव माझे अंश आहेत." मनःषष्ठानीइंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति (भ.गी. १५.७) । "तो अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत, मन आई शरीर गुंतले आहेत." हि स्थिती आहे. तर आमचे कृष्णभावनामृत आंदोलन लोकांना ते शिक्षण देत आहे. "तुम्ही हे शरीर नाही, मन नाही, हि बुद्धीही नाही, पण त्यावरही. तुम्ही आत्मा आहात." तर कृष्णांनी खात्री दिली की ममैवाशॊ. जर कृष्ण आत्मा आहे, सर्वोच्च आत्मा, मग तुम्ही सुद्धा सर्वोच्च आत्मा आहात. पण फक्त फरक हा आहे की ते सर्वोच्च आहेत आणि आपण अधिनस्थ आहोत. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानाम् एको यो बहुनां कामान् (कथा उपनिषद २.२.१३). हि वैदिक आज्ञा आहे. तेही जीव आहेत, आपण सुद्धा जीव आहोत, पण ते सर्वोच्च आहेत आणि आपण अधिनस्थ आहोत. तो फरक आहे. एको यो बहुनां विदधाति कामान्. हि आपली स्थिती आहे. हा आत्मसाक्षात्कार आहे.

जेव्हा तुम्हाला हे समजेल, की कृष्ण, किंवा सर्वेश्वर, किंवा भगवान, जे काही तुम्ही म्हणाल, ते पूर्ण आत्मा आहेत, आणि आपण त्या परमात्म्याचे अंशिक भाग आहोत, आणि ते राखण करणारे; आपण राखले जाणारे. त्यांचे आपल्यावर वर्चस्व आहे; आपण त्याच्या अधीन आहोत," तर हा पहिला साक्षात्कार. याला ब्रम्ह-भूत म्हणतात. आणि जर तुम्ही ब्रम्ह-भूत स्तरावर आणखीन प्रगती केलीत, तर कदाचित अनेक जन्मानंतर कृष्ण काय आहेत तुम्ही समजू शकाल. ते आहे... बहुनां जन्मनामन्ते (भ.गी. ७.१९) । कृष्ण भगवद् गीतेत सांगतात बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते. जेव्हा एखादा पूर्णतः ज्ञानवान होतो, बुद्धिमान, मग त्याचे काम आहे वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः (भ.गी. ७.१९) । मग तो समजू शकेल की वासुदेव, वासुदेवांचा पुत्र कृष्ण सर्व काही आहे . तो साक्षात्कार आवश्यक आहे. ती कृष्ण चेतनेची परिपूर्णता आहे.